Wednesday, April 1, 2020

प्रशासनाच्या वतिने उद्या गुरुवारी परळी संपुर्ण लाॕक डाऊन.

* परळी शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे-प्रशासन

परळी वैजनाथ ;-
महाराष्ट्रात पहिल्यांदाच परळीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतिने रविवारी संपुर्ण परळी शहर लाॕक डाऊनच आवाहन केले होत.प्रशासनाच्या आवाहनाला परळीकर नागरिकांचा चांगल्या प्रतिसाद मिळाला होता.
परत एकदा परळी तालुका प्रशासनाच्या वितिने उद्या गुरुवार दि.02 एप्रिल रोजी पुन्हा एकदा संपुर्ण लाॕकडाऊनचे आवाहन केले आहे. परळीकर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरा बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करतील अशी अपेक्षा प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आली आहे. तरी परळी शहरातील व तालुक्यतील सर्व नागरिक,शेतकरी,किराणा दुकानदार,भाजी विक्रेते,फळ विक्रेते यांना कळवण्यात येते की,सध्या कोरोना व्हायरसची साथ जोरात चालू आहे तरी तालुका प्रशासनाच्या वतीने उद्या दि 02-04-2020 गुरुवार रोजी पूर्ण परळी शहर व तालुका पूर्ण (लॉक डाऊन)बंद करण्यात येणार आहे (वैदकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळून).कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी घरा बाहेर पडु नये व प्रशासनाला सहकार्य करून कोरोना विरूद्धाची लढाई तीव्र करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, पं. स. गटविकास अधिकारी संजय केंद्रे, ग्रामीण रुग्णालाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment