Friday, March 13, 2020

सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य जय महाराष्ट्र शिव जन्मोत्सव समिती करते ;- जि.प.गटनेते अजय मुंडे

* शिव जंयती व सामाजिक कार्यात सदैव सोबत ;- राजेश देशमुख 

* मा.सच्चीदानंद आहेर यांच्या व्याख्यानाने शिवप्रेमीत नवचेतना.

परळी वैजनाथ (प्रतिनिधि)
परळीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने   जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले जाते ते कौतुकास्पद असल्याचे जि.प. गटनेते अजय मुंडे यांनी सांगितले.तर शिव जयंतीच्या कार्यात सदैव सोबत असल्याचे वैद्यनाथ देवस्थानचे सचिव  राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी सच्चीदानंद आहेर यांच्या व्याख्यानाने शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाले.जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे मोंढा मार्केट या ठिकाणी छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित शिवप्रतिमेचे पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजा रोहण आणि  व्याख्या नाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या  वतीने गेल्या सव्वीस वर्षापासुन शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या वर्षी हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी,राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करत धेय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वैद्यनाथा देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख हे होते तर भगव्या ध्वजाचे ध्वजा रोहण जिल्हा परिषदेचे गट नेते अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शहर बाजीरावा भैय्या धर्माधिकारी,राष्ट्रीय काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अँड.अनिल मुंडे, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, वैद्यनाथा बँकेचे संचालक नारायण सातपुते,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह उपाध्यक्ष सुरेश टाक,राष्ट्रीय काँग्रेस मा.शहर अध्यक्ष प्रकाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते तुळशीराम पवार,कुस्तीगीर परिषदेचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे,संपादक आत्मलिंग शेटे,रामप्रसाद गरड,पत्रकार संतोष जुजगर,युवक नेते देवराव कदम हे होते .या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवा शिव व्याख्याते सच्चीदानंद माऊली आहेर यांच्या व्याख्यान होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते क्रिडा क्षेत्रात कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे,साहित्यिक क्षेत्रात कवी अनंत मुंडे सर,सामाजिक क्षेत्रात विजय सदरे यांनी कार्य केले बद्दल यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अजय मुंडे म्हणाले की मी लहान असल्या पासुन अभयकुमार ठक्कर हे जय महाराष्ट्र शिव जयंती साजरी करत आहेत या जयंती उत्सवास पंचेवीस वर्षे झाली असुन ही जयंती उत्सव समिती सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरत पणे करत आहे.
अध्यक्षीय भाषणात राजेश देशमुख म्हणाले की सामाजिक कार्य असो किंवा धार्मिक कार्य असो अशा कार्यात सदैव तत्पर राहुन कार्य करणारी जय महाराष्ट्र शिव जयंती उत्सव समिती आहे म्हणुन शिव जयंतीच्या कार्यात आम्ही सदैव सोबत आहोत .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जय महाराष्ट्र शिवजयंतीचे संस्थापक अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेनेच बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय महाराष्ट्र शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी यांच्या सह कार्याध्यक्ष बबन ढेंबरे यांच्या सह माऊली मुंडे,प्रसन्ना दहि वाळ,कृष्णा देवकर,किशन बुंदेले,अमित कचरे,गजानन कोकिळ,सिद्धार्थ गायकवाड, योगेश जाधव,बजरंग औटी, बाळासाहेब सातपोते, लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे शिवम मोहिते,सतिष जगताप,संजय सोमाने,पंडित गुट्टे,प्रा.जगदिश कावरे, ज्ञानेश्वर जाधव कारभारी शिंदे,मनिष जोशी,अंबादास आट पळकर,नागनाथ तुपसवंदर,बबन पाटील, नवनाथ वरवटकर,अजय चव्हाण, वैजनाथ शिंदे,सोमनाथ गायक वाड,नरेश मैड वरद चौधरी,अतुल मुंडे,प्रमोद जाधव,पप्पू ढेंबरे ,ज्योतिबा ढेंबरे,तुकाराम धनगर,हनुमंत कांबळे,किरन शिंदे,अजय कुराडे,रवि गित्ते,सुरेश कुराडे,गोरख चव्हाण, प्रतिक कांबळे,राजु शिंदे,अकबर पठाण,बबलू देवकर,जगन्नाथ चाटे,संग्राम रोडे,हनुमंत जाधव,बालाजी क्षिर सागर,संतोष गायक वाड, दत्ता सुरवसे,जगन्नाथ रामदासी, गजानन जहांगीड,संभाजी शिंदे आदीं नी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment