* परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी,डॉ अरविंद मुंडे यांचे आवाहन
परळी वैजनाथ दि. 1.
शहराच्या विविध भागात गायी, म्हशी, शेळ्या, गाढवे, वराह आदी मोकाट सोडलेली जनावरे पशुपालकांनी आपापल्या घरी घेऊन जावीत अन्यथा नगर पालिकेच्यावतीने ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात सध्या लाॅक डाऊन असल्याने बाजार चालू नाही किंवा दुकाने चालू नाहीत. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी काहीच चारा उपलब्ध होत नाही तर कुठेही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे उपाशीपोटी राहत आहेत. त्यातच जनावरे रस्त्यावर असल्याने अत्यावश्यक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपापली मोकाट सोडलेली जनावरे तातडीने घरी घेऊन जावीत असे कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुपालकांनी आपापली सर्व मोकाट जनावरे घरी घेऊन जावीत अन्यथा नगर पालिकेच्यावतीने संबधीतांवर कारवाई केली जाईल असा इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment