Thursday, April 2, 2020

चैत्र नवरात्री व रामनवमी निमित्त पालिवाल कुटूंबियांकडून यज्ञ हवन .

*लहान मुलींना मास्क व साबणांचे केले वाटप.

परळी (प्रतिनिधी) चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या निमित्ताने शिवसेनेचे जेष्ठ नेते भोजराज पालीवाल यांनी आपल्या निवासस्थानी यज्ञ हवन केले असून कोरोना सारख्या महामारीपासून जगाचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर लहान मुलींना खीर पुरीचे जेवण देवून त्यांना मास्क आणि साबण भेट म्हणून देण्यात आल्या. 
चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या निमित्ताने पालीवाल कुटूंबियांकडून आई भवानीची यज्ञ हवन करून मनोभावे प्रार्थना करण्यात आली. आज रामनवमीच्या निमित्ताने कुमारीकांना भोजन देत त्यांना कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी तोंडावर लावण्याचे मास्क व साबण भेट म्हणून देण्यात आल्या..

No comments:

Post a Comment