*रश्मी ठाकरे यांचे सांत्वन.
मुंबई, दि. १६:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानी भेट दिली.
या भेटीत राज्यपाल महोदयांनी सौ. रश्मी ठाकरे, स्वाती सरदेसाई यांचे सांत्वन केले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील उद्योजक माधवराव पाटणकर यांचे निधन झाले होते. त्या अनुषंगाने राज्यपाल श्री. कोश्यारी मातोश्री निवासस्थानी स्वतः भेटीस आले होते.
000
No comments:
Post a Comment