Wednesday, May 20, 2020

तुळजाभवानी मंदिरात भाविकांना अनधिकृत प्रवेश.

 *व्यवस्थापकाविरोधात शिवसेनेची तक्रार.

तुळजापूर- ; (प्रतिनीधी ) देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रार्थनास्थळांना कुलूपबंद करण्यात आले आहे. केवळ पुजार्‍यांना धार्मिक विधी, पूजाअर्चा करण्याची मुभा देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात नियम डावलून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असल्याची तक्रार समोर आली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार यांनी मंदिराचे व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापकांनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करीत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे केली आहे. नियम डावलून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment