परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे, ग्रामीण साहित्यिक व कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत यांनी माती आणि मातीचे इमान माणसाला श्रेष्ठतेकडे नेते असे उद्गार काढले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके गुरुजी, प्रमुख पाहुणे ग्रामीण कथाकार प्रा. अप्पासाहेब खोत, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दे. घ. मुंडे, सहसचिव विजय वाकेकर, ज्येष्ठ संचालक सर्वश्री विठ्ठलअप्पा चौधरी, भीमराव मुंडे, विलास बापू मुंडे, गणपतराव सौंदळे प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी. के. आंधळे प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर, उपप्राचार्य डॉ.व्ही. जे.चव्हाण. डॉ.जे व्ही. जगतकर, प्रा. एस. एम सूर्यवंशी, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.देशमुख एम.एल कनिष्ठ
पर्यवेक्षक प्रा एस आर सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर यांनी महाविद्यालयाची यशोगाथा व प्रगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला. वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. एम. एल. देशमुख यांनी कार्यक्रमाचा अहवालाचे वाचन केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. वाय. डी. रेड्डी यांनी सांगितला. वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे बोलत असताना प्रा. आप्पासाहेब खोत म्हणाले की, ज्याच नातं माता आणि मातीशी घट्ट असतं त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. कठीण संघर्षातून परिषदेतून भारतीय प्रशाकीय अधिकारी राजेंद्र भारूड यांच्या संघर्षाचे उदाहरण त्यांनी यावेळी प्रस्तुत केले. तसेच गवनेर ही अस्सल कोल्हापुरी भाषेतील कथा सादर करीत माणूस आणि प्राणी यांच्या भावनात्मक संबंधावर प्रकाश टाकला तसेच माणसाने नीतिमत्ता सोडली पण प्राणी आजही ती जोपासतात याचं सुंदर उदहारण गवनेर या कथेच्या माध्यमातून सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला सुंदर उहापोह गवनेर या कथेच्या माध्यमातून केला. भाषणाच्या सुरुवातीला विद्यार्थी दशेला पूरक अशी यशस्वी लोकांची किमयागिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कशी असते याचे दाखले दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही पालखीचे भोई या कवितेचे सादरीकरण करीत माता आणि मातीशी माणसाने इमान कसे राखले पाहिजे याचं जिवंत चित्र उभे केले. प्रा. आप्पासाहेब खोत ग्रामीण कथाकार तसेच कथानक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्यांच्या कथाकथेमुळे सर्व प्रेक्षक व विध्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांनी प्रा. आप्पासाहेब खोत यांचा कथाकथनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असल्याचे सांगून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचाराचा वसा अंगीकारावा असा संदेश या प्रसंगी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंयनकुमार आचार्य. प्रा.अर्चना चव्हाण व प्रा.दिलीप गायकवाड यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक. शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment