Tuesday, May 19, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग ३१ मे पर्यंत बंद !

* सर्व संबंधितांनी मुख्यालय सोडू नये; वरिष्ठांनी फोन, एसएमएसव्दारे तातडीच्या कामांसाठी बोलावल्यास कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य

औरंगाबाद, दि. १८ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसरावरील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग, मॉडेल कॉलेज, घनसावंगी आणि सामाजिक कार्य महाविद्यालय दि . १७-०५-२०२० पर्यंत पूर्णतः बंद राहतील, असे कळविण्यात आले होते. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेल्या दि. १७-०५-२०२० च्या अधिसुचनेच्या अनुषंगाने लॉकडाऊनचा कालावधी दि.३१-०५-२०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठांतर्गत सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग ३१ मे पर्यंत बंद राहतील या आशयाचे परिपत्रक कुलसचिव यांनी आज जारी केले आहे.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार व कुलगुरुंना प्राप्त सूचनेच्या अनुषंगाने परिपत्रकाव्दारे विद्यापीठाशी संबंधितांना कळविण्यात आले आहे की, विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसरावरील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग तसेच मॉडेल कॉलेज घनसावंगी, विद्यापीठ परिसरावरील सामाजिक कार्य महाविद्यालय दि. ३१-०५-२०२० पर्यंत पूर्णतः बंद राहतील. इतर सर्व सूचना पूर्वी प्रमाणे राहतील. तसेच परिपत्रक क्रमांक आस्था / आरओ / ५७ / २०२० दिनांक १२-०५-२०२० मधील बाबी जशाच तशा लागू राहतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे परिपत्रकात नमूत करण्यात आले आहे. तसेच सर्व संबंधितांना असेही निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मुख्यालय सोडू नये. तसेच, त्यांच्या वरिष्ठांनी फोन, एसएमएसव्दारे तातडीच्या कामांसाठी बोलावल्यास कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहील. सर्व शैक्षणिक / प्रशासकीय विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना सदर परिपत्रक निदर्शणास आणून द्यावे व सर्व संबंधीतांनी या परिपत्रकाची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment