Thursday, June 18, 2020

बीड पाटोदा मध्ये चायना वस्तूची होळी.करून चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन .

बीड - (प्रतिनीधी ) भारत चीन सिमेवर भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध करण्यात येत असून बीड आणि पाटोदा येथे भाजपाच्यावतीने चिनी मालावर बहिष्कार टाकत या मालाची होळी करुन चीनचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी पाटोदा येथे सुरेश धस आणि बीड येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली चिनी मालाची होळी करण्यात आली. 
गेल्या दोन दिवसापासून भारत चीन सिमेवर तणाव आहे. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. भारतीय जवान शहीद झाल्याने देशभरातून चीनचा निषेध केला जात आहे. चीनच्या मालावर बहिष्कार घातला जात आहे. आज पाटोदा येथे आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली चिनीमालावर बहिष्कार घालत चिनची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. तसेच बीड येथेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत चिनी मालाची होळी करण्यात आली.
यावेळी  विजयकुमार पालसिंघनकर, चंद्रकांत फड, भगिरथ बियाणी, विक्रांत हजारी, डॉ लक्ष्मण जाधव,शांतीनाथ डोरले, भुषण पवार, विलास बामणे,संध्याताई राजपुत, जाधव ताई, दत्ता परळकर, अमोल वडतीले, कपिल सौदा,हरिष खाडे, सरपंच वसंत गुंदेकर,स्वप्नील शिंदे,अजय ढाकणे, राकेश बिराजदार, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment