परळी वैजनाथ; (प्रतिनीधी ) आज दुपारी 3 वाजता अवैद्य रित्या वाळू वाहतुक करणारा टिप्पर क्र MH22 अन 5555 किणगाव कडून धर्मापुरी कडे जात असताना धर्मापुरी येथे पकडण्यात आला. सदर टिपर च्या पुढिल भागावर नंबर टाकलेला नव्हता व त्या चालकाकडे चालक परवाना, गौंखणीज परवाना कोणतीही पावती आढळून आली नाही.ही धडक कार्यवाहि उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांच्यासह मंडळ अधीकारी धर्मापुरी कालिदास पवार, मंडळ अधिकारी सिरसाळा शेख साहेब, तलाठी विष्णू गित्ते तलाठी गणेश बळवंत, हे सहभागी होते.सदर हायवा मध्ये 4.38 ब्रास अवैद्य गौण खनिज वाळू आढळून आली आहे. सदर टिपर पोलिस स्टेशन परळी ग्रामीण येथे लावण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment