Saturday, February 1, 2020

इमदादुल उलूम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी शेख नसीम फातिमा शेख अब्दुल्ला यांची नियुक्ती.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिनांक 31 जानेवारी 2020 
परळी शहरातील नामवंत महेबूबीया शिक्षण संस्था द्वारे संचलित इमदादुल उलूम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी शेख नसीम फातिमा शेख  अब्दुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख इनायत अली महमूद अली हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी शेख नसीम फातेमा शेख अब्दुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपार नंतर शेख नसिम फातेमा यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  त्यांचे स्वागत महेबूबीया शिक्षण संस्थेचे  उपाध्यक्ष  शेख खाजा शेख मेहताब यांच्यावतीने करण्यात आले . यावेळी इमदादुल माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य सय्यद वाजेद सय्यद खादर , पावर हाऊस प्राथमिक शाळेचे इन्चार्ज सय्यद ईफ्तेखार सय्यद अहमद , आजाद नगर शाळेचे इन्चार्ज खान जब्बार  अब्दुल अजीज खान, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवनियुक्त मुख्याध्यापकाचे पुष्पगुच्छ अभिनंदन केले व शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment