वडवणी : - आईसोबत कापूस लावण्यासाठी शेतात गेलेल्या बहिण-भावाच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. 12 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता वडवणी तालुक्यातील मोडवळ येथे घडली. ते बहिण-भाऊ त्यांच्या आई-वडिलांना एकुलते एक होते.
अशोक विष्णू अंडिल ( वय 16) आणि त्याची बहिण पुजा विष्णू अंडिल (वय 14) असे विज पडून मृत्यू झालेल्या बहिण-भावाचे नावे आहेत. ते आज सकाळी त्यांच्या स्वत:च्या शेतात कापूस लावण्यासाठी आई सोबत गेले होते. संध्याकाळी पाच वाजता अचानक जोराचे वारे सुटले अन् पाऊस सुरु झाला आईसोबत कापूस लावत असलेले बहिण भाऊ पळत अंब्याच्या झाडाखाली गेले. आई पाठीमागून येत होती. तेवढ्यात अचानक नियतिने घात केला अन् अशोक आणि पुजा थांबलेल्या अंब्याच्या झाडावर विज पडली. यामध्ये दोघांचाही भाजून मृत्यू झाला. ते दोघे आईवडीलांना एकुलतेएक होते. आईने आरडा ओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. मृत्तदेह जिल्हारुग्णालयात शवविच्छदनकरण्यासाठी आणले आहेत.
बहिण भावाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment