Monday, April 6, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजीप्रभु नगर व वैजनाथ गल्लीचे रस्ते केले सील.


परळी (प्रतिनिधी ) कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने राज्यात संपूर्ण लाँकडाऊन केले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून लाँकडाऊनच्या काळात कोणतीही व्यक्ती बाजीप्रभु नगर वैजनाथ  गल्लीत येऊ नये म्हणून जिवना वश्यक वस्तू खरेदी करण्याचा वेळ संपल्यानंतर गल्लीत येणारे रस्ते सील करून गल्लीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
परळी शहरात  जिवनावश्यक वस्तु खरेदी साठी ठराविक वेळेत  परळीकरांना ढील देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या चितांजनक झाली आहे. मात्र काही हेकेखोर मंडळी  लाँकडाऊनच्या वेळी मोटारसायकल वर तिबलसीट बसुन
बीन कामाच्या येजा करीत असल्याचे यांना रोखने गरजेचे आहे हे लक्षात घेऊन आपल्या गल्लीला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तसेच कोरोना विषाणूंचा संसर्ग असलेली व्यक्ती प्रवेश करू नये म्हणून गल्लीकडे येणाऱ्या रस्त्याला आडवुन येणारे,जाणाऱ्यांना प्रतिबंध केला आहे.
आता परळीतील प्रत्येक गल्ली,वस्ती मध्ये तेथील नागरिकांनी लाँकडाऊनच्या वेळेत असेच धोरण स्विकारून कोणालाही आवा गमन करू देवु नये व सरकारला साथ देवुन कोरोनाला आपल्या भागात रोखण्यास साथ दिली पाहिजे.

No comments:

Post a Comment