बीड;- (प्रतिनीधी ) केज तालुक्यामध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये सारणी या गावी विजेची तार तुटून ती उभी असलेल्या टेम्पोवर पडली. टेम्पोने पेट घेतल्याने त्यात सदरील टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत आहे. काल केज तालुक्यात वादळी वार्यासह पाऊस झाला. या वादळात सारणी येथील अरविंद श्रीरंग ओव्हाळ यांच्या टेम्पोवर विद्युत तार तुटून पडल्याने टेम्पोने पेट घेतला. टेम्पो पेटल्याचे तेथील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
No comments:
Post a Comment