Tuesday, February 11, 2020

*पत्रकार सुरक्षा समितीच्या कोकण विभाग अध्यक्षपदी गौसखान पठाण यांची निवड*

कर्जत / पत्रकार  सुरक्षा समिती रायगड ची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते 
सदर बैठकीत *पत्रकार संरक्षण कायदा* *राज्यातील सर्वच जेष्ठ पत्रकारांना किमान दहाहजार रुपये निवृत्ती पेन्शन*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी* *शासन यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच दैनिक साप्ताहिक, वृत्तपत्रना  जाहिराती मिळणे बाबत* *पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी करणे* *पत्रकारांसाठी नव्याने घरकुल योजना आरोग्य योजना* या सह पत्रकारांच्या विविध विषयावर सखोल चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या कोकण विभाग अध्यक्षपदी अभ्यासू व जेष्ठ पत्रकार गौसखान पठाण यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली गौसखान पठाण हे नेहमीच पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असून रायगड जिल्ह्यातील पत्रकाराच्या अडचणीला धावून येणारा पत्रकार म्हणून त्यांची आगळीवेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे  पत्रकारांच्या समस्या बाबत गौसखान पठाण यांनी शासन दरबारी अनेक पत्रव्यहार केले असून पत्रकारांच्या लढ्यात नेहमीच पुढाकार घेऊन पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची वेगळीच छाप प्रसाशनात आहे गौसखान पठाण यांच्या निवडीने कोकण मधील पत्रकार मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे  आपल्या हक्काचा व पत्रकारांना न्याय मिळवून देण्याऱ्या संघर्षवादी पत्रकार गौसखान पठाण यांच्या निवडी पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक आनंद संकपाळ, उपाध्यक्ष नरेश जाधव अनिल गवळे कर्जत तालुका अध्यक्ष विलास श्रीखंडे खालापूर तालुका अध्यक्ष खलील सुर्वे कार्याध्यक्ष प्रशांत खराडे संतोष एनकर राजेंद्र जाधव सह अनेक पत्रकार उपस्थित होते

No comments:

Post a Comment