Monday, June 1, 2020

घरगुती एलपीजी गॕस सिलेंडर आजपासून महागणार .जाणून घ्या नवे दर.


इंडियन ऑईलच्या माहितीनुसार आज 1 जून 2020 पासून देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीची किंमत वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही नवी दरवाढ मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई सह देशातील सर्व प्रमुख शहरात लागू होणार आहे. यानुसार आजपासून मुंबई मध्ये प्रति 14.2 किलोच्या गॅस सिलेंडर साठी तब्बल 590.50 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्ली यामध्ये हे भाव 593 रुपये , चेन्नई मध्ये 606.50 तर कोलकाता मध्ये सर्वाधिक म्हणजे 616 रुपये इतके असणार आहेत.
महत्वाचे म्हणजे हे नवे दर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी द्यायचे नाहीत कारण लॉकडाउन अंतर्गत करण्यात आलेल्या घोषणेनुसार 30 जून पर्यंत त्यांना मोफत गॅस पुरवठा केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळे दिल्ली बाजारपेठेतील एलपीजीच्या आरएसपी (किरकोळ विक्री किंमत) प्रति सिलिंडरमध्ये 11.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबत रविवारी रात्री उशिरा निवेदन करण्यात आले होते. आजपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत.

No comments:

Post a Comment