Saturday, April 4, 2020

कोरोना बाबत खबरदारी म्हणुन भाजी आडत व्यापार .तोतला मैदानावर स्थलांतरीत;- मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे

 परळी:  शहरात लॉकडाऊन असल्याने  येथील गोपाल चित्र मंदिर जवळील  महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मंडई  मध्ये  भाजीपाला उत्पादक,  आडत व्यापारी व किरकोळ विक्रत्यांची रोज सकाळी दोन तास गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी परळी तहसीलदार डॉ विपीन पाटील ,  न .प चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शुक्रवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली , यावेळी गर्दी असल्याचे दिसून आले , तातडीने  दुपारी एक वाजता  शहरातील  भाजीपाला आडत विक्रेत्यांची तहसील कार्यालयात बैठक बोलविण्यात आली,  या बैठकीत सोमवारपासून  भाजीपाल्याचे बिट     तोतला मैदान येथे  काढण्याचा  निर्णय घेण्यात आला   .         आंबेवेस विभागात भाजीपाल्याचे बिट भरते , याठिकाणी ग्रामीण भागातून शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणतात  आणि  हा भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेते दररोज येतात,  आडत व्यापारी ही उपस्थित राहतात,  याठिकाणी भाजीपाल्याचे बीटकाढले जाते .सध्या  या बिटात टमाटे ,कांदा, पालक, दोडका पत्ताकोबी, गवार व इतर भाजीपाला   येत आहे,शेजारील तालुक्यातील शेतकरी ही भाजीपाला घेऊन येत आहे त्यामुळे गर्दी होते आहे,  येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी तोतला मैदानावर भाजीपाला आडत व्यापारासाठी अंतर ठेवून जागा तात्पुरत्या स्वरूपात  आखून  दिली जाणार आहे असे  बैठकीत ठरल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद  मुंडे यांनी दिली. यावेळी परळीचे तहसीलदार विपीन पाटील , नायब तहसीलदार बाबुराव रुपनर ,नपचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे 22 भाजीपाला आडत व्यापारी, प्रतिनिधी उपस्थित होते. परळीत अन्य तालुक्यातील  भाजीपाला विक्रीस येत आहे असलायचे  भाजीपाला आडत व्यापारी बालासाहेब  कराळे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment