नांदेड ;- (प्रतिनिधी ) भावावर दाखल झालेल्या गुन्हयात मदत व जामीन मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नायक श्याम अर्जुनराव काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार ( 3 ) मे रोजी रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यातील वाजेगाव चौकीतील पोलीस नायक काळे यांनी आरोपींना गुन्हात मदत करण्यासाठी व जामीन मंजूर करण्यासाठी वाजेगाव येथील तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार वाजेगाव चौकात बुधवारी दुपारच्या सुमारास सापळा लावला असता तक्रारदाराकडून लाच स्विकारतांना काळे रंगेहाथ पकडल्या गेले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही पोलीस अधीक्षक कल्पना बोराळकर,अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप-अधिक्षक विजय डोंगरे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल पखाले,पो.काँ.बालाजी तेलंग, हनुमंत बोराळकर, गणेश तालकोकुरवार,सचिन गायकवाड, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने सापळा रचून कार्यवाही केली आहे.
No comments:
Post a Comment