* प्रेतांचा संख्या वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा ताण.
मुंबई :-कोरोना झपाट्याने मुंबईत पसरत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढ असताना मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील विद्युतदाहिन्यांमध्ये कोरोनाच्या मृतदेहांचा खच पडू लागला आहे. विद्युत दाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या असून येथे अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या कामगारांवर मोठा ताण पडू लागला आहे.
मुंबईत रोज नव्या 600 ते 700 कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.आतापर्यंत मुंबईतील कोरोनाचा बाधितांची संख्या १४ हजाराच्या वर गेली आहे. मृतांची संख्या ५२८ झाली आहे. दररोज सुमारे 20 कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईतील स्मशानभूमीमध्ये प्रेतांचा खच पडू लागल्याने दिसून येत आहे.मृतदेहांचा सर्वाधिक भार चंदनवाडी, दादर, वरळी स्मशानभूमीवर पडत असल्याचे दिसून येत आहे. या स्मशानभूमीत प्रत्येकी दररोज 10 ते 12 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यांच्यावर दिवसरात्र अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत दाहिणीत तीन कामावर काम करीत आहेत. तीन पाळयांमध्ये 9 कामगार काम करीत आहेत. कोरोना वाढू लागल्यापासून विद्युत दाहिणीवरच अंत्यसंस्कार केले जात आहेत. अलीकडे मृतदेहांची संख्या वाढू लागल्याने या कर्मचाऱयांवर अंत्यसंस्काराच्या कामाचा मोठा ताण पडू लागला आहे.
प्रत्येक मृतदेहाला दीड तास
प्रत्येक मृतदेहावर विद्युतदाहिणीत अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तास लागत आहे. कोरोनाच्या मृतदेहांची संख्या वाढू लागल्याने मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मृतदेहांचा स्मशानभूमीत खच पडत असल्याचे दिसून येत आहे. चंदनवाडी, वरळी आणि दादर येथील स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. दररोज 10 ते 12 मृतदेह येत आहेत.
कामगार कमी केल्याने ताण वाढला
एक ऑपरेटर आणि दोन कामगार एका पाळीमध्ये काम करीत आहेत. तीन पाळ्यामध्ये केवळ नऊ कामगार मृतदेहाचे दहन करीत आहेत. स्मशानभूमीत असलेल्या विद्युत दाहिन्यातील दोन शेगड्यांवर त्यांना काम करावे लागत आहे. कोरोनाच्या आधी प्रत्येक स्मशानभूमीत चार ते पाच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात होते, आता 10 ते 12 मृतदेह येत असल्याची माहिती कामगारांनी दिली.
*विद्युत दाहिन्यांवर ताण*
मुंबईत चंदनवाडी, वरळी, भोईवाडा, दादर, सायन, मुलुंड, चरई चेंबूर, अंधेरी, डहणूकरवाडी कांदिवली, बोरिवली येथील विद्युत दाहिन्यांवरील ताण वाढला आहे. स्मशानभूमी कर्मचारी वाढवा अशी मागणी आता होत आहे.
No comments:
Post a Comment