समाजकारण करत-करत राजकारण करणारे अनेक जण आहेत मात्र राजकीय कुटुंबात जन्माला येऊन राजकारणा पेक्षा समाजकारण करणारा , सामाजिक प्रश्नांसाठी झगडणारा एक सच्या मनाचा प्रामाणिक युवा नेता मात्र नेत्रत्वाशी प्रामाणिक असणारा व आपल्या स्वभावाने विरोधकांची ही मने जिंकणारा एक कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
या पृथ्वीतलावर यश प्राप्त करण्यासाठी मेहनत,चिकाटी आणि संघर्ष कोणत्याच यशस्वी माणसाला चुकलेला नाहीय मग त्यातून प्रा पवन मुंडे कसे सुटतील,वडील ऍड माधव मुंडे एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात मोठे प्रस्त होतेच स्व गोपीनाथ मुंडे व माधव मुंडे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा महाविद्यालयीन जीवनात सोबत केला त्या नंतर मुंडे साहेब आमदार तर माधव मुंडे अंबेजोगाई चे पंचायत समितीचे दहा वर्षे सभापती झाले मात्र ऍड माधवराव मुंडे यांचा 1992 ला एका अपघातात डोक्याला मार लागल्याने राजकीय प्रवास थांबला आणि ते राजकारण पासून थोडेसे अलिप्त झाले त्या वेळी प्रा पवन मुंडे अवघ्या 10 वर्षाचे होते.
त्यानंतर अतिशय संघर्षात दिवस काढत प्रतिकूल परिस्थिती मध्ये पवनजी ने आपले m.com m. ed शिक्षण पूर्ण केले,स्व मुंडे साहेबांच्याच संस्थेमध्ये सुरुवातीला एन एचअ इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये क्लार्क म्हणून नोकरी केली, नंतर डी एड कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले हे करत असतानाच विमा एजेंट ते ठेकेदारी असे अनेक प्रयत्न यश प्राप्तीसाठी केले मात्र एक गोष्ट त्यांना सारखी खटकायची की आपला जन्म नोकरी करण्यासाठी झाला नाहीय मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने नोकरी सोडायचे धाडस होत नव्हते पण शेवटी काही मित्रांच्या माध्यमातून प्रोत्साहन घेऊन नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ट्रान्सपोर्ट व्यवसायात प्रवेश केला जिद्द,चिकाटी व प्रामाणिक काम करण्याची शैली या आधारावर लवकरच यश प्राप्ती केली व अल्पावधीतच एक चांगला व्यवसायिक म्हणून प्रा पवन मुंडे यांचे नाव समोर आले,व्यवसायिक क्षेत्रात काम करत असतानाच अनेक व्यवसायिक मित्रांच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय,हॉटेल व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात आता त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले व चांगला व्यवसायिक म्हणून त्यांनी समाजा मध्ये ख्याती मिळवली व्यवसायिक क्षेत्रात काम करत असताना “सामाजिक कामाची आवड” हा “वडिलोपार्जित गुण” त्यांनी सोडला नाही त्याचाच एक भाग म्हणून आणि स्व गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटुंबाशी नाळ जोडत पुढे ना पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांचा सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रा पवन मुंडे चे नाव पुढे येऊ लागले त्याचाच एक भाग म्हणून मा ना पंकजाताई मुंडे यांनी 2016 च्या नगरपालिका निवडणुकीत पवन ला भाजपा ची उमेदवारी दिली,ज्या जागेवर उमेदवारी दिली त्या जागेवर शिवसेना इच्छुक होती मात्र वेळ प्रसंगी शिवसेनेची युती तोडू पण पवन ला तेथूनच उभा करू इतका विश्वास मा ना पंकजाताई व मा ना प्रीतमताई मुंडे यांनी दाखवला आणि झाले ही तसेच एकूण 33 जागांवर भाजपच्या केवळ 3 सीट निवडुन आल्या मात्र एवढ्या विपरीत परिस्थिती मध्ये सुद्धा पवन मुंडे आपली सीट चांगली 400 मतांच्या फरकाने राखण्यात यशस्वी झाले,त्या नंतर मा ना पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांचा एक विश्वासु कार्यकर्ता म्हणून पवन मुंडे ची ओळख सगळ्या जिल्ह्यात निर्माण झाली आणि त्याच तत्परतेने लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी त्या प्रभाग 13 मध्ये ना पंकजाताई च्या माध्यमा तून गेल्या 3 वर्षात करोडो रुपयांचे कामे करून वॉर्ड चा चेहरा-मोहरा बदलून टाकला,मुख्यमंत्री रस्ते विकास निधीतून सुमारे एक कोटीं पेक्षा जास्त निधी चे रस्ते , पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांच्या आमदार व खासदार फंडातून लहान-लहान गल्ली बोळ्या मध्ये लाखों रुपयांचे रस्ते व नाल्या , तसेच ताईंच्या सूचनेनुसार मागेल तेथे व आवश्यक तेथे बोअर , विविध मंदिरांसाठी सभामंडप केले तसेच प्रभागातील महत्वाच्या ठिकाणी आधुनिक प्रकारचे विद्युत हाय-मास्ट लावून रात्रीचे प्रकाश व्यवस्थेचे प्रश्नः सोडवले तसेच नागरपालिके मध्ये शहरातील विविध प्रश्नांवर वारंवार आवाज उठवून कामे करून घेणारा नेता,सर्वसामान्य जनतेचं हक्काचं चालतं-बोलतं व्यासपीठ म्हणून आज नक्कीच प्रा पवन मुंडे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे,शहरा बरोबरच ग्रामीण भागात सुद्धा प्रा पवन मुंडे नी चांगले संबंध प्रस्थापित केले असून ग्रामीण भागातला युवकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत ग्रामीण भागात युवकांचे मोठं संघटन आज निर्माण झालं आहे आणि ग्रामीण भागातील युवक एक “आयडियल व्यक्तिमत्त्व” म्हणून त्यांच्या कडे पाहतात, प्रभागातील काही भागांतील लोक सांगतात की, आता आम्हाला कसल्याही प्रकारचे “सार्वजनिक काम” सांगायला सुद्धा आमच्या नगरसेवकाने शिल्लक ठेवलेले नाही,आमच्या भागातले जवळपास सर्व सार्वजनिक आवश्यक कामे पूर्ण झालेले आहेत हे ही लोक आवर्जून सांगतात,जनसेवेचा वारसा जपत असतांना आपल्या शांत व मन मिळावू स्वभावाने लोकांशी असलेले नातेसंबंध व जिव्हाळा कसा जपावा याचे वास्तविक दर्शन प्रा पवन मुंडे ना पाहिल्यावर होते,अशा या माझ्या व्यवसाय,राजकारण व समाजकारनात प्रामाणिक पणे काम करणाऱ्या मित्रास आज त्याच्या जन्मदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा व पुढील व्यवसायिक व राजकीय वाटचालीत जगातील सर्वोच शिखर गाठो हीच इश्वर चरणी प्रार्थना .
*******
बाळासाहेब कडबाने
संपादक: दैनिक जगमित्र.
No comments:
Post a Comment