* वडसावित्री नगर चे नागरिक त्रस्त.मात्र
शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी गप्प का?
परळी वैजनाथ ;-
कोरोंना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या धारा 144 लागू असून सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाउन चा काळ सुरू आहे,
सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक यांनी दिवस रात्र एक करून कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी प्रयत्नशिल आहेत तर दुसरीकडे परळी येथील शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत मात्र या लॉक डाउन च्या काळात मात्र अवैध धंद्याने आपले डोके वर कडल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले असल्याचे चित्र समोर येत आहे.
परळी शहर हद्दीतील वडसावित्री नगर भागात राहणाऱ्या रहिवाश्यांनी आज शहर पोलीस स्टेशन ला निवेदन दिले आहे .
या निवेदनात त्यांनी या भागात काही लोक हात भट्टी दारू करून विकत असून या भागात सामान्य नगरिकांन याचा नाहक त्रास होत असून याच भागात काही महिला देह व्यापार करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. येथील रहिवाशीयांच्या म्हणण्यानुसत या भागात लॉक डाउन च्या काळात अनेक ठिकाणाहून लोक हाताला कोरून टाइन चे शिक्के असतांना येऊन हातभट्टी पित आहेत तसेच येथील स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच काही महिला याच इलाख्यात देह विक्रीचा व्यवसाय करत असून या मुळे येथील स्थानिकांना याचा नाहक त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी व महिलांनी परळी येथील शहर पोलीस स्टेशन ला निवेदन दिले आहेवडसावित्री नगर च्या रहिवाशीयांनी या बाबत या अगोदर ही शहर पोलिस स्टेशनला सांगितले होते मात्र शहर पोलिसांनी याप्रकारणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. 100 लोकांचे सह्या केल्याने निवेदन परळी शहर पोलीस स्टेशनला देण्यात
No comments:
Post a Comment