Sunday, May 24, 2020

बीड शहरातील शुक्रवार पेठ भागात तिहेरी हत्याकांड.


 *रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले माय लेकाचे मृतदेह.

बीड  ( प्रतिनिधी ) शहरातील शुक्रवार पेठ भागात आज भर दुपारी 3 जणांची हत्या झाल्याची घटना उघडकीस असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . संगीता संतोष कोकणे ( वय 31 ) , संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय 10 ) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर मयूर संतोष कोकणे ( वय 7 ) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे . पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत . सदरील खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून चौकशी नंतरच खरा प्रकार समोर येईल असे सूत्रांनी सांगितले . दरम्यान मयत महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेल्याचे समजते .

No comments:

Post a Comment