Tuesday, March 17, 2020

दिलासादायक बातमी 15 तासात एकही नवा रुग्ण नाही.महाराष्ट्राला किंचित दिलासा .ना.राजेश टोपे यांची माहिती .

‘राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही. सर्व 39 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठकही आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. आपण अनेक खबरादारीचे उपाय केले आहेत,’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला मागील 15 तासात ब्रेक लागला आहे. मागील 15 तासात राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असं टोपे यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गाभा आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात न येता अधिका धिक अंतर कसं ठेवता येईल यावर सर्वांनी लक्ष द्यावं, ‘ असं राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचल लेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

No comments:

Post a Comment