Thursday, June 11, 2020

शाळा सुरू करण्याबाबत प्रधान सचिव जिल्हाधिकार्‍यांसोबत व्हिसीद्वारे चर्चा करणार.


बीड ;-- राज्यात 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने शाळा कधी सुरू करायच्या याबाबत आज राज्याच्या प्रधान सचिव वंदना कृष्णन या सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संवाद साधून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यात शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या होऊ शकतो. 
ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सचा नियम पाळून बसवणे शक्य नाही. अनेक मुले हे  स्कूल बस आणि एसटी बसने शाळेत ये-जा करतात. भौतिक आणि आरोग्य सुविधाही अनेक शाळात नाहीत, त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांसोबत नेमक्या शाळा कधी सुरू करायच्या आणि त्या कशा सुरू करायच्या याबाबत राज्याच्या प्रधान सचिव वंदना कृष्णन ह्या आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून घेणार आहेत. बीड जिल्ह्यातील शाळांबाबतही काय निर्णय घेता येईल, त्याबाबत उपाययोजना काय या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासोबत श्रीमती कृष्णन् यांनी मते जाणून घेतलेले आहेत. मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंत या व्हिसीचा कोणताच निरोप जिल्हा परिषदेला मिळाला नव्हता मात्र अचानक सकाळी अकरा वाजता शिक्षण विभागाचा मेलद्वारे संदेश येऊन जिल्हाधिकारी यांना या व्हिसीला उपस्थित राहण्याचे शिक्षण विभागाने आदेश काढले होते. या व्हिसीमध्ये बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही सहभागी झाला होता.

No comments:

Post a Comment