बीड ;-- तालुक्यातील बागपिंपळ्गाव येथील तलवाडा फाट्यावर श्री साई समर्थ हॉस्पिटल असून शेजारी असणाऱ्या मेडिकल ला रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान आग लागून संपूर्ण मेडिकल जळून खाक झाले असून या लागलेल्या आगीत शेजारील डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले हे गंभीररित्या भाजून ठार झाले तर त्यांचा कंपाउंडर सुनील माळी हे गंभीर रित्या भाजले आहेत.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील तलवाडा फाट्यावर श्रीसाई समर्थ हॉस्पिटल असून शेजारी असणाऱ्या मेडिकल ला मध्यरात्री दोन ते अडीच च्या सुमारास अचानक आग लागली मेडिकल मध्ये फ्रिज,व मोठया प्रमाणात सॅनिटायझर असल्यामुळे तात्काळ आगीने रौद्ररूप धारण केले व आग विझवताना डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले व कंपाउंडर सुनील माळी हे गंभीररित्या भाजले त्यांना तात्काळ बीड च्या जिल्हारुग्णालयात हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यान डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले हे मयत झाले तर कंपाउंडर सुनील माळी यांच्यावर उपचार चालू आहेत.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून
घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे साहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज टाकसाळ,पोलीस नाईक गणेश तळेकर जमादार नामदेव फड आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
=====//////===
आग लागली की लावली ? परिसरात चर्चा….
मध्यरात्री दोन ते अडीच या दरम्यान डॉक्टर व कंपाउंडर काय करत होते ? डॉक्टर व मेडिकल चालकांमध्ये वाद असल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत होते ? त्यामुळे या घटनेमागील नेमके सत्य काय आहे ? त्यामुळे या मेडिकल दुकानाला आग लागली की लावली ? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे सत्य काय आहे ते पोलिस तपासात समोर येईलच.
No comments:
Post a Comment