Tuesday, June 23, 2020

दोन हजाराची लाच स्विकारताना परभणी महावितरणच्या उपव्यवस्थापकास रंगेहात पकडले.

परभणी;--(प्रतिनिधी)परभणी येथील महावितरण वितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक यांना दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी २२ रोजी छापा घालून पकडले आहे
महावितरण कंपनीच्या परभणी कार्यालयातील एका सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता या तक्रारकर्त्याने दहा दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार दाखल केली होती. त्यातून आपण २८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. त्याचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे वेतन मिळवून देण्या करिता संबंधीत कर्मचारी लाच मागत असल्याचे त्या सेवानिवृत्त अभियंत्याने नमुद केले होते. या खात्याच्या अधिका-यांनी लगेच सापळा रचला अन् पंचासमक्ष वीज कंपनीच्या मानव संसाधन विभागात(क्रमांक 2) केलेल्या कारवाईत तक्रारकर्त्यांकडून उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक हे दोन हजार रूपयांची लाच स्विकारतांना चतुर्भुज झाले. त्यांच्या विरोधात परभणी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल कडू, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमिल जहागीरदार, मिलिंद हनुमंते, शेख शकील, शेख मुखीद, माणिक चट्टे, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जनार्दन कदम यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment