*स्वयंवर पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त-सौ.सरोजनी हालगे*
*वीरशैव विकास प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम-दत्ताप्पा ईटके*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र वीरशैव सभा, वीरशैव विकास प्रतिष्ठान व वीरशैव समाज परळी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.1 मार्च रोजी परळी येथील श्री संत गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) येथे वधु-वर परिचय मेळाव्यानिमित्त स्वयंवर स्मरणिकेचे प्रकाशन केदारनाथ येथील महातपस्वी रामानंदजी महाराज व बद्रीनाथ येथील स्वप्रकाशानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभेचे बीड जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी व परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी सोमनाथअप्पा हालगे यांची प्रमुख उपस्थिती होती. परळी येथील श्री संत गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) येथे रविवार दि.1 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता वधु वर व पालक परिचय मेळाव्यानिमित्त स्वयंवर या नावाने सुबक व आकर्षक अशी वधु वरांचे रंगीत छायाचित्रांसह त्यांची संपूर्ण माहिती असलेले पुस्तक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. यावेळी केदारनाथ येथील महातपस्वी रामानंदजी महाराज व बद्रीनाथ येथील स्वप्रकाशानंद महाराज यांनी या स्मरणिकेचे कौतुक केले. तसेच परळी येथील वीरशैव समाजाच्या वतिने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी यांनी वीरशैव विकास प्रतिष्ठान,परळी वधु वर परिचय मेळावा घेवून त्यानिमित्त स्मरणिका गेल्या 5 वर्षांपासून प्रकाशित करीत आहे. राज्यभरात या उपक्रमाचा वीरशैव समाज (सर्व पोटजातींसह) तील वधु वर असलेल्या पाल्यांच्या पालकांना फायदा होत आहे. त्यात असलेली अधिकृत माहिती त्यांना लाभदायी ठरतांना दिसत आहे. वीरशैव विकास प्रतिष्ठान हे विद्यार्थी, वृद्ध, निराधार व समाजातील दुर्बलांना वेगवेगळया पद्धतीने आर्थिक मदत करीत असते. त्याचा अनेकांना मोठा लाभ होत असतो असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. परळी शहराच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी सोमनाथ अप्पा हालगे यांनी समाजात चालू असलेल्या विविध उपक्रमात शहरातील सर्व समाज बांधव हिरीरीने सहभाग घेत असल्याचे मी अनेक वर्षापासून पाहत आहे. परळी येथील वीरशैव समाज वधु वर पालक परिचय मेळाव्यासह इतरही अनेक उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. शहरात झालेल्या अनेक धार्मिक व सामाजिक कार्यात सर्वात पुढे वीरशैव समाजच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास विस्तार अधिकारी उमाकांत हुंडेकरी, उद्योजक शाहुराव ढोबळे, प्रा.सुधीर फुलारी, रंगनाथअप्पा ईटके, महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हा चिटणीस आत्मलिंग शेटे, महात्मा हात्ते, चंद्रकांत हुंडेकरी, संतोष पंचाक्षरी रमाकांत तोडकरी, प्रभुअप्पा कापसे, भारत फडकरी, जगन्नाथ साखरे, सचिन पोखरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वधु वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष शामभाऊ बुद्रे, महादेव ईटके, शिवकुमार केदारी, महेश निर्मळे, विकास हालगे, संजय स्वामी, प्रभाकर वेरूळे, पत्रकार संजय खाकरे, रविंद्र नंदीकोले, चंद्रकांत उदगीरकर, शिवशंकर झाडे, रमेश चौंडे, सचिन स्वामी नरेश पिंपळे, संजय कोरे, शिवकुमार चौंडे, सुशिल हरंगुळे, नरेश साखरे, प्रमोद राजमाने, वैजनाथ शेटे, नितीन हालगे, प्रकाश खोत, कृष्णा बेदरकर आदीनी प्रयत्न केले.
*स्वयंवर स्मरिकेसाठी संपर्काचे आवाहन*
वीरशैव समाज, वीरशैव विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतिने आयोजित स्वयंवर स्मरणिका वधु वर व त्यांच्या पालकांना सुलभतेेने मिळण्यासाठी शिवकुमार केदारी, सुरभी बॅग सेंटर 9075117774 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन परळी वीरशैव विकास प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment