*भाविकांना मास्क आणि स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करण्याचं आवाहन*
परळी वैजनाथ ;- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरात कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आलीये. वैद्यनाथ मंदिरात दररोज परराज्यातून हजारो भाविक दर्शना साठी येत असतात, त्यामुळेच या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना तोंडाला मास्क किंवा स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करावा असं आवाहन मंदिर ट्रस्ट करून करण्यात आलंय. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी या सूचना दिल्या आहेत. दर दोन तासाला मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा आदेश देण्यात आलाय. तर मंदिर परिसरात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment