Sunday, June 7, 2020

लग्न आटोपून गावी जाणाऱ्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यु .पत्नी गंभीर.


* घुंगराळा येथील घटना.

बाचोटी (ता.कंधार) येथील लग्न आटोपून घुंगराळ्यात येताच  दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणा-या भरधाव ट्रक ने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमिला नांदेड येथे हालवण्यात आहे.
ही घटना दि 7 जुन रोजी साय.5 वाजता  घुंगराळा बस्थानकावर घडली आहे .
नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी शिताराम सुगावे वय (40 ), नातेवाईकाच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय 35), रूतुजा बालाजी सुगावे( वय 13 ), हे तीघे ही मोटारसायकल क्र एम.एच.26 ए.ए . 684 या वर बाचोटी येथील लग्न आटोपून घुंगराळा बस्थानकावर येताच नायगांव येथुन भंगार घेऊन भरधाव वेगात जाणा-या ट्रंक क्र .एम. एच .26 एच .8724 याने दुचाकीस जोराची धडक दिल्याने बालाजी शिताराम सुगावे व त्यांची 13 वर्षाची रूतुजा बालाजी सुगावे बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे .
भंगार घेऊन जाणारा ट्रक हा आति वेगाने जात आसल्याचे प्रथम दर्शनी लोकांनी पोलीसांना सांगीतले आहे . पन्नास की. मी. चा प्रवास करून गावाच्या जवळ आले काही झाले नाही पण क्षनात घरी पोहचणार  गावात येताच काळाने सुगावे कुंठुबावर घाला घातला .
 यात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याने परीसरात हाळहाळ व्यक्त होत आहे . दोन्ही मृतदेह कुंटुर पोलीसांनी उतरीय तपसणीसाठी नायगांव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे . या तील गंभीर जखमी संगीता सुगावे याना पुढील उपचारासाठी नांदेड येधे नेण्यात आले आहे .ट्रक चालकास कुंटुर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .हे वृत्त लिहीपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटुर पोलीस ठाण्यात सुरू होती.

No comments:

Post a Comment