Sunday, March 22, 2020

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहानाला अभुतपुर्व प्रतिसाद .जनतेचा स्वंय स्फुर्तिने सहभाग .

 बीड / परळी दि.22 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.२१) जिल्ह्यातील सर्व  तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या आदेशावर स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले.त्यातच आज(दि.22)सकाळपासूनच संपुर्ण देशात जनता कर्फ्यूला पुकारण्यात आले असून परळी शहर तालुका सह बीड जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली आहेत.भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.परळी शहरातील  मुख्य बाजार पेठी,मोंढा,शिवाजी  चौक,टावर ,संभाजी चौक बस स्टॕड ,रेल्वे,शहरातील सर्व  परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही नाहीच्या बरोबर  आहे.गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.

No comments:

Post a Comment