Saturday, June 20, 2020

हाप्तेखोर पोलीसांनवर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची निलंबनाची कारवाई .

अंबाजोगाई ;-(प्रतिनीधी )अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मापुरी येथे एका पत्त्याच्या क्लबवर धाड टाकण्यात आली होती. ही धाड विशेष पथकाने टाकली होती. हप्ते देऊनही धाड पडते कशी? असा जाब अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचार्‍यास मोबाईलद्वारे विचारण्यात आला होता. या ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घेऊन संबंधित हप्तेखोर पोलिसास आज निलंबीत केले आहे. यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भ्रष्ट पोलिसांवर तडकाफडकी कारवाया केलेल्या आहेत. 
    अंबाजोगाई परिसरामध्ये अवैध धंदे काही ठिकाणी सुरू आहेत. मटका क्लब, अवैध वाळूच्या गाड्यांना काही भ्रष्ट पोलिस कर्मचार्‍यांचे अभय मिळत आहे. अवैध धंदेवाले आणि भ्रष्ट कर्मचार्‍यांचे लागेबांधे आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मापुरी परिसरात विशेष पथकाने पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली होती. या प्रकरणी जुगार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. आम्ही हप्ते देतोत, तरीही धाड कशी पडली ? असा जाब अवैध धंदेवाल्यांनी पोलिस कर्मचारी बालासाहेब फड यास विचारला होता. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पाच दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कर्मचार्‍याची चौकशी लावली होती. यात कर्मचारी दोषी आढळून आल्यानंतर आज त्याच्याविरोधात निलंबणाची कारवाई करण्यात आली. यापूर्वीही अनेक भ्रष्ट पोलिसांचे कारनामे समोर आलेले होते. त्या भ्रष्ट पोलिस कर्मचार्‍यांवरही पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी कारवाई केली होती.

No comments:

Post a Comment