Saturday, March 28, 2020

भीम जयंतीवर कोरोना चे सावट .जंयती घरी थांबूनच साजरी करा.

* केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे 
 आवाहन.

मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता यामहामारीविरुद्ध लढायची वेळ आहे. त्यामुळे या वर्षी  भीम जयंती घरी थांबूनच साजरी करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जनतेला केले आहे.
यासंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, दरवषी 14 एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची  जयंती   साजरी केली जाते. मात्र, यावषी कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच आपणदेखील आधी कोरोनाविरूद्धचा मुकाबला जिंकू व मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया. त्या आधी कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा संकल्प करू. तसेच सर्वांनी संयम ठेवावा आणि घरीच थांबावे, असे आवाहन आठवले यांनी या वेळी जनतेला केले आहे.आपणच आपले रक्षक  तसेच आपणच आहोत आपले रक्षक, नका बनू स्वतःचे भक्षक, अशा काव्यंपक्तीतूनही आठवले यांनी जनतेला संदेश दिला.

No comments:

Post a Comment