* पंचवीस हाजाराची विदेशी दारू जप्त .
बीड गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास लिंबागणेश तालुका बीड येथील चंद्रकांत अवसरे याच्या बंद घराची झडती घेतली असता त्यात मॅक डॉवेल्स नंबर वन व्हिस्की विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या 43 बाटल्या मिळून आल्या. घरावर धाड पडल्याचे माहीत होताच आरोपी चंद्रकांत अवसरे हा पळून गेला. त्याला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाईत जप्त मुद्दे मालाची किंमत पंचवीस हजार आठशे रुपये एवढी आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक माजलगाव वनमारे , दुय्यम निरीक्षक भरारी पथक राठोड जवान आमीन सय्यद, गोणारे व वाहनचालक शेळके यांनी केली.
तसेच एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई पथकाने मंगळवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा ते केंद्रेवाडी यादरम्यान हातभट्टी दारूची वाहतूक करताना अंकुश नामदेव आडे वय 40 वर्षे राहणार राडी तांडा तालुका अंबाजोगाई याला पकडले, त्याच्या ताब्यातून हातभट्टी दारूची वाहतूक करण्याकरता वापरलेली होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकलMH 44 L 8419 व 30 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
No comments:
Post a Comment