बीड (प्रतिनिधी)दि.01 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे बीड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्षपदी किशोर कागदे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्रा सह भारत देशात अनेक वर्षा पासून अन्याय अत्याचाराच्या विरोधात, दीनदलित शोषित पीडितांच्या प्रश्न हाती घेऊन काम करत आहे व केले आहे, पक्षाचे जाळे व्यापक व संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर निर्माण केलं त्यात पक्षाच्या फेर निवडी सध्या करण्यात आल्या आहेत . मराठवाड्यात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बीड जिल्हा प्रत्येक राजकीय चळवळीचं केंद्र बिंदू मानून त्याकडे सर्वच पक्षाचे लक्ष असतं म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी बीडच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ ही सामाजिक चळवळीशी बांधिलकी असणारे ,समाजाविषयी आपुलकीने तळमळीने काम करनारे, सदैव लोकांच्या सेवेत असणारे किशोर कागदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करून, त्यांच्यावर संपूर्ण जिल्हा बांधणीचा भर टाकण्यात आला आहे, जिल्हाध्यक्ष निवडीच्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढवळून निघाले आहे, लवकरच जिल्हा पदाधिकारी व 11 तालुक्यातील पदाधिकारी निवडले जाणार आहेत व पक्षाची मजबूत बांधणी केली जाणार आहे असे पत्रकात म्हटले आहे किशोर कागदे यांच्या निवडीचे महाराष्ट्र मराठवाडा व जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे,
No comments:
Post a Comment