*जनक्रांती सेनेच्या वतिने ग्रामिण भागात अन्नधान्य वाटप.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचे संक्रमन रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनच्या परििस्थितीत ग्रामिण भागात नागरिकांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतांना अनेक अडचणी येत असून जनक्रांती सेनेच्या वतिने आम्ही त्यांच्या मदतीत खारीचा वाटा उचलत आहोत. गरजवंतांची सेवा करणे महत्वाचे असून हे भाग्य आम्हास लाभले आहे असे मत जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी व्यक्त केले.
जनक्रांती सेनेच्या वतिने परळी तालुक्यातील पांगरी, पांगरी कॅम्प, दादाहरी वडगाव, दादाहरी वडगाव वस्ती, दगडवाडी, मांडवा व जिरेवाडी येथे आज आर्थिक दृष्टया अडचणीत असलेल्या गोरगरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू सह अन्नधान्य देण्यात आले. एका विशेष वाहनाद्वारे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वत: बबनभाऊ गित्ते हे गरजूंना अन्नधान्य देत आहेत. आज पुन्हा एकदा ग्रामिण भागातील उर्वरित गावांमध्ये अन्नधन्याचे वाटप करण्यात आले. यापूर्वी ग्रामिण भाग व परळी शहर असे वाटप करण्यात आले होते. अन्नधान्य कमी पडणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे तथापि माझ्या जीवाभावाच्या नागरिकांसाठी मी खारीचा वाटप उचलत आहे असेही बबनभाऊ गित्ते म्हणाले.
No comments:
Post a Comment