*कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; रोज सकाळी 11 ते 3 संचारबंदी शिथील
शिथील काळात पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित आल्यास कारवाई, संचारबंदी पाळण्याचे आवाहन
बीड ;--कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने आज कठोर पावले उचलली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषद घेवून आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत बीड जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यु) लागु करण्यात आला असून या काळामध्ये कुठलाही व्यक्ती अनावश्यकपणे रस्त्यावर दिसून आल्यास त्या विरोधात दंडात्मक कारवाईसह कठोर कारवाई करण्यात येईल. रोज सकाळी 11 ते दुपारी 3 कार्यकाळामध्ये संचारबंदी जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथील करण्यात येईल. या काळातच जिल्ह्यातील नागरिकांनी आपले जीवनावश्यक वस्तू खरेदी करावयाच्या आहेत. या शिथील काळातही पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधि कार्यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यातल्या 16 सीमा लॉक केल्या असून या भागातून केवळ जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहनच जिल्ह्यामध्ये घेतले जातील. या वाहनामध्ये पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास ते वाहन जिल्ह्याच्या सीमेत घेतले जाणार नाही. असे म्हणत जिल्हाधिकार्यांनी लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा कठोर निर्णय घेतला जात असल्याचे सांगून जनतेने काल जसं सहकार्य केले तसे सहकार्य पूढील कार्यकाळात करावे असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये प्रेस घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, कालच्या जनता कर्फ्युला जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आज मात्र लोकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले. त्यामुळे याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. हा कठोर निर्णय थोडा त्रासदायक असेल परंतू सर्व सामान्यातील सर्वसामान्यांच्या आरोग्या साठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नांची परिकाष्टा करत आहे. या स्थितीत लोकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रादुर्भाव रोखण्या साठी आज मध्यरात्री 12 वाजल्या पासून 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यु) लागु करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील नागरिकांना सकाळी 11 ते 3 या कालावधीमध्ये संचारबंदी शिथील करण्यात येईल. या काळात जिवनावश्यक वस्तूंची खरेदी लोकांनी करावी, त्याचबरोबर पाच पेक्षा जास्त लोक या शिथील काळातही आढळून आले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. अथवा दंडात्मक कारवाई अशा लोकांवर करावी लागेल असे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, संचारबंदीच्या कालखंडामध्ये रूग्णालय, मेडिकल, वर्तमानपत्रांची कार्यालये यांना मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणार्या 16 सीमा बंद करण्यात आल्या असून या सीमेतून जिवनावश्यक वस्तूंच्या गाड्याच आता येतील. या गाड्यांमध्येही पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्याही स्विकारल्या जाणार नाहीत. संचारबंदीच्या कालावधीमध्ये 5 टक्के कर्मचारी, दवाखाने, मेडिकल, फळ, किराणा दुकान, मांसाहार यांसह आदि जिवनावश्यक वस्तूंच्या बाबी शिथील काळातच उघडल्या जातील. आज मध्यरात्रीपासून जिल्ह्या मध्ये अत्यंत कडक संचारबंदी लागु करण्यात आली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यासोबतच बीड शहरा मध्ये पुणे, औरंगा बाद, नागपूर सह सर्दी, पडसे, खोकले अशा शंकास्पद आजार दिसणार्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी शहरामध्ये 70 आरोग्य विभागाची पथके तयार केली आहेत. तर ग्रामीण भागात बाहेर गाव आणि बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची माहिती स्वतंत्र पणे ग्रामसेवक नोंदणी रजिस्टरमध्ये नोंदणी करणार आहेत. बाहेर देशातून आलेल्या ग्रामीण भागातील व्यक्ती 14 दिवसाच्या कालावधी तील असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिस आणि प्रशासनाला द्यावयाची आहे. असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment