नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) जगातल्या 180 पेक्षा अधिक देशांत कोरोनाने आपले हातपाय पसरले असतांना अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणू मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोना पीडित देश मोठ्या दहशतीखाली असतांना अशातच जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. आणि आता डेली यु. के. मेल या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार गुरूवारी लोकांवर ती लस टोचली जाणार आहे असे एका ट्विटर द्वारे केली आहे.
डेली यु. के. मेल या वेबसाईटने ट्विट करत म्हटले आहे की, “ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विकसित होणारी कोरोना व्हायरसच्या लसीची गुरूवारी लोकांवर चाचणी केली जाईल”.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. आपल्या टीमने कोविड 19 म्हणजेच कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लसीचे 10 लाख डोस उपलब्ध होतील.
दरम्यान, जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर कोरोनाने लाखो माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. अशात जर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विकसित होणारी कोरोना व्हायरसवरची लस गुरूवारी माणसांवर यशस्वी झाली तर फार मोठा दिलासा संपूर्ण जगाला मिळणार आहे.या लस च्या चाचणी बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment