Wednesday, March 18, 2020

मांडेखेल शिवारात विजपडुन एका शेतकऱ्यांचा मृत्यू तर एक जख्मी.

परळी वैजनाथ ;(प्रतिनीधी )
परळी तालुक्यातील मौजे मांडेखेल शिवारात ज्वारी खुडत असणाऱ्या चुलत्या पुतण्याच्या अंगावर विज कोसळुन एकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जख्मी झाल्याची आज सायंकाळी दुर्दैवी घटना घडली आहे
परळी तालुक्यात चार पाच वाजण्याच्या सुमारास वादळी व विजेच्या कड कडासह अवकाळी पाऊस झाला.त्यातच मौजे मांडेखेल परिसरात आपल्या शेतात ज्वारी खुडण्याचे काम करित असलेले शेतकरी सुधाकर आश्रोबा नागरगोजे वय 38 व त्यांचे पुतणे नागनाथ अंगद  नागरगोजे 15 वय यांच्या अचानक अंगावर विज कोसळुन यात सुधाकर नागरगोजे यांचा मृत्यू तर नागनाथ नागरगोजे गंभिररित्या जख्मी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन मयत सुधाकर नागरगोजे यांना शवविच्छदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असुन जख्मी पुतण्यास परळी येथील खाजगी दवाखा न्यात दाखल करण्यात आले.असुन मौजे मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment