Thursday, April 30, 2020

कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्येकाने दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल ;- ना.धनंजय मुंडे

*१ मे - महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा.

बीड (दि.३०) - : उद्या शुक्रवार दि. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो; सध्या कोरोना या वैश्विक महामारीविरुद्ध सबंध महाराष्ट्र लढतो आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे न होऊ देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, त्या सर्व हुतत्म्यांना नमन करून कामगार चळवळी मध्ये योगदान दिलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, असे ना. मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 
कोरोना विरुद्ध सगळे जग लढत आहे. महाराष्ट्राची लढाई निर्णायक टप्प्यात आली असून रुग्णांचा आकडा आता १० हजारच्या पार जातोय, या परिस्थितीत राज्य शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असून, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. समाजातील अनेक संस्था व अन्य घटक शासनाच्या बरीबरीने गरजूंना अन्न - धान्यासह विविध प्रकारची मदत करत आहेत. एवढेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक शासकीय सूचनांचे पालन करत आपापल्या परीने कोरोनाविरुद्ध लढत आहे.
कोरोना विरुद्ध च्या लढ्यात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने दिलेले हे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल; महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीसाठी लढा दिलेल्या सर्वांसमोर नतमस्तक होऊन राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

*बीड जिल्ह्याचा 'शून्य' कायम राखण्याचे आवाहन*

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी या पुढील काही दिवस आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागणार असून, आपलेच बांधव म्हणून परत आलेले ऊसतोड कामगार यांचीही काळजी करावी काळजी घ्यावी. बीडचा 'शून्य' अबाधित ठेवण्याच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हावासीयांनी योगदान द्यावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात ८३ हजार गुन्हे दाखल. १६ हजार ८९७ जणांना अटक.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार  ८३ हजार १५६  गुन्हे दाखल झाले असून १६ हजार ८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
वरील कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८० हजार ६१७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ४९,८०२वाहने जप्त करण्यात आली परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटनांची नोंद  झाली असून  यात ६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २१पोलीस अधिकारी व १३४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. त्यापैकी ५ पोलीस अधिकारी व ६ कर्मचारी कोरोना  मुक्त झाले असून उरलेल्या १६ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत कापुस खरेदीस परवानगी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

* कोरोना विषाणुचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स पाळून एका दिवसात ५० वाहनांना परवानगी.

बीड(दि.३०)- शासकीय कापूस खरेदीचा अतिरीक्त ताण कमी करून नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतक-याचे कापसाची मोजमाप होऊन खरेदी होण्यासाठी एका दिवशी बाजार समितीच्या क्षमतेप्रमाणे तसेच जिनींग प्रेसिंगचे क्षेत्र विचारात घेवून कोरोना विषाणुचे संक्रमन टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्स पाळून एका दिवसात ५० वाहनांना परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कापुस खरेदी संदर्भात जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतक-यांची संख्या व बीड जिल्ह्यात एफ ए क्यू दर्जाचा आणि एफ ए क्यू दर्जा पेक्षा खालच्या दर्जाच्या कापसाचे परिमाण पहाता जिल्ह्यातील सर्व सीबीआय महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ यांना कापुस खरेदीसाठी वेळ वाढवून देणे , एका दिवसात २० पेक्षा जास्य वाहनांना परवानगी देणे व जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालक यांनी शेतक-याकडील एफ ए क्यू व नाॅन एफ ए क्यू दर्जाचा कापुस खरेदीस परवानगी देण्याची आवश्यकता होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशा नुसार मानक कार्यप्रणाली ( एसओपी) चे पालन करण्याच्या अटीवर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्या सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म. व कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांच्या व्दारे खरेदी केल्या जाणा-या केंद्रावर दि.१३ मार्च २०२० पर्यंत बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या कापसाची खरेदी सकाळी१०:३० ते १:३० यावेळेत २५ वाहने व दुपारी २ ते ५:३० यावेळेत २५वाहने कापुस खरेदीस परवानगी देण्यात येत आहे.
या अटींवर कापुस खरेदी केंद्रावर किंवा कोनत्याही जिनींग फॅक्ट्रीमधे ज्या दिवशी शासकीय ग्रेडर उपलब्ध नाहीत तेथे प्राथमिक नोंदणी केलेल्या व प्राथमिक नोंदणी न केलेल्या एफ ए क्यू व नाॅन एफ ए क्यू ( FAQ व NON FAQ) दर्जाच्या कापसाची खरेदी करण्यास जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालक यांना वरील वेळेत व निर्देशानूसार कापुस खरेदीस परवानगी दिली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी शर्तीस अधीन राहून महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादन पणन महासंघ म.मुंबई कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व खाजगी जिनींग प्रेसींग फॅक्ट्री चालक यांना कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित खरेदी केंद्रावर शासकीय खरेदी असो किंवा नसो त्या केंद्रावर जिनींग , प्रेसिंग फॅक्ट्री चालक ,खाजगी खरेदीदार यांना शेतक-याकडील कापुस खरेदीस परवानगी दिल्याने शेतक-याचा कापसाचे मोजमाप होवून शेतक-याची त्यांना कापसाचे नगदी पेमेंट मिळेल.
प्रधान सचिव ( पणन) सहकार पणन व वस्रोद्योग विभाग मंञालय मुंबई यांनी सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म.मुंबई यांनी कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची तसेच खाजगी खरेदीदारांना कापुस खरेदी करण्याची परवानगी देण्याबाबत कळविले आहे.
या प्रमाणे कापुस खरेदी करतांना या कार्यालयाचे आदेश दि.२० एप्रिल २०२० मधिल इतर अटी व शर्ती कायम असून , सद्यस्थितीत शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड -१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि१४/३/२०२० पासुन लागू करुन खंड २,३,४मधिल तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. त्यांचे तंतोतंत पालन सर्व संबंधितांनी करणे बंधनकारक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Wednesday, April 29, 2020

बँकासह सुट देण्यात आलेल्या सर्व व्यवहार संबंधित व्यक्तींना पास आवश्यक- जिल्हाधिकारी राहुल रेखावार.


बीड,  दि. २९: जिल्ह्यातील जमावबंदी व संचारबंदीच्या काळात ज्या कामांना सुट देण्यात आलेली आहे आणि भविष्यात सुट देण्यात येईल अशा सर्व कामांशी थेट संबंधित व्यक्तींना व कर्मचाऱ्यांना पास सध्या चालू असलेल्या covid१९.mahapolice.in या वेबसाईटच्या आधारे घेता येतात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
परंतु सदरील संकेतस्थळावर अर्ज करतांना संबधित शासकीय नियंत्रण अधिकाऱ्याचे लेखी शिफारस असणे आवश्यक आहे.  यासाठी नियंत्रण अधिकारी याच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील बँकेमध्ये याप्रमाणे पास उपलब्ध असलेल्या व्यक्तींना देखील विषम तारखेस सकाळी ०७.०० ते सकाळी ०९.३० या वेळेतच बँकेशी संबंधित कामाला मुभा दिली जाते. या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही सोई-सुविधा पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना देखील देण्यात येत नाही.
जिल्ह्यतील सर्व बँकांनी याप्रमाणे पास उपलब्ध केलेल्या व्यक्तींना बँकेच्या सर्व सोई-सुविधा या संचारबंदी काळातही बँकेच्या कामकाजाच्या पूर्ण वेळेमध्ये उपलबध करून द्याव्यात. या आदेशासह यापूर्वीचे सुधारीत आदेश, सुधारणा आदेश अमंलात राहतील असे निर्देश दिले आहेत.

बीडमध्ये अफवा पसरविल्या वरून व्हॉटसअप ग्रुप अॅडमीन सह 2 इसमावर गुन्हा.


बीड : पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात " कोरोना " ( कोव्हिड 19 ) विषाणू संदर्भाने कोणत्याही बाबींवरील अफवा पसरविणाऱ्यांवर " सोशल मिडीया सेल " च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे . त्यातुनच दि . 28 - 04 - 2020 रोजी पोलीस ठाणे पेठबीड येथे गु . र . नं 122 / 2020 कलम 505 ( 2 ) , 34 भादंवि प्रमाणे फेसबुक या सोशल मिडीया वरून जाणीवपुर्वक अफवा द्वारे मिडीया आणि प्रशासन यांच्या विरोधात द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या उदेश्याने समीर सरकार या फेसबुक अंकाऊट वर पोस्ट केली म्हणून आरोपी नामे शेख समीर शेख सत्तार वय 24 वर्ष रा . मौहम्मदीयाँ कॉलनी पेठ बीड यांच्या वर सरकारी फिर्यादी पोना / राहूल रतनलाल गुरखुदे नेम . पेटबीड पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरुन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे . या गुन्ह्यामध्ये आज दि . 29 - 04 - 2020 रोजी सकाळी सदर गुन्ह्याचे फिर्यादी यानी सांगितले की , समीर सरकार या फेसबुक अंकाऊट वरुन शासन आणि मिडीया यांच्याविषयी अफवा व द्वेषभाव निर्माण करणारी तीच पोस्ट इसम नामे सय्यद खय्यूम सय्यद जमीर यांने M Khan नावाच्या व्हॉटसअप ग्रुपवरून मो . नं 8605242414 यावरुन दि . 28 - 04 - 2020 रोजी 00 . 21 वाजता पोस्ट केली आहे . यावरून पुढील तपासात आज दि . 29 - 04 - 2020 रोजी M Khan नावाच्या व्हॉटसअप ग्रुपवर पोस्ट करणारा व M Khan नावाच्या व्हॉटसअप ग्रुप चा अॅडमीन सलीम जावेद शेरखान वय 30 वर्ष रा . दाऊदपूरा बीड याने सदरची पोस्ट करण्यास ग्रुप अॅडमीन या नात्याने संमती दिलेली आहे म्हणून नमुद 02 इसमांना गुन्ह्यात आरोपी करून आज दि . 29 - 04 - 2020 रोजी सकाळी 11 : 00 अटक करण्यात आली आहे . तसेच गुन्ह्यात आरोपी क्र . 2 व आरोपी क्र . 3 यांच्याकडून सदरील गुन्ह्यातील 02 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत . गुन्ह्याचा तपास सपोनि के . बी . भारती हे करीत आहेत . कोरोना विषाणूच्या संदर्भाने अफवा पसरविणाऱ्या विरूध्द दि . 20 - 03 - 2020 पासुन आजपावेतो एकूण 34 आरोपी विरूध्द वेगवेगळे 32 गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत . तरी समस्त बीड जिल्ह्यातील नागरिकांना बीड पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे की , कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा सोशल मिडीया व इतर माध्यमातून पसरवू नयेत आणि व्हॉटसअप ग्रुप माध्यमातून कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नयेत . तसेच व्हॉटसअप ग्रुप अॅडमीन हे देखील त्यास जबाबदार आहेत . पोलीस पथक 24 तास सोशल मिडीयावर करडी नजर ठेवून आहेत . अफवा पसरविल्यास कडक कारवाई करण्यात येईल

बीड पोलिसांसाठी “पोलीस covid-19” सुरक्षा सेल कवच.

 
बीड : दिनांक 28 एप्रिल रोजी मा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोरोना “covid-19” विषाणूच्या अनुषंगाने सुरक्षात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस “covid-19” सुरक्षा सेल स्थापन करण्यात आला आहे सध्या देशात तसेच राज्यात करुणा विषाणूच्या प्रादुर्भावाचा उद्रेक सुरू आहे त्यामध्ये राज्यातील पोलिस दल आघाडीवर राहून कर्तव्य बजावत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून बीड जिल्हा दलाच्यावतीने पोलीस “covid-19” सुरक्षा स्थापन करण्यात आला असून या सेल चे प्रभारी अधिकारी म्हणून सपोनि गजानन बी. जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे यांच्या माध्यमातून बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखा चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे परिवाराचे ताप श्वसनास त्रास खोकला घशात खवखव व शारीरिक वेदना यांची दैनंदिन माहिती संबंधित कडून घेऊन संकलित करून त्याचा अहवाल पोलिस मा. अधीक्षक यांना दररोज सादर करण्यात येईल
बीड पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्यांचे कॅन्सर, टी, बी, एच, आय, व्ही, मधुमेह, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, चे औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन सादर करतील व यापैकी आजार असणाऱ्यांची “covid-19” संबंधाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या पथका कडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे तसेच यातील च्या माध्यमातून ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वरीलपैकी आजार आहेत त्यांना फिल्डवर कर्तव्य दिले जाणार नाही याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा व नियंत्रण करण्यात येईल
पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणारे सुरक्षा साधने उदा. पी पी इ कीट, फेस शील्ड, मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनी टायझर, इत्यादीचे निमित वाटप यांच्या माध्यमातून केले जाणार आहे तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्टाफ ची अनेक वतिका अधिकारी यांच्याकडून प्रत्येक आठवड्याला “covid-19” अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे
दर आठवड्याला प्रत्येक पोलीस स्टेशन व पोलीस वाहनांचे पोलीस साहित्याचे पोलीस वसाहतीचे सोडियम हायपोक्लोराइडने निर्जंतुकीकरण केले जाण्यासाठी बारीक लक्ष ठेवून ते करून घेण्याचे व पाठवा करण्याचे काम या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यातील मधील सेलचे प्रमुख सपोनि गजानन जाधव व पोलीस कर्मचारी स्टाफ हे वरील सर्व प्रकारचा “covid-19” अनुषंगाने सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी चा पाठपुरावा करतील

परजिल्ह्यात अडाकलेले ऊसतोड मजूर बीड मध्ये दखल.


बीड ;- बीड लॉक डाऊन नंतर परजिल्ह्यात अडकलेले 32580 ऊसतोड मजूर  आज दि. 28 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अशी माहिती डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिली.

नीट आणी जेईई परीक्षा क्लासेस तयारीसाठी लातुरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडा.

* महाराष्ट्रातील पालकांची शासनाकडे मागणी . 

परळी  ;- (प्रतिनीधी ) लातूर येथे आरसीसी माटेगावकर आणि आयआयबी चौगुले या नीट आणि जेईई परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या खाजगी क्लासेसमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालक अडकले असून या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की लातूर येथे सुप्रसिद्ध असलेले आरसीसी माटेगावकर आणि आयआयबी चौगुले यांचे नीट आणि जेईई परीक्षेचे खाजगी क्लासेस आहेत. या क्लासमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या २४ मार्चपासून देशभरात लोकडाऊन असल्याने सर्व शिक्षण संस्था बंद आहेत. या लॉकडाऊनची तीव्रता माहित नसल्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना परत आणण्यासाठी लातूरमध्ये धाव घेतली. पण लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने हे पालक आपल्या पाल्यांना घेऊन परत येऊ शकत नाहीत.
सध्या लातूरमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारासह राज्यासह संबंध  जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांची राहण्या-जेवण्याची गैरसोय होत आहे. जिल्हाबंदी असल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. सध्या राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. मात्र स्वतःच्या राज्यात असणाऱ्या लातूर मधील विद्यार्थ्यांना लातूर जिल्ह्यातुन बाहेर पडण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Tuesday, April 28, 2020

पुण्याहून आलेल्या व्यक्तीला गावात प्रवेश. जयगाव, कौडगावच्या सरपंचांना पोलिसांची नोटीस.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)    कोरोना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रतिबंध न करता प्रवेश दिल्याप्रकरणी परळी तालुक्यातील जयगाव येथील सरपंच इंदुबाई नायबळ व कौडगाव हुडा (गव्हाणे) येथील सरपंच सुभाष राठोड यांना सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावून गुन्हा का दाखल करु नये अशी विचारणा केली आहे. 
कोरोना नियंत्रण कक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या पत्राचा संदर्भ देत ही नोटीस बजावण्यात आली. कोरोना विषाणू अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन गावात बोहरगावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच गावातील मुळ रहिवासी असलेला व बाहेरुन गावात आलेल्या व्यक्तीची राहण्याची सोय लोकवस्तीपासून दूर शेतात किंवा इतर ठिकाणी करावी, असे सक्त आदेश असताना जयगाव येथे पुण्याहून आलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात आला. त्याला गावात राहण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केलेला नाही. सदर व्यक्तीला आजाराची लक्षणे आढळून आल्याने सध्या उपचारकामी दावाखान्यात दाखल केलेले आहे. एक जबाबदार लोकसेवक असताना व जिल्हाधिकाºयांचे आदेश असताना सदर व्यक्तीला गावात प्रवेश दिला, कोणताही प्रतिबंध केला नाही. सदर व्यक्ती गावात राहात असल्याबद्दल पोलिसांना कळविले नाही. त्यामुळे कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व अन्य कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये अशी विचारणा करुन तात्काळ खुलासा सादर करण्याचे  आदेश दोन्ही सरपंचांना दिले आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील 22 स्वॕब निगेटिव्ह तर 1022 क्वारंटाईन.एकही कोरोना रुग्ण नाही;- डॉ.लक्ष्मण मोरे


परळी वैजनाथ-[प्रतिनिधी]
परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यात एक ही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळुन आला नसला तरी जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोरोनाचा संसर्ग कुठेही फैलाव होणार नाही याची खबरदारी घेत आहे. आज पर्यंत परळी तालुक्यातील कोरोना संशयीत 22 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सुदैवाने या 22 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन तालुक्यातील 1022 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत अशी माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी पञकारांना दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्याची अधिक माहिती देताना डॉ मोरे यांनी सांगितले कि तालुका आरोग्य विभाग याबाबत अतिषय गंभिर आहे.तालुक्यातील नागापुर विभागात उसतोड 20 तर इतर 36,मोहा उसतोड 37 तर इतर40,सिरसाळा उसतोड 63तर इतर110,पोहनेर उसतोड 66तर इतर66,धर्मापुरी 333तर इतर581,परळी अंतर्गत उसतोड49तर इतर152 अश्या एकुण 1022 नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या नियंञणाखाली क्वारंटाईन करण्यात आले आहे. परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात उसतोड मजुर 6 तर इतर 46 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन परळीच्या भक्तनिवास या ठिकाणी वृंदावन वरुन आलेले 94 नागरिकां पैकी 86 नागरिकांना घरी परत सोडले असुन बाकी 6 नागरिक सध्या आरोग्य विभागाच्या नियंञणाखाली आहेत.दरम्यान कौडगाव येथील एक कोरोना संशयीताचा रिपोर्ट ही निगेटिव्ह प्राप्त झाला असुन त्या रुग्णाला अंबाजोगाई येथील स्वारती रुग्णालयात डाॕक्टारांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.दरम्यान या संशयीत रुग्णांच्या संपर्कात आलेले कौडगावचे 9, जयगावचे 33 आणी सिरसाळ्यातील 5 जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. उसतोड मजुर किंवा इतर जिल्ह्यातील आलेल्या नागरिकांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करुन सहकार्य करावे व शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांच पालन करुन सोशल डिस्टस्,वेळोवेळी साबणाने हात धुणे,परिसर स्वच्छ ठेऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जागृत राहावे तरी ही ताप,खोकला ,श्वसनास ञास होत असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावा व कुठल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.

हिंदुत्ववादी कार्यकर्ता प्रबोधनकार ह.भ.प.अपर्णा रामतीर्थकर काळाच्या पडद्याआड.


ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी निधन झाले आहे. त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. या मतांमुळे काही वेळा वादही निर्माण झाला होता. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले होते. बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.
कुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या. एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना ही हरवत चालली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित होत आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा असेही मत त्यांनी अनेकदा प्रगट केले होते.

Monday, April 27, 2020

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र वितरीत करणाऱ्या मुलांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप.

 बीड ;- (प्रतिनिधी )
अक्षयतृतीयाचे शुभमुहूर्त साधून कोरोना सारख्या महामारीत देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला घरोघर जाऊन वृत्तपत्र वाटप करणाऱ्या कष्टकरी गरजवंत 21 मुलांना पत्रकार संघाच्या वतीने जीवनावश्यक साहित्यांचे कीट देऊन सन्मानित करण्यात आले.
 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरेसर, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून 21 पेपर लाईन करणाऱ्या मुलांना जीवनावश्यक किराणा साहित्यांसह भाजीपाला वाटप करण्यात आला.
कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प झाले आहे.या परिस्थितीचा गंभीर परिणाम इतर क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र सृष्टीवर देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.पेपर वाटप करून कुटुंब चालवणारी संख्या शेकडोंच्या घरात आहे. आज आज पेपर वाटप करणाऱ्या मुलांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.त्यामुळे अशा महामारीत सुद्धा ही मुले आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला जगात चाललेल्या घडामोडींची माहिती घरबसल्या कळावी यासाठी प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र घरोघर जाऊन नित्यनेमाने आजही वाटप करत आहेत.अशा बहाद्दर आणि कष्टकरी पेपर वाटप करणाऱ्या 21 मुलांना जीवनावश्यक किराणा साहित्यासह भाजीपाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने वाटप करण्यात आला.

पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी सुनील साळवे यांची निवड.

नागपूर  :- संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज  पत्रकार  चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच  वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते. आज तब्बल पुरोगामी पत्रकार संघाने  महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम , मराठवाडा, खांन्देश पाच विभागांमध्ये जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्राची आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक नेहमीच बदलत  असलेले दुसरे उपराजधानी नागपूर म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख  होय , या उपराजधानीमध्ये पुरोगामी पत्रकार संघानी आपले विदर्भात पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड  झेप घेतली असून  पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक आयु.सुनील साळवे यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही निवड संघाचे अध्यक्षांच्या परवानगीनेच झालेली आहे. 
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाने आपले पत्रकारांना एकसंघ करून त्यांना जोडण्याचे काम करण्यात येत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाच्या निवड होत असते . महाराष्ट्राची  उपराजधानी नागपूरच्या सुनील साळवे यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी घोषणा  करण्यात आली. त्यांचे नागपूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उभरते नेतृत्व असून त्यांना तरुण  पत्रकार म्हणून  जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हे पञकार क्षेत्रातील कार्य पाहून पुरोगामी पत्रकार संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी देवून दिली .त्यांनी संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालूका व शहराची वा  पत्रकारांना एकसंघ करुन  जोडण्याचे हाती काम घेतलेले आहे , नागपूर जिल्हात संघाने  तरुण युवापिढीचे  पत्रकार क्षेत्रांमधील काम  करणाऱ्यांना एक संधी नवीन आणि नेतृत्व उभा करत आहे .महाराष्ट्रातील नव्या तरुण पञकारांंना संधी देण्याचे सामाजिक पञकारितातेच्या जाण ठेवून हे संघ कार्य करत आहे . संघाचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी तसेच प्रवीण परमार  कार्याध्यक्ष डॉन के.के.,उपाध्यक्ष , प्रवीण परमार,कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे,
महाराष्ट्र कोअर कमिटीचे आयु दिलीप पवार (प्रदेशध्याक्ष ,  म.रा.) प्रा. दशरथ वैजनाथ रोडे ( उपाध्यक्ष , म.रा.) विकास पाटील, प्रतिमा चौहान,कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा पेंडसे, . संजय रुपनर,सचिन जाधव,सतीश परदेशी, हेमलता महाले,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील विदर्भ विभागाचे  अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव ( सोनी ) पुरोगामी पञकार संघाकडून आयु सुनील साळवे निवड झाल्याबदल संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधिका-यांच्यावतीने करण्यात आले .

परळी तालुक्याची काळजी वाढली गव्हाणे कौडगाव चा एक संशयीत विलगीकरण कक्षात.

परळी वैजनाथ ;- परळी तालुक्यातील मौजे कौंडगाव येथील एक रहिवासी जयगाव येथे आपल्या पाहुण्याकडे वास्तव्यात आलेल्या एका संशयीताला अस्वस्थ  वाटल्याने अंबाजोगाई येथे विलगीकरन कक्षात भर्ती करण्यात आल्याची माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.
पुणे येथे कामाला असलेला हा व्यक्ती विस दिवसापुर्वी परतुर येथे आला होता परतुर येथुन तो पायी परळी तालुक्यातील कौडगाव येथे आला होता.दहा ते पंधरा दिवसापुर्वी जयगाव आपल्या नातेवाईकाकडे आला आणी परत तो कौडगावला गेला परंतु त्याची अचानक तब्बीयत खराब झाल्याने त्यांने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले परंतु परत त्याला अस्वस्थ  वाटत असल्याने त्याला रविवारी सायंकाळी अंबाजोगाई येथिल विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले असुन त्याचे स्वाॕबचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.दरम्यान जयगाव12 तर कौडगावचे 6 जणांनाची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या हाताला शिक्के मारुन क्वारंटाईन करण्यात आले असुन कौडगाव व जयगाव येथे संशयीताच्या संपर्कात कोण आले आहेत त्याचा आरोग्य विभाग शोध घेतला जात आहे.आरोग्य विभागाने त्या दोन्हीही गावात पुर्णलक्ष केंद्रित केले असुन तेथील नागरिकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.

ग्रामिण भागानंतर जनक्रांती सेनेचे परळीत गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण .

*आपणच माझी प्रेरणा, मी केवळ निमित्त;- बबनभाऊ गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
जनक्रांती सेनेच्या वतिने लॉकडाऊनमध्ये ग्रामिण भागात जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचविल्यानंतर आज परळी शहरातील विविध भागातही जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना वाटप करण्यात आले. दरम्यान आपण माझी प्रेरणा आहात, आपणच मला नेहमीच शक्ती देत आला आहात मी केवळ निमित्त आहे अशी प्रतिक्रिया यावेळी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी दिली.जनक्रांती सेनेच्या वतिने आज परळी शहरातील विविध भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये या दृष्टीकोनातून पहिल्या टप्यात तालुक्यातील 25 पेक्षा अधिक गावात जनक्रांती सेनेच्या वतिने संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी आपल्या सहकार्यामार्फत मदत पोहचवली होती. आज परळी शहरातील श्री खंडोबा मंदिर, किर्तीनगर, कृष्णानगर, सावतामाळीनगर, सिद्धेश्वरनगर, गंगासागरनगर, अशोकनगर, आंबेडकरनगर, नागसेननगर, वाल्मीकीनगर व हालगे गल्ली या भागात जीवनावश्यक वस्तूंचे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी जनक्रांती सेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

*आपणच प्रेरणा देतात*
सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना अनेकांनी घालून दिलेल्या आदर्शवाटेवर मी चालत आहे. आपल्याकडूनच मला अशा कामांची प्रेरणा मिळाली असून भविष्यातही दुर्देवाने असे काही संकट निर्माण झाले तर मी आपल्यासोबत सदैव कायम राहील.

Sunday, April 26, 2020

क्षुल्लक कारणावरून परळीत तलवारी ने नाक कापल्याची घटना .

*  एक जण जखमी, सात जणांना विरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसविरुद्ध आख्ख जग लढत असताना परळीत क्षुल्लक कारणावरून तलवारीनं एकाच नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परळी शहरातील मिलिंद नगरात शनिवारी रात्री ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फारुक खान पठाण असं जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संभाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात तलवार उपसण्यात आली. एवढंच नाही तर चक्क एकाचे नाक कापल्याचा प्रकार घडला आहे. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून तलवारीने रात्री मारहाण केली. तलवारीने फारुखचं नाक कापण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
दरम्यान, घरच्या समोरील कठड्यावर बसू न दिल्याचा राग मनात धरून फारुखवर तलवारीने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध सुरु घेत असल्याची तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी दिली आहे

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वीरशैव समाजातील गरजूंना अन्नधान्य.

* वीरशैव विकास प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
क्रांतीसुर्य, समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आज वीरशैव विकास प्रतिष्ठान परळीच्या वतिने विधीवत पुजा आणि आरतीने साजरी करण्यात आली. दरम्यान जयंतीचे औचित्य साधून वीरशैव विकास प्रतिष्ठानने समाजातील 100 गरजूंना घरपोहंच एक महिन्याचे अन्नधान्य वाटप केले. महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती वीरशैव विकास प्रतिष्ठानच्य वतिने आज आगळया वेगळया उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. सध्या कोरोना आजाराने देशभरात थैमान माजविले असून सुमारे महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने अनेक कुटूंंबांना अन्नधान्याची चिंता निर्माण झाली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मोठ्या उत्साहात होणारा कार्यक्रम रद्द करीत त्यातून वीरशैव समाजातील 100 कुटूंबांना एक महिन्याचे अन्नधान्य थेट घरपोहंच करण्यात आले. या अनुषंगाने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले विविध स्वरूपातील अन्नधान्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमास वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरूजी, प्रा.सुधीर फुलारी, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामभाऊ बुद्रे, महादेव इटके, शिवकुमार केदारी, विकास हालगे, सुशिल हरंगुळे, आत्मलिंग शेटे, राजेश साखरे आदी उपस्थित हेाते.

*लाख मोलाची मदत*

परळीत लॉकडाऊन असल्यामुळे समाजातील हातावर पोट असलेल्या शेकडो व्यक्तींना त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतांना अनेक अडचणी येतात. अशावेळी मदतीचा हात अत्यंत महत्वाचा असून पुढील महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वीरशैव विकास प्रतिष्ठानने आम्हाला दिले असून ही मदत लाख मोलाची आहे अशी प्रतिक्रिया अनेक समाज बांधवांनी व्यक्त केली.

प्राधान्य कुटुंबातील केशरी कार्ड धारकांसह परळीत स्वस्त धान्यापासून कोणीही वंचित राहणार नाही;- धनंजय मुंडे

* ना.धनंजय मुंडे यांनी घेतली तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची एकत्र बैठक.

परळी (दि. २६) -: केशरी कार्ड धारकांची वाढलेली संख्या, तक्रारी, मे व जून महिन्याचे तालुक्याचे धान्य वाटप यासह स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी समजून घेण्याच्या उद्देशाने परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, तहसीलदार व पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली.
दुकानदारांनी उपस्थित केलेल्या समस्यांसह प्राधान्य कुटुंब योजनेतील केशरी कार्ड धारकांच्या स्वस्त धान्य वाटप बाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, तालुक्यात कुणीही धान्य वाटपापासून वंचित राहू नये अशा सूचना यावेळी ना. मुंडेंनी उपस्थितांना केल्या.
तालुक्यात नियमानुसार धान्य वाटप सुरू असून, शासनाकडून येणारे धान्य व प्रत्यक्ष लाभार्थींची वाढलेली संख्या, तसेच केशरी कार्ड धारकांची अडचण यामुळे धान्य वाटप करण्यामध्ये अडचणी येत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक दुकानाच्या जोडीला एक शासकीय कर्मचारी नेमून द्यावा, जेणेकरुन वाटप नियंत्रण व कमीत कमी तक्रारी येतील असे निर्देश यावेळी ना. मुंडेंनी दिले.
उपस्थितांच्या अडचणी व तक्रारी समजून घेत या बैठकीमधून ना. मुंडेंनी धान्य वाटपाबाबत राज्य सरकारने देऊ केलेले नियतन, ऊसतोड कामगारांच्या आगमनानंतर त्यांना द्यायवायचे धान्य, उपलब्ध साठा या सर्वांचा समग्र आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
एप्रिलसह मे व जून महिन्याच्या धान्य वाटपाबाबतही ना. मुंडेंनी केशरी कार्ड धारकांची अडचण सोडवण्याबाबत तहसीलदार विपीन पाटील यांना निर्देश दिले असून, केशरी कार्डधारक, ऊसतोड कामगार, यासह एकही गरजू नागरिक धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये असे निर्देश ना. मुंडेंनी या बैठकीत दिले.
यावेळी तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह परळी नगरपरिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, कृ.उ.बा.स. संचालक सूर्यभान मुंडे, प.स.उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे, जाबेर खान पठाण, किशोर पारधे, सखाराम कराड, चंद्रभान शिंदे, रूस्तूम सलगर, वामन माने, सुभाष बिडकर, नाथराव मुंडे, अंगद फड, सखाराम आदोड, पद्माकर भंडारे यांसह आदी उपस्थित होते.

Saturday, April 25, 2020

केंद्र सरकारने आज काही अटीवर दुकाने सुरू करण्यास परवानगी .

* बार,दारूची दुकाने,सलून बंदच राहणार.

मुंबई : केंद्र सरकारने आज काही अटींवर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी दारूची विक्री करणारी दुकाने,शॉपिंग मॉल्स,शॉपिंग कॉम्प्लेक्स,सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद राहणार आहेत.कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने  उघडण्यास परवानगी दिलेली नाही,तर ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे,असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

आजपासून कोणती दुकाने सुरु होणार

* ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु राहतील
* शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी * सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
*ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
*लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
* दुकाने केवळ ५० टक्के कर्मच-यांसह आणि * सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.
  * कोणती दुकाने बंदच राहणार

* दारुची दुकाने बंदच राहतील
* कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
* शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स  उघडणार नाहीत
* सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, * व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
*सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद
* महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
* मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील

महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती घरच्या घरीच साजरी करावी-महादेव इटके

* कोरोना लाॕकडाउन च्या पार्श्वभूमीवर समाज बांधवाचा निर्णय.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
सध्या सर्वत्रच कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव यावर्षी वीरशैव लिंगायत समाजाने घरच्या घरीच साजरा करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके यांनी केले आहे. 
दरवर्षी परळी शहरासह देशभरात अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो. मात्र यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच समाज बांधवांनी अक्षय तृतीयेला म्हणजे 26 एप्रिल रोजी एकाच वेळी दुपारी बरोबर 12.01 वाजता आपापल्या घरासमोर रांगोळी काढून घरावर  भगवा ध्वज उभारून गळयात रुमाल घालून आपल्या सर्व परिवारासह महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी. पुष्पहारासाठी घरी फुले उपलब्ध असल्यास तयार करा अन्यथा हार आणण्यासाठी बाहेर जाऊ नका, असेही सांगण्यात आले. समाज बांधवांनी सरकारच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके  यांच्यासह शहराध्यक्ष नितीन समशेट्टे, तालुका सचिव विकास हालगे, वधू वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष शामभाऊ बुद्रे, माजी अध्यक्ष अश्विन मोगरकर, विकासअप्पा हालगे, माजी नगरसेवक रमेश चौंडे , नरेश पिंपळे सचिन स्वामी, दत्ता गोपनपाळे शिवकुमार चौंडे, प्रकाश खोत , अनिल चौंडे आदींनी केले आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही-;उदय सामंत


* व्हीडीओ काॕन्र्फसच्या माध्यमातुन  राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरू शी चर्चा .

मुंबई – राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
श्री.सामंत यांनी आज सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला.
            श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे, आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.
विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा सुरु करणार
कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा सर्व विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती करण्यात येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. हा अभ्यासक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 साठी देवून सहकार्य करावे असे, आवाहन श्री. सामंत यांनी केले
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज  माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांनी सहभाग घेतला.

Friday, April 24, 2020

अल्लाह ची उपासना सर्वांना या संकटातून बाहेर काढणारी ठरो - माहे रमजान च्या धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा.


*नमाज व ईफ्तार कुटुंबियांसोबत घरातच अदा करण्याचे आवाहन.

परळी (दि. २४) ---- : आजपासून (दि.२५) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र महिन्यात अल्लाहची उपासना देशासह जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढणारी ठरावी असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच या पवित्र महिन्यात करण्यात येणारे नमाज पठण, ईफ्तार आदी धार्मिक विधी घरातच आपल्या कुटुंबियांसमवेत करावेत असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.
एकीकडे सबंध जग कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीशी लढत असताना विविध धर्माचे अनेक सण उत्सव या दरम्यान होऊन गेले. भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. याप्रसंगी संस्कृतीचे व आनंदाचे आदानप्रदान होत असते. परंतु कोरोना मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम, सामूहिक कार्यक्रम आदी सर्वांना दुर्दैवाने बंदी घालावी लागते आहे. 
अशा परिस्थितीत आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून या काळात मुस्लिम समाज बांधव कडक उपवास करत अल्लाहची उपासना करतात. समाजाला हर्षोल्हास व एकजूट प्रदान करणाऱ्या या पवित्र उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने विशेष नियमावली आखून दिलेली आहे. 
सर्व समाज बांधवानी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नमाजसाठी मस्जिद मध्ये एकत्र येण्याऐवजी आपल्या कुटुंबियांसोबत आपापल्या घरातूनच एकत्र नमाज अदा करून ईफ्तार घ्यावा, असे आवाहन करत आपली उपासना देशाला कोरोनाच्या भीषण संकटातून काढणारी ठरावी अशा शब्दात ना. मुंडेंनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्तव्यदक्ष पालकत्व व प्रशासनाच्या कडक काटेकोर नियोजनामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने .


*पालकमंञी ना.धनंजय मुंडे ,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या प्रयत्नांना यश.

“कोरोना” या महामारीला संपुर्ण विश्व झुंज देत आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा दैनंदिन वाढत आहे.महाराष्ट्रात 6 हजाराच्यावर कोरोनाग्रस्तांचा धक्कादायक आकडा वाढला आहे.देशात सर्वात जास्त संख्या असलेलं आपलं राज्य बनलं आहे.मृतांचाही आकडा दररोज वाढतोय. शासन, प्रशासनासमोर मोठं संकट निर्माण झाले आहे.
बीड जिल्हयासाठी पालकमंञी म्हणुन लाभलेले ना.धनंजय मुंडे हे लाॕकडाऊनच्या सुरुवाती पासुनच जिल्ह्यात तळ ठोकुन आहेत.राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन यांनी जाहिर केलेल्या लाॕकडाऊनच्या संदर्भातील सुचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत सातत्याने संपर्कात राहुन नियोजनबध्द नियम पालनामुळे आपण कोरोनाला हरवु शकतो हे सिध्द केले आहे.दरम्यान लाॕकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपासमारीचा बळी पडु नये यासाठी जिल्ह्यात रेशन पुरवठा विभागाला दिलेल्या सुचना अतिशय महत्वाच्या ठरत आहेत. जिल्ह्यात वास्तव्यात असलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केलेच परंतु उसतोडीसाठी बाहेर गेलेल्या उसतोड मजुरांना जिल्ह्यात आणि आपल्या घरी परत आणण्यासाठी शासन दरबारी केलाला प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला आहे. धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या वतिने गहु,तांदुळ,तेल,साखर,साबण, चहा पत्ती अशा जीवनावश्यक विविध वस्तुंचे वस्ती तांड्यावर असलेल्या गरजवंताना वितरण करुन खरं पालकत्व काय असतं हे निदर्शनास आणुन दिले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या फळ-भाज्या विक्रीसाठी या लाॕकडाऊनच्या नियमावलीमुळे अडचण निर्माण झाली होती तेंव्हा स्वतः च शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला खरेदी करुन गरजुंना वितरीत केला. अशा संवेदनशील ना.धनंजय मुंडेंच्या या विवेकी प्रयत्नामुळे लाॕकडाऊन काळात ही जिल्हा समाधान व्यक्त करत आहे.
अहमदनगर येथील कोरोना बाधित असलेल्याशी संपर्कात आलेला आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती पाॕझिटिव्ह आला होता.त्यामुळे जिल्हा हादरला होता. पालकमंञी म्हणुन प्रशासनाला परत सतर्क राहण्याच्या सुचना ना.धनंजय मुंडे यांनी देऊन आष्टी तालुक्यातील पिंपळगाव व परिसरावर लक्ष केंद्रित केले. तो रुग्ण ज्या गावात वास्तव्यास आला त्या परिसराला सिल करुन प्रत्येकाच्या चाचण्या करण्याच्या सुचना देऊन कोरोना टेस्ट केल्या परंतु सुदैवाने एकही बाधीत आढळुन आला नाही. शिवाय जो पाॕझिटिव्ह होता त्या रुग्णांच्या दोन्हीही टेस्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा समाधान व्यक्त करत आहे.महसुल,पोलिस आणि आरोग्य प्रशासनाला योग्य सुचना आणि प्रशासनाने केलेल्या नियोजनाला आलेले हे यश आहे. यापुढेही जिल्हावासीयांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन योग्य पध्दतीने केल्यास कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव करता येणार नाही.पालकमंञी ना.धनंजय मुंडे ,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या प्रयत्नांना यश येत आहे.नागरिकांनीही कोरोनाला हरवण्यासाठीच्या संघर्षात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

Thursday, April 23, 2020

बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण न करण्याचे आदेश.

बीड दि.23 कोरोना विषाणू संसर्गाच्या?  पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून  दि.1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त  कोणत्याही शाळेत ध्वजारोहण करु नये असे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पाठवले आहेत. 
बीडचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की,  कोरोना (कोवीड 19) चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणुन दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनी कोणत्याही शाळेत ध्वजारोहण करण्यात
येऊ नये. या बाबत आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे असे पत्र त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे. त्याचबरोबर दि. 1 मे 2020 नंतर शाळांना सुटटया असल्या तरीही कोवीड -19 प्रादुर्भाव टाळण्यास जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्याप्रमाणे कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडु नये, या बाबत आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. तरी आपल्या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उपरोक्त आदेशा प्रमाणे योग्य त्या सुचना द्याव्यात असेही शिक्षणाधिकारी बहिर यांनी म्हटले आहे.

जमाते ए इस्लामी हिंद च्या वतिने परळी येथे सफाई कामगारांचा सन्मान .

परळी (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने उत्तम प्रयत्न होत आहे. तसेच परळी नगर परिषदेच्या वतीने ही स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे.
स्वच्छता ठेवण्याचे महत्त्वाचे काम सफाई कामगार करत आहे. सफाई कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामे करत आहे. अशा स्वच्छता कामगारांचा पेठ मोहल्ला परिसरातील नागरिकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
या स्वच्छतादूतांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
जमात ए इस्लामी हिंद व मूव्हमेंट फाॅर पिस अॅन्ड जस्टीस या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने न.प. च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सय्यद सबाहत अली, सय्यद उमेर, शेख मुदस्सीर, सय्यद वजाहत अली, सय्यद मजहर, सय्यद इम्रान, सय्यद इरफान, अब्दुल गणी यांच्या पुढाकाराने सत्काराचे आयोजन करण्यात आले.

अ.भा वारकरी मंडळाची सामाजिक बांधिलकी. न.प. कर्मचारी, पेपर वितरक, हॉटेल कामगारांना केले मास्कचे वाटप.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
राज्य व देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी परळी शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांना अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.
आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखा परळी वैजनाथच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते परळी शहरातील नगर परिषदेतील सफाई कामगार, वर्तमानपत्र वितरक, हॉटेल कामगार यांना सोशल डिस्टसिंगचे पालन करून मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना अ.भा. वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की, अ.भा. वारकरी मंडळ शाखा परळी वैजनाथ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून वारकरी मंडळाने मास्क वाटपाचा घेतलेला कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अ.भा. वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष विश्वंभर महाराज उखळीकर, तालुका सचिव विश्वास महाराज पांडे, शहराध्यक्ष अशोक महाराज कराळे, शहर सचिव ज्ञानेश्वर महाराज कतारे, सुरेश महाराज मोगरे, अविनाश महाराज शिंदे, वृक्षराज महाराज आंधळे, गोविंद महाराज नंदनजकर, महादेव महाराज उखळीकर यांच्यासह वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, April 22, 2020

पंकजाताई मुंडे यांनी बाहेरगावी राहणा-या परळीतील गरजूंनाही पोहोचवले रेशन.

*ताई, 'तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय...आम्हीच कमी पडलो'! नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.

परळी दि. २२ ----- केवळ परळी शहरातीलच नव्हे तर  मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी शहरांत रोजगार आणि कामधंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्या परळी  मतदारसंघातील गरजू नागरिकांनाही  पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रेशन व जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या. या मदतीने भारावून गेलेल्या रहिवाशांनी ताई, 'तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय...आम्हीच कमी पडलो'! अशा भावना व्यक्त केल्या.

   कोरोनामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आपल्या माणसांना मदत  व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे सध्या विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. साखर कारखाना परिसरात अडकून पडलेल्या लाखो ऊसतोड कामगारांना त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज सुरक्षितपणे घरी जाता आले आहे. प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाखाची मदत असो की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील गरजूंना रेशनचे वाटप असो, त्यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. 

*बाहेरील गरजूंना रेशन* 
--------------------------
परळी मतदारसंघातील अनेक लोक मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी भागात रोजगार अथवा छोटे  व्यवसाय करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवतात अशा रहिवाशांना सध्या कोरोनाचा फटका बसला आहे. संचारबंदीमुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे त्यांचेकडील असलेले अन्नधान्य संपले, अशा संकटकाळात त्यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधला आणि क्षणाचाही विलंब न करता पंकजाताईनी त्यांच्यापर्यत रेशन व आवश्यक वस्तू पोहोचविल्या. नागपिंप्री येथील दत्तू सांगळे, बाबूराव मुगले, ज्ञानेश्वर ढाकणे आदी सिन्नर येथे रहातात. मुंबईच्या जासई, उरण, पनवेल आदी ठिकाणी हाळम, हेळमचे हनुमंत दहिफळे, शिवाजी दहिफळे, ज्योतीराम गुट्टे, माधव होळंबे आदी १८ कुटुंब, पुण्याच्या औंध, सांगवी  येथे वडखेल येथील वास्तव्यास असलेल्या २५ कुटूंबिय या सर्वांपर्यंत पंकजाताई मुंडे यांनी रेशन पोहोचविले. 

*ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच कमी पडलो!*
------------------------‐--
पंकजाताई मुंडे यांनी पाठवलेली मदत मिळाल्यानंतर रहिवाशांना आपल्या भावना अनावर झाल्या. 'ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच चुकलो, सरकार असताना तुम्ही आमच्यापर्यंत किती पोहोचवत होतात आणि आता सरकार नसतांनाही तुम्हीच देत आहात, आम्हीच कमी पडलोत' अशा शब्दांत  कुटूंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
••••

कोरोनाशी लढण्यासाठी परळी नगर परिषदेचे आणखी एक पाऊल पुढे.

*सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी स्प्रिंकलर मशीन परळीत दाखल!

परळी (दि. २२) - : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी परळी नगर पालिका सज्ज असून सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 
नगर परिषदेने सोडिअम हायकोक्लोराईड व जंतू नाशक फवारणीसाठी नवीन स्प्रिंकलर मशीन नुकतीच आणली असून आजपासून प्रत्यक्ष फवारणीला सुरुवातही करण्यात आली आहे. 
या मशिनद्वारे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व निर्जंतुकीरण करण्याच्या हेतूने फवारणी करण्यात येणार आहे. आज या मशीनचे परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंडे व न.प. स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर पारधे यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी राजा खान, संतोष रोडे, हाजी बाबू, माऊली मुंडे, शंकर साळवे श्रावण घाटे आदी उपस्थित होते. 
ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे, गटनेते श्री वाल्मिक अण्णा कराड यांच्या चोख नियोजनातून याअगोदर परळीत स्वछता समिती मार्फत सॅनिटायझर, जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. आता या विशेष स्प्रिंकलर मशिनद्वारे शहरात सोडिअम हायको क्लोराईड फवारणी करण्यात येत असल्याचे न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर पारधे यांनी सांगितले.

कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकाचा दावा.

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) जगातल्या 180 पेक्षा अधिक देशांत कोरोनाने आपले हातपाय पसरले असतांना अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणू मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोना पीडित देश मोठ्या दहशतीखाली असतांना अशातच जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. आणि आता डेली यु. के. मेल या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार गुरूवारी लोकांवर ती लस टोचली जाणार आहे असे एका ट्विटर द्वारे केली आहे.
डेली यु. के. मेल या वेबसाईटने ट्विट करत म्हटले आहे की, “ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विकसित होणारी कोरोना व्हायरसच्या लसीची गुरूवारी लोकांवर चाचणी केली जाईल”.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. आपल्या टीमने कोविड 19 म्हणजेच कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लसीचे 10 लाख डोस उपलब्ध होतील.
दरम्यान, जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर कोरोनाने लाखो माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. अशात जर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विकसित होणारी कोरोना व्हायरसवरची लस गुरूवारी माणसांवर यशस्वी झाली तर फार मोठा दिलासा संपूर्ण जगाला मिळणार आहे.या लस च्या चाचणी बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

धक्कादायक : मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण.

मुबंई : राज्यात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्या-या फिल्डवर कार्यरत असलेल्या सुमारे १६७ पत्रकारांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून,त्यामध्ये मोठ्या संख्येने पत्रकारांचे अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यापासून काही माध्यमातील पत्रकार आजही फिल्डवर आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.खबरदारी म्हणून मुंबईतील फिल्डवर काम करणा पत्रकार,फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. विविध माध्यमात कार्यरत असणा-या एकूण १६७ पत्रकारांची गेल्या गुरूवारी कोरोना चाचणी करण्यात आली. एकूण १६७ पत्रकारांच्या चाचण्या मधील काही पत्रकारांचे चाचणी अहवाल आज आले असून, त्यापैकी ५३ पत्रकार पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी काही पत्रकारांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे असल्याचे सांगण्यात येते.

Tuesday, April 21, 2020

शिधापत्रिकाधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.

बीड  ;- रेशन कार्ड ( शिधापत्रिका )पोर्टेबिलिटीसाठी दुकानदारांच्या अंगठ्याचा सॉफ्टवेअरमध्ये बंद करण्यात आला आहे.    पोर्टेबिलिटी म्हणजे रेशन कार्ड धारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य मिळवू शकतो. परंतु रेशनकार्ड धारक अजूनही अंगठा वापरुन रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात.
परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जेव्हा कार्ड धारकाचा अंगठा वापरला जातो तेव्हा स्वस्त धान्य दुकान मालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की अंगठा साबणाच्या पाण्याने किंवा सेनिटायझर व्यवस्थित स्वच्छ केला गेला आहे.

मुंबई,पुणे आणी कंटेनमेंट झोन वगळता राज्यात सर्वत्र वर्तमानपत्र घरपोच मिळणार.

मुंबई : मुंबई,पुणे आणि करोग्रस्त कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील सर्व भागात वर्तमानपत्रे घरपोच वितरण करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळे तब्बल महिन्याभरानंतर  वाचकांच्या घरापर्यंत वर्तमानपत्रे पोहचणार आहे.राज्य सरकारने वृत्तपत्र वितरणास परवानगी दिली होती मात्र घरपोच वितरण करण्यास मनाई केली होती.
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू करताना केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. राज्य सरकारने यातून वृत्तपत्रे घरपोच वितरणास परवानगी नाकारली होती.या निर्णयानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विविध वर्तमानपत्रांच्या संपादकांशी चर्चा केली. त्यावेळी या संपादकांनी वर्तमानपत्रे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.यासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने आपला निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. राज्यभरात  वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील. मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

सुरक्षित अंतरच कोरोना आजारापासून आपल्याला दुर ठेवेल ; - संजय केंद्रे

* ग्रामपंचायतच्या उपाययोजनाला आपले सहकार्य अपेक्षित-सरपंच सौ.कोकाटे.

परळी (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचे संक्रमण हा जागतिक आजार असून या आजारापासून दुर राहण्यासाठी एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवणे हाच महत्वाचा उपाय ठरणार आहे. शासन आपल्याला या आजारापासून दुर ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असून प्रशासनाच्या नियमांना प्राधान्य द्या असे आवाहन परळी पं.स.चे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले.
संंगम ता.परळी येथे उमेद अभियान अंतर्गत भरारी महिला ग्रामसंघ संगम यांच्या वतिने व्हीआरएफ निधीमधून विधवा, एकल, गरीब महिलांना एक ग्रामसंघ अध्यक्ष, सीआरपी, कृषि सखी, सर्व केडर व गटातील महिला यांच्या वतिने सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे व गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या उपस्थितीत मास्क वाटप तसेच विधवा व एकल गरीब महिलांना एक महिन्यांचे अन्नधान्य वाटप करण्यात आले. उपसरपंच हनुमंत कामाळे, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक सचिव हरनावळ, तालुका व्यवस्थापक मुंडे, सुरज सोनवणे, वीर गट ग्रामसंघाचे अध्यक्ष, सीआरएफ, कृषी सखी, सर्व केडर व गटातील महिला  तसेच ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे उपस्थित होते. सॅनिटायझरचा वापर, मास्कची आवश्यकता, सुरक्षित अंतर याबाबत गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या गावात कोरोना बाधित असलेल्या रेड झोनमधील गावातून कोणी येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच असा कोणी प्रवासी येत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला दिली जावी असेही आवाहन केंद्रे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर आम्ही आवश्यक असलेल्या उपाययोजना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितच करीत आहोत परंतू नागरिक म्हणून आपलेही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे असे मत सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी व्यक्त केले. गावकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांसोबत संवाद करावा, घराबाहेर असताना मास्कचा वापर आवर्जुन करावा तसेच आपल्या गावाची काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत जमावबंदी व संचारबंदीचे सुधारित आदेश जारी ;-जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

*कोविड१९ च्या आवश्यक उपाययोजनां सह काही सेवा व आस्थापनांना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी.

बीड, दि.21:- जिल्‍हयात आजपासुन 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत नागरी, ग्रामीण तसेच औद्यो‍गिक क्षेत्रात राहूल रेखावार, जिल्‍हादंडाधिकारी बीड यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्‍वये जमावबंदी व संचारबंदी सुधारित आदेश जारी केले आहेत. यानुसार काही सेवा व आस्थापनांना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यांनी कोविड१९ च्या आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाने ठरवुन दिलेला किमान चारफूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
राज्‍य शासनाच्या सूधारीत सूचनेनूसार 20 एप्रिल ते दिनांक 3 मे 2020 पर्यंत अंमलात असणारे निर्देश दिल्याने पुर्वी घोषित केलेल्या नियमावलीसह पुढील नियमावली आणि उपाययोजना लागू करीत आहे. या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. पूर्वी कामे चालू ठेवण्यास शिथीलता दिलेल्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांनी घरातच राहावे. पूर्वीच्या आदेशाने 3० एप्रिल 2020 पर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले होते त्यात 3 मे 2020 पर्यंत वाढ झाली आहे. या आदेशामध्ये अत्यावश्यक कामासाठी बाहेर येताना सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत असे सूचित केले आहे. परिशिष्‍ट – 1 नुसार राष्‍ट्रीय निर्देशाची अंमलबजावणी व परिशिष्‍ट – 2 नुसार सर्व कार्यालये, कार्यस्थळे, कारखाने आणि आस्थापनां मध्‍ये खालील उपाय योजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.
आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती,संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल.

आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य ;– पालकमंत्री धनंजय मुंडे

*२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश.

* जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपन्न.

बीड, दि. २१ :- कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
यावेळी राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग सह खबरदारी पाळत कापूस खरेदी केंद्रांवर येत्या २३ तारखेपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश ना. मुंडेंनी दिले. तसेच हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी दोन दिवसाच्या आत ग्रेडर नेमण्याचे आदेशही ना. मुंडेंनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील हे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, करोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम झाले आहे परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, या प्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली जावी असे ते म्हणाले. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना श्री. मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या.
मंत्री महोदयांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नये यासाठी लक्ष दिले जावे . अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरु होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे.
शेतकऱ्यांच्या बाबत देखील संवेदनशील राहून उपाययोजना केल्या जाव्यात , फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयीस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावे, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री . रेखावार म्हणाले की, रेशन कार्डधारकांसाठी मंजूर धान्य नियतन सर्व स्वस्त धान्य दुकानात पर्यंत पोहोचविण्यात आले आहे याच बरोबर साखर चे नियतन देखील जिल्ह्यात प्राप्त झाले असून एप्रिल ते जूनपर्यंते पात्र लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. कोरोना विषाणूची नमुने तपासण्यासाठी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत तयार होत असून त्यासाठी यंत्र व साहित्य सामग्री देखील लवकरच प्राप्त होत आहे.
पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी आज दुपारपर्यंत जिल्ह्यात 6740 ऊसतोड कामगार आले असल्याचे आकडेवारी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार , डॉ .थोरात डॉ .पवार व श्री. आघाव पाटील आदींनी यावेळी माहिती सादर केली.

गुणवत्तापूर्ण शिक्षणसोबत तडजोड मान्य नाही-; अ.भा.वि.प

*राज्यात उच्चशिक्षणातील परीक्षा घेण्यात याव्यात-; स्वप्नील बेगडे

लॉक हाऊन परिस्थितीमध्ये राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण क्षेत्रे बंद आहेत त्यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संकुल बंद आहे. सध्याचा काळ परीक्षेचा काळ असतानाही कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महामहिम राज्यपाल महोदयां सोबत राज्यातील सर्व कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे येणार व त्यातून एक
कुलगुरुची समिती परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती, या कुलगुरू समितीने राज्यामध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय केला आहे याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करत असल्याचे अभाविपचे प्रदेश मंत्री श्री. स्वप्रिल बेगडे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत अभाविप तडजोड करणार नसल्याचे श्री. स्वप्नील बेगडे यांनी सांगितले मुंबई, पुणे,संभाजीनगर, नागपुर, नाशिक या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असले तरी राज्यातील काही जिल्हे कोरोना मुक्त आहेत. त्यामुळे परीक्षेचे धोरण ठरवताना राज्यातील या सर्व बाबींचा विचार करावा, या प्रकारचे निवेदनही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना दिले आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन उठल्यानंतर परीक्षा घेताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत या प्रकारच्या सूचनाही अभाविप ने केल्या आहेत त्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

सूचना:

१) लोकडाउन संपल्यानंतर लगेच महाविद्यालये सुरू न करता ती केंद्रीय मंत्री परिषदेने सुचवलेल्या निर्देशानुसार मे महिन्याच्या १६ तारखेपासून सुरू करावीत.
२) सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ वगळता अन्य सर्वच विद्यापीठांची परीक्षा एकाच ठराविक वेळेत घेण्यात याव्यात, जेणेकरून निकाल लावणे व पुढील शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू
होण्यास मदत होईल.
३) विद्यापीठांच्या सर्व वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, कोणतीही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेऊ
नये कारण, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
४) अचानक आलेल्या परिस्थितीमुळे Regular teaching hours पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे अनेक
विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर वर्षाचे अभ्यासक्रम हे पूर्ण शिकवून झालेले नाही हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस ही घेण्यात आले परंतु नेट कनेक्टिव्हीटी व विद्याध्यांचा सहभाग यावर मतांतरे आहेत.
५) विद्यार्थ्यांनी आपले सर्व शैक्षणिक शुल्क भरलेले असताना त्यांना त्यांचे शिक्षण मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे त्यामुळे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे बुडालेले Teaching Hours भरून काढून अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करावेत व त्यानंतर परीक्षा घ्याव्यात. या धोरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून
राहण्यास मदत होईल शक्य असल्यास आता लॉकडाऊन दरम्यान अन्य शिकवणी पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तसेच उर्वरित अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू झाल्यावर पूर्ण करण्यात यावा,
६) प्रात्यक्षिक, Internal Assignment Project देण्याकरिता पुरेसा वेळ देण्यात यावा परीक्षा घेताना सोशल
डिस्टन्स चा विचार व्हावा.
७) महाविद्यालये सुरू झाल्या नंतर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता तो कमी करण्यासाठी टप्या-टप्याने परिक्षा घेण्याची योजना व्हावी.
उदा. प्रथम, द्वितीय, वर्ष परीक्षा अगोदर नंतर पदवी व पदव्युत्तर वर्ष असे.
८) पुढील विविध कोर्स प्रवेश व भविष्यातील रोजगारांची संधी लक्षात घेता महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बोलवावे व त्यांचे राहिलेली शिकवणी सुरू करावी.
जेणेकरून तुलनेने कमी असलेले अंतिम वर्ष विद्यार्थी संख्या लक्षात घेता त्याचा सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन परिस्थिती हाताळण्यासाठी मदत होईल.
९) अतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास व निकालास यायला लागणारा 30 ते 45 दिवसांचा वेळ व सध्याची भूतो न
भविष्यती परिस्थिती लक्षात घेता प्रथम व द्वितीय वर्षाप्रमाणे सध्या सत्राच्या अंतिम वर्षांच्या अंतर्गत प्रात्यक्षिक
व लेखी या सर्व परीक्षा विद्यार्थी शिकतो त्याच महाविद्यालयात घेण्यात येऊन त्या विधेच तपासणीची योजना
व्हावी, जेणेकरून परीक्षा व निकाल वेळेत येण्यास मदत होईल सोबत कोरोना संसर्गाचा धोका कमी उद्भवेल
यात परीक्षा प्रश्नपत्रिका नेहमीप्रमाणे विद्यापीठाने तयार करावीत.
१०) संख्येने अधिक असणारी प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा काही ठिकाणी सुरु झालेली असली, तरी
विद्यार्थी आरोग्य हित बघता राज्यात सरसकट 20 मे नंतर परीक्षा सुरू करावी. कारण तोपर्यंत कोरोनापा
प्रादुर्भाव ही थांबेल अशी अपेक्षा आहे. तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक यंत्रणा या आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य
करण्यास सक्षम होत असतील त्यामुळे त्याचा विद्यापीठांवर ताण ही येणार नाही..
११) प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा या ५० गुणांच्या घेवून त्यांचे १०० गुणांमध्ये रूपांतर कराये. अशा परीक्षा
पॅटर्नमुळे परीक्षा कमी दिवसात व वेळेत होतील व त्याचा निकाल ही लवकर लावण्यास मदत होईल.
१२) दूर व मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता राज्याच्या परीक्षांचे वेळापत्रक
बनविताना अन्य सामान्य परीक्षा प्रमाणे त्यांचाही विचार होऊन त्याही वेळेस घेण्यात याव्यात,
१३) जून महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण झाल्या नंतर जुलै मध्ये निकाल येवून पुढील शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया
जुलै महिन्याच्या मध्यापासून सुरु करता येईल. व पुढील शैक्षणिक वर्ष ऑगस्ट मध्ये सुरू करण्यास अडचण
येणार नाही.
१४) सदर धोरणा नंतर पुढील शैक्षणिक वर्षात शिकवणी दिवस कमी होतील, त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रातील
सुट्टी कमी करून ते दिवस भरून काढण्याची योजना करता येईल.
१५) मुंबई परिसरे, पुणे, नागपूर सारख्या अति संसर्गित असलेली शहरे व जिल्ह्यांतील लॉकडाउन ३ मे नंतर ही
वाढला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य हित सर्वोतोपरी समोर ठेऊन या ठिकाणाच्या परीक्षा थेट जून महिन्यातच
घेण्यात याव्यात.
या सूचनांचा विचार करून राज्यातील पुढील परीक्षा धोरण ठरवावे अशा प्रकारचे निवेदन अभाविपच्या वतीने
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना देण्यात आले असल्याचे प्रदेश मंत्री श्री स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.

संचारबंदीच्या काळात चालू ठेवले स्टोन क्रेशर.मंडळ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून परळी ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल.

परळी (प्रतिनिधी) कोरोना  आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आणि देशभरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक व्यक्ती एकाच जागेवर जमणार नाहीत किंवा काम करणार नाहीत अशी काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून लॉकडाऊनच्या काळात स्टोन क्रेशर परळी तालुक्यातील मौजे दाऊतपुर येथे चालू होते. याबाबत मंडळ अधिकारी सुधाकर पुजदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी देविप्रसाद चुन्नीलाल पांडे या स्टोन क्रेशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दि.20 मार्च रोजी केंद्र सरकारचे कामगार सचिव यांनी सर्व औद्योगिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी कटाक्षाने लॉकडाऊन पाळला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या स्टोन क्रेशर चालू होते. मौजे दाऊतपुर येथील ही घटना असून याबाबत कलम 188, 269, 270 भादंवि व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, 51 (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 17 व महाराष्ट्र कोविड -19 उपाय योजना 2020 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक धाईजे यंाच्याकडे देण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संदर्भात चालू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करून स्टोन क्रेशर चालक देविप्रसाद चुन्नीलाल पांडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मानवी जीव धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरवल्या प्रकरणी परळी ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी, बीड यांच्या कोरोना विषाणु संदर्भाने चालू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करून तसेच त्यंानी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मानवी जीव धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव माहित आहे असे असुन सुद्धा स्टोन के्रशन अनाधिकृतपणे चालू ठेवून जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी परळी ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो.ना./1494 धाईजे हे करीत आहेत.