नगर ;- (प्रतिनीधी ) हभप इंदुरीकर महाराज देशमुख वादाच्या भोवर्यात सापडलेल्या असताना आज नगर येथे खासगी बंदोबस्तात त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले. खासगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने महाराजांचे कीर्तन पार पाडले. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.
गेल्या आठवड्यामध्ये मुलगा- मुलगी या वक्तव्यावरून महाराज वादात सापडले होते. इंदुरीकर महाराज यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्या कार्यक्रमाच्या नंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. प्रशासनाच्यावतीने त्यांना केलेल्या वक्तव्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. अनेक संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली होती.
त्यांचे कीर्तन होणार की नाही, अशी त्यांच्या भक्तांमध्ये कुजबुज सुरू झालेली होती. आज नगर येथील भिंगार या गावातील श्री शुक्लेश्वर मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी खासगी बॉक्सर नियुक्त करण्यात आले होते. व बंदोबस्तात त्यांना कीर्तनाच्या स्थळी आणण्यात आले. बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली होती. दरम्यान यावेळी कीर्तन सुरू असताना कोणती शूटिंग करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
No comments:
Post a Comment