* पालकममंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण विभाग सक्रिय.
बीड (दि. ०७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, धान्य, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये समन्वयक नेमण्यात आले आहेत.
या समन्वयकांमार्फत हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना एक महिना पुरेल एवढे राशन, जीवनावश्यक वस्तूंचे किट, हॅन्ड सॅनिटायझर, मास्क फिनेल, डेटॉल, रुमाल, आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे.
पेन्शन साठी लाभार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याबाबतही संबंधित विभागाकडे हे समन्वयक पाठपुरावा करतील.
या सर्व सुविधा पुरविणे व अडीअडचणी सोडवणे यासाठी या समन्वयकांना २४ काम करणे बंधनकारक असून त्यांनी दररोज याचा अहवाल कार्यालयाला इमेल द्वारे कळवावा असेही समाज कल्याण विभागाने निर्देशित केले आहे.
दरम्यान या कामासाठी तालुकानिय बीड - श्री. एम डी सराफ मो. ९४०५०७९४२२, गेवराई - श्री. के वाय बरबडे मो. ९८८१९५८६७४, पाटोदा - श्री. विनोद वराट मो. ९१३०३१४२२०, आष्टी - श्री. जगदीश डोरले मो. ९९२२६६५९४९, शिरूर (का.) - श्री. प्रशांत सानप मो. ८८०६०३३३७०, केज - श्री. बंकट आघाव मो. ९४०५७७०४८८, परळी - श्री. गव्हाणे मो. ९९७५२०६९७०, अंबेजोगाई - श्री. व्यंकट कराड मो. ९९७०८१४२६१, धारूर - श्री. प्रदीप कुलकर्णी मो. ९६०४९४०९१६, माजलगाव - श्री. गजानन स्वामी मो. ९२८४५३७३८४ आणि वडवणी - श्री. बाळकृष्ण थपडे मो. ९९२२२२४०५८ या कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
हे कर्मचारी त्या - त्या तालुक्याच्या तहसीलदार, गट विकास अधिकारी, आरोग्य विभाग आदींशी समन्वय साधून वरील व्यवस्थापन व साहित्य वाटप करतील अशी माहिती जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment