Monday, June 22, 2020

विवादित जागा कोणाची हे न्यायालय ठरवेल पण तूर्तास तेथील दुर्गंधी दूर करा-प्रा पवन मुंडे

 * मोंढ्यातील मध्यवर्ती  टेलर लाईन जवळील प्रकार.

परळी प्रतिनिधी : भर मोंढ्यातील टेलर लाईन येथे रूपंम ड्रेसेस च्या समोर नगरपालिका चे दुर्लक्षाने  एका मोक्याच्या जागेवर अक्षरशः उघड्यावर च मुतारी झाली आहे,त्या मुळे तेथील रस्त्यावरुन महिला व नागरिकांना वागणे सुद्धा मुश्किल झाले आहे,तरी त्या रिकाम्या जागेची नगरपालिकेने त्वरित स्वच्छता करून तेथे मुतारी म्हणून वापरण्यास पायबंद करावा असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.
संबंधित जागा नगरपालिके ची आहे मात्र ती लीज वर कोणाकडे आहे ? त्या जागेच्या लिजवरील मालकीवरून तेथील वैधनाथ  ग्राहकभंडार प्रशासन व एका व्यक्ती मध्ये कोर्टात भांडण आहे अशी माहिती मिळत आहे,अक्षरशः त्या मुतारीची दुर्गंधी व दूषित पाणी तेथील रोडवर येत असल्याने तेथून नागरिकांना वागणे सुद्धा मुश्किल झाले आहे,हीच का नगरपालिकेची स्वच्छ परळी,सुंदर परळी ची प्रतिज्ञा ?? "जनाची नाही तर मनाची तरी लाज" दाखवत भर रस्त्यावर मुतारी झालेल्या त्या जागेची निगा तरी राखावी ती जागा कोणाच्या मालकीची हे कोर्ट ठरवेल पण  तेथील व्यापारी व नागरिक यांच्या आरोग्याचा व त्या रोडवरील महिला व नागरिकांच्या रहदारीचा विचार करून तूर्तास त्या जागेची  स्वच्छता करून,तेथें मुतारी साठी पायबंद घालून ती जागा स्वच्छ सुशोभित करावी अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment