बीड ;-- संघर्ष योद्धा कोरोनाला हरवेल, अशी विश्वासार्थ साद घालत ‘साहेब बरे होवून लवकर या’ अशा आशयाच्या असंख्य पोस्ट सोशलमिडियावर व्हायरल होत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत.
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना बाधीत निघाल्यानंतर आज सकाळपासून मुंडे समर्थकांनी सोशलमिडियावरून मुंडेंसाठी प्रार्थना करणार्या असंख्य पोस्टद्वारे भावना व्यक्क्त केल्या आहेत. इथंही संघर्षच, संघर्ष योद्धा कोरोनाला हरवेल अशी विश्वासार्थ साद अनेकांनी घातल्याचे दिसून येते. तर अनेकजण ‘साहेब बरे होवून लवकर या’ असं म्हणत प्रार्थना करताना पहावयास मिळाले. धनंजय मुंडेंचं उभं आयुष्य संघर्ष करण्यात गेलं. धैर्य ठेवून संघर्ष करणारा आणि यशाची पताका फडकवणारा महाराष्ट्रातला राजकीय योद्धा म्हणून धनंजय मुंडेंकडं पाहितलं जातं. त्यांची रात्री कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली आणि मुंडे समर्थकांनी इथंही संघर्ष वाट्याला आल्याचे सांगत हा संघर्ष योद्धा कोरोनाला हरवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अनेकांनी धनंजय मुंडेंच्या संघर्षाचे व्हिडीओही सोशलमिडियावर पोस्ट केल्या आहेत.
No comments:
Post a Comment