Sunday, December 29, 2024

सीआयडी कडून वाल्मीक कराडसह फरार आरोपींचे बँक खाते सिज; देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्या ची बाब उघड!


बीड (प्रतिनिधी) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामूळे वातावरण सध्या तापलेले आहे. बीडच्या रस्त्यावर जनतेच्या असंतोषाचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान हे प्रकरण सीआयडी कडे गेल्यानंतर फरार आरोपी वाल्मीक कराड सह चारही आरोपींचे बँक खाते सीज करण्यात आले आहे. संपत्ती जप्तीची कारवाई सीआयडीने सुरू केली असून संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण झाल्याचे तपासातून उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

शनिवारी बीडच्या रस्त्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायासाठी जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. जनक्षोभ लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी व देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याच्या आदेश सीआयडीला दिले. यानुसार सीआयडीने वाल्मीक कराडसह फरार असलेल्या चारही आरोपींचे बँक खाते सिज करून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली आहे. खून व खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी ची नऊ पथक सध्या करत असून जवळपास दीडशे अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी संभाळत आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात संतोष देशमुख खून झाला त्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीतील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशाशी मॅच झाले आहेत. दरम्यान गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या गाडीत सापडलेल्या दोन मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात सीआयडी ला यश आले आहे. तसेच संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याची संपर्क साधल्याची बाब देखील तपासात उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी केलेल्या चित्रीकरणातून देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केली असल्याची बाब उघडकिस आली आहे. सीआयडी ची पथक फरार आरोपींचा तपास राज्यासह देशभरात सध्या करत आहे. आरोपींच्या संपत्ती जप्ती सोबतच त्यांनी देशाबाहेर पलायन करू नये यासाठी पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू केली असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मा.खा.सतिश प्रधान यांचे दुःखद निधन त्यांचे कार्य शिवसेनेच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.परळी शिवसेनेच्या वतीने श्रृध्दांजली - अभयकुमार ठक्कर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - शिवसेना नेते आणि माजी खासदार मा.सतिश प्रधान यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले. त्यांना परळी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मा. नगराध्यक्ष तथा शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख श्री. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्व.सतिश प्रधान यांचे कार्य शिवसेनेच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शोक व्यक्त केला गेला असून त्यांच्या कार्याचा ठसा सर्वांवर कायम राहील असे  मा. नगराध्यक्ष तथा शिवसेना मा .उपजिल्हाप्रमुख श्री. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, बीड जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार सतिश प्रधान यांचे निधन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांचे योगदान बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या प्रसार व जनहितासाठी अमूल्य राहील.
यावेळी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना बीड जिल्हा मा.समन्वयक व जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अतुल दुबे, जेष्ठ नेते रमेशअण्णा चौंडे, शिवसेना माजी उपशहर प्रमुख सतीश जगताप, किशन बुंदेले ,शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे, युवासेना माजी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाने, मनीष जोशी, गणेश जठार, प्रकाश देवकर, अमित कचरे , योगेश जाधव,यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेना, युवासेना आणि जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी एकत्र आले आणि माजी खासदार सतिश प्रधान यांच्या कार्याची आठवण मनाशी जपली. त्यांच्या निधनाने शिवसेनेला एक विश्वासू नेता गमवावा लागला आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पंढरपूरजवळ बस आणि ट्रकचा अपघात या दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू.तर अनेक प्रवासी गंभीरित्या जखमी .


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर जवळ ट्रकआणि बसचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवासी गंभीरित्या जखमी झाले आहेत. हा अपघात भटुंबरे गावाजवळ झाला. अपघात घडताच प्रत्यक्षदर्शींनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, भटुंबरे गावाजवळ भाविकांची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या आणि ट्रकच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात दोन भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावा नजीक अपघात झाला. नंदनी ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या माल ट्रकची जोरदार धडक झाली.

यामध्ये यामध्ये दोन्ही वाहनांची मोठे नुकसान झाले असून बस मधील बेबाबाई महाळसकर वय (५५) व जनाबाई महाळसकर( वय ७) यांचा मृत्यु झाला आहे. तर ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी १२ जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Saturday, December 28, 2024

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्तीचे तथा ज्यांचे बंदुकी सह फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश.


मुंबई (प्रतिनिधी) मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्यांचे ज्यांचे बंदुकी सह फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूर हत्या झाली. या प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांच्या सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल झाला.

मात्र यातील कराड याच्यासह अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आरोपीची संपत्ती जप्त करा आणि ज्यांचे ज्यांचे सोशल मीडियावर बंदूक, रिव्हलवर सह फोटो आहेत त्यांचे लायसन रद्द करा असे आदेश दिले आहेत.

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.विविध गीता वर नृत्य कलाविष्कार सादर.

परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल प्रणांगणामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळे वेगळे कलाविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीतामुळे प्रेक्षक अक्षरक्षा भारावुन गेले होते.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे मार्गदर्शक श्री. किरण गित्ते साहेब, IAS, सचिव त्रिपुरा सरकार आणि विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली चि. शौर्य किरण गित्ते यांनी केले. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर साहेब, ‘मी होनार सुपरस्टार’ नृत्य कोरिओग्राफर साक्षी मेथे, मुख्याध्यापक डॉ. श्रीकांत पाटील सर, पोतदार जमबो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा गित्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करण्यात आले.
 यावेळी  श्री.शौर्य किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. पोतदार जमबो किड्स विद्यार्थी विद्यार्थीनींनी व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  विविध गाण्यावर नृत्य सादर केले.
      
     शाळेतील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने  कार्यक्रमाची सुरुवात केली. पोतदार जमबो किड्सच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीं भुलभुलया, आज है संडे, रिटरो, ना ना ना रे तोबा तोबा, पुष्पा 2, गाण्यावर नृत्य सादर केले. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा वर आधारित गाण्याने सुरूवात केली.कोळीगीत, याच बरोबर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे सादरीकरण केले. साक्षी मेथे यांनी  
सामी सामी, कमली,मदन, मंजिरी, कुरूची मर्दा बीटी या हिंदी व मराठी गाण्यांच्या मेषप  वर  नृत्य सादर केले  व प्रेक्षकांची दाद मिळवली.  छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज आधारित, भक्तिगित, लोकगित, हिन्दी गीत , आदिवासी गीत , पारंपारिक वेशभूषा नृत्य आविष्कार  सादर केला. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे तसेच पोतदार जमबो किड्स शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थी - विद्यार्थीनी पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी. हत्या करणाऱ्यांना फाशीची मागणी.


बीड (प्रतिनिधी) मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, वाल्मिक कराड ला अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या मागण्यासाठी बीडमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. संतोष ला न्याय द्या, वाल्मिक ला अटक करा, वाल्मिक कराड च्या संपत्तीची चौकशी करा असे पोस्टर घेऊन महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीमहाराज, मनोज जरांगे पाटील, खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके, आ अभिमन्यू पवार, आ जितेंद्र आव्हाड,नरेंद्र पाटील यांच्यासह नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

विंडमिलच्या प्रकरणात वॉचमॅन हा बौद्ध आणि संतोष हा मराठा होता. वाल्मिक कराडचे गुंड तिथं गेल्यावर संतोष देशमुख तिथं गेले. जातीपातीच्या राजकारण करणाऱ्यांना हे सांगा…मी ओबीसी आहे तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी विरोधात असलो तरी मंचावर उपस्थित असलेले सुरेश धस भाजपमध्ये आहेत, प्रकाशदादा सोळंके अजित पवार गटात आहेत, तरी ते छाती ठोकून सांगतायत आता टाका…आज आमदार अभिमन्यू पवार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. तरी अभिमन्यू पवारांना विषय कळताच पाठिंबा दिला, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं.

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार काय म्हणाले?

कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे- संदीप क्षीरसागर

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सभागृहात ज्या पद्धतीने सुरेश अण्णा धस बोलले. अजून पाच मिनिटं बोलले, असते तर सभागृह रडलं असतं. मोर्चात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अठरा पगड जातींचे लोक माणूस म्हणून आलेले आहेत. या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्हा थेट संबंध लागतो तरी त्याचा नावं नाही, अशी टीकाही संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मिक कराडला सारंक्षण धनंजय मुंडेचं असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होतं नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.

वाल्मिकचा वाल्या झाला -आव्हाड!

जाती आपण कधी सोडणार आहोत? संतोष देशमुख जातीसाठी मेला नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा ओळखला जातो. वाल्मीक नाही तो वाल्या आहे त्रेता युगात वाल्याचा वाल्मीक झाला आणि कल्युगात वाल्मीकचां वाल्या झाला. लोक म्हणतात वंजाऱ्याच्या विरोधात बोलतायत माणुसकी आहे का त्याला? आंधळे राख ठड यांचा खून झाला. तेपण वंजारी होते.अशोक सोनवणेची अट्रोसिटि दाखल झाली असती तर देशमुखांचा खून झाला नसता. या सर्वाला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. संतोष मेल्यावर तुम्ही जिवंत झाला.बीड हा बंडखोरांचा जिल्हा आहे. राजकीय बंडखोरी करणारा आहे. बीडने गोपीनाथ मुंडे नाना पाटील अनेक जण दिले. एकी अशीच ठेवा. बीडमध्ये ठिणगी पडली आहे. याचे जनआंदोलन होईल. अटक झाली नाही तर महारष्ट्रमध्ये आग पेटेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले.

Friday, December 27, 2024

कुटुंब शेतात गेल्याची संधी साधत चोरट्या नी घरफोडी करत ४ लाख २९ हजारांचा ऐवज केले लंपास.


आष्टी (प्रतिनिधी): कुटुंब शेतात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी सुलेमान देवळा येथे घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील काळेवस्तीवर दत्तात्रय कारभारी देसाई राहतात. २६ डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून कुटुंबासह शेतकामासाठी शेतात गेले. बंद घर दिसताच चोरट्यांनी संधी साधत भरदिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करत किंमती ऐवज लंपास केला. देसाई कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. पाहिणी केली असता घरात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटातील साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण ४ लाख २९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात दत्तात्रय कारभारी देसाई याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी आष्टीचे प्रभारी उपअधीक्षक गोल्डे, अंभोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, यांनी भेट दिली.बीड येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञाचे देखील पथक दाखल झाले होते.पुढील तपास सुरू आहे

कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधान कारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार' - आ.प्रकाश सोळंके


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांनी अजूनही काही आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक करण्याची मागणी वाढली आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. 

 वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार आहे, तसेच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था समाधानकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मंत्री धनंजय मुंडे यांना विरोध सुरू असल्याचे दिसत आहे. 

"बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती समाधानकारक नाही. वाळूचा उपसा, मद्य विक्री या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात पैसा काही जणांच्या हातात येतो. यातूनच खंडणी मागणे. खंडणीतून खून करणे हे प्रकार होत आहेत.  बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन किंवा इतर खात्यावर एक प्रकारे दबाव ठेऊन काम केले जात आहे. अधिकारी लोक, पोलिस प्रशासन यांचे बटीक असल्याचे करत आहेत. कोणावरही गुन्हे दाखल केले जात आहेत, कुणालाही अटक केली जात आहे, असा आरोपही आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. 

'जिल्ह्याचे नेतृत्व जबाबदार'

प्रकाश सोळंके म्हणाले, मागील अडीच वर्षापासून या जिल्ह्याचे कोण नेतृत्व करत आहेत त्यांचं नाव घेतलं पाहिजे असं काही नाही. आता खंडणीच्या गुन्ह्यात जे आरोपी आहेत वाल्मिक कराड त्यांच्यामाध्यमातून हे सुरू आहे. या सर्व प्रकारामध्ये आमच्या जिल्ह्याचे नेतृत्व जबाबदार आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, असंही आमदार सोळंके म्हणाले. 

"बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले तर जिल्ह्याची परिस्थिती बदलेलं असं मला वाटतं, असंही सोळंके म्हणाले. 

धस यांनी केला एका मोठ्या घोटाळ्याचा खुलासा. एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दाव.ा


बीड (प्रतिनिधी) बीडच्या मस्साजोगमधील सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून, सातत्याने धनंडय मुंडेंवर निशाणा साधत आहेत. अशातच, आता धस यांनी एका मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. बीडच्या टेंभूर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी आज केला.


महादेव अॅपच्या माद्यमातून कोट्यवधीचा घोटाळा.

बीडमध्ये पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंससह वाल्किम कराडवर नाव न घेता टीका केली. 'एकाच व्यक्तीच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी केली पाहिजे. मी पोलीस अधिक्षकांना सांगितले की, या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला, ' असा दावा धस यांनी केला. 

बीडमधील सर्व घटनांच्या मागे 'आका'

सुरेश धस यांनी यावेळी नाव न घेता वाल्मिक कराडांवर जोरदार टीका केली. 'बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या, कुठल्याही घटना घ्या, त्याच्या मागे एकच आका असतो. बीडपासून काही अंतरावर एका व्यक्तीच्या शेतातून बळजबरीने मुरुम काढून आणला गेला. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. 'गँग्स ऑफ वासेपूर'सारखी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या आकाच्या नावावर जिल्ह्यात किती जमिनी आहेत, ते एकदा तपासा.'

जमीन बळकवण्याचा परळी पॅटर्न

'परळीजवळ शिरसाळा गावात गायरान जमिनीवर कब्जा करुन गाळे बांधले गेले आहेत. शिरसाळ्यात 600 विटभट्ट्या चालतात, त्यातील 300 अवैध आहेत. गायरान जमिनीवर बंजारा आणि पारधी समाजातील लोकांची घरे होती. पोलीस लावून त्यांना हाकलून लावलं आणि गायरान जमिनीवर कब्जा केला. कुठे 100 एकर, कुठे 150 एकर...अशा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आकाच्या नावावर आहेत. हा पैसा कुठूण आणला? गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न आहे. परळीमध्ये तर राखेचे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत. याद्वारे कोट्यवधीची उलाढाल होते, असा आरोपही सुरेश धस यांनी यावेळी केला.

Thursday, December 26, 2024

भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ मनमोहन सिंह यांचे निधन!


नवी दिल्ली -भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केलेतर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
1987-1990 पासून जिनिव्हा. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली.

विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.

डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.

यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे.

आपली बाजू मांडत मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न. बीडच्या घटनेतील आरोपांवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य.


बीड  (प्रतिनिधी) : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विविध नेत्यांनी लक्ष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत विरोधकांवर पलटवार केला आहे. माझ्यावर विविध आरोप करून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा काही लोकांचा उद्देश आहे, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला आहे.

बीड हत्याकांडावर आपली भूमिका स्पष्ट करताना धनंजय मुंडे म्हणाले की, "संतोष देशमुख यांची ज्यांनी कोणी निर्घृण हत्या केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी फासावर गेले पाहिजेत. कारण तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. त्यांच्याबद्दल मलाही आदर होता. जे कोणी आरोपी असतील, ते कोणाच्याही जवळचे असतील, अगदी माझ्याही जवळचे असतील तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त राजकारणापोटी माझ्यावर होत असलेले आरोपांमागील राजकारण आपण समजू शकता," असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर दोन कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचीही पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते, ते माझ्या जवळचे तर आहेतच. त्यामुळे शासन कोणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला सकाळी-सकाळी माझ्याविरोधात बोलल्याशिवाय त्यांची सकाळच होत नाही," असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, "मीडिया ट्रायल घेऊन माझी बदनामी केली जात आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात होते, नंतर खातं मिळू नये आणि आता बीडचं पालकमंत्रिपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीडच्या घटनेत चौकशी गतीने सुरू आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना शिक्षा मिळावी," असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. 

कुंपणच शेत खात आहे! चक्क एसपी ऑफिसमधून पोलिसानेच चोरल्या १० बॅटऱ्या. प्रकरणी सहायक फौजदारासह दुकानदार ताब्यात.


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात आगोदरच कायदा व सुव्यवस्था बिघडललेली आहे. यात आगोदरच पोलिस वादात सापडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल १० बॅटऱ्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे, या बॅटऱ्या पोलिसानेच चोरल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

अमित मधुकर सुतार (रा.खोकरमोहा ता.शिरूरकासार) व माधव गोरक्षनाथ जानकर (रा.वडगाव गुंदा ता.बीड) असे आरोपींची नावे आहेत. सुतार हे सहायक फौजदार असून जानकार हा दुकानदार आहे. नोव्हेंबर महिन्यात सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या. तर २५ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्यापूर्वी आणखी ७ बॅटऱ्यांची चोरी केली. सुतार हे वायरलेस विभागात कार्यरत आहेत. पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल यल्लाप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड, कर्मचारी अशपाक सय्यद, परजणे हे करत आहेत. सध्या हे दोघेही ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या पोलीस चौकीसमोरच तरुणावर चाकू कोयत्याने प्राणघातक हल्ला चौघांवर गुन्हा दाखल.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता वरचेवर चिंताजनक बनू लागला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक अजिबात राहिला नसल्याचे दर्शविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख (रा. सदर बाजार, अंबाजोगाई) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. जमीरचा भाऊ शेख मतीनच्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. यावेळी जमीरने त्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री १२.३० वाजता जमीर स्वाराती रूग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे याने त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले. जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली होतीस असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला तर आर्यन मांदळे व अनोळखी दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद आहे.

सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगा शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ऐन पोलीस चौकीसमोर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक सावित्री: सौ. उषाताई किरण गित्ते .

       मा.सौ.उषाताई किरण गित्ते मॅडम यांचा 27 डिसेंबर 2024 हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठीचा हा शब्द प्रपंच. 

     भारतीय संस्कृतीत एकेकाळी स्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते.मध्यंतरी हे महत्त्व कमी केले गेले तीला अनेक बंधनात अडकवण्यात आले.अज्ञानात ठेवण्यात आले.शिक्षणापासून त्या वंचित राहील्या. त्यातुन मुक्त करण्याचे कार्य  व अन्य कार्यातुन मुक्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.तोच वारसा पुढे चालवत शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या आधुनिक सावित्री म्हणजे मा.उषाताई किरण गित्ते होत.मानवी जीवन हे सर्वश्रेष्ठ मानले जाते कारण माणसाला ईश्वराने अमाप बुध्दीची देणगी दिली आहे.पण त्या मानवाकडे या बुध्दीच्या साहाय्याने  विकासाची दृष्टी असली पाहिजे. ज्यांच्याकडे अशी दृष्टी लाभलेली असते त्यांची नावे इतिहासात नोंदवली जातात. मग हा विकास सामाजिक, राजकीय,आर्थिक व शैक्षणिक अशा स्वरूपाचा असू शकतो. हा विकास घडवणारे मग ती स्त्री असो की पुरुष. केवळ दृष्टी असून चालत नाही तर दूरदृष्टी असणे गरजेचे असते. माणसाचा सर्वांगीण विकास हा केवळ शिक्षणामुळेच होऊ शकतो हे अनेक महापुरुषांनी सांगितले यात प्रामुख्याने महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.याचा अनुभव आपण मागील काही वर्षांपासून समाजात पाहतो आहोत व घेतो आहोत.हाच वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानाचा किरण प्रकाशित करण्याचं काम जे काही मोजके लोक करतात त्यात आवर्जून मा. उषाताई किरण गित्ते ताई साहेबांचा आवर्जून  उल्लेख करावा लागेल.
      सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शैक्षणिक कार्यरंभ केला. त्यांच्या घरातच मुळात वडील शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक वातावरण आधीपासूनच होते. त्या शिक्षकाच्या कन्या होत. त्यांचे वडील म्हणजे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे दिनकररावजी मुंडे गुरुजी हे होत. दिनकरराव गुरुजींच्या संस्कारात व पती किरण गित्ते साहेब यांच्या सहवासात असल्यामुळे त्यांनी सर्वाधिक महत्त्व शिक्षणाला दिले आहे.अलीकडे आपण पाहतो की माणसे भौतिक सुविधांच्या मागे लागले आहेत. विशेषता अधिकाऱ्यांच्या पत्नी तर   भौतिक सुविधा जोडण्यातच अग्रेसर दिसतात. घरात  सोफासेट, डिनर सेट,टी सेट असते पण माईंड मात्र अपसेट आसते असे चित्र सर्रास आज आपण पाहतो आहोत. खऱ्या अर्थाने हे अपसेट माईंड सेट करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय ते होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना चांगले शिक्षण व संस्कार देणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच ताईंनी परळी शहरात विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली आहे. या माध्यमातून काळाची पावले ओळखून त्यांनी किरण गित्ते IAS अकॅडमी  ,  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ , पोद्दार जंबो किड्स सुरू केली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे.इंग्रजी भाषा हे जगाचे ज्ञान करून घेणारे प्रवेशद्वार आहे. जगाला जाणून घेण्याची महत्त्वाची खिडकी आहे.ती बंद असून चालणार नाही किंवा यापासून अनभिज्ञ राहूनही चालणार नाही.ही बाब लक्षात घेऊन ती उघडण्याचे काम या माध्यमातून त्यांनी केले आहे.खरे तर दिनकरराव गुरुजी व  किरण गित्ते साहेबांसारखे सर्वज्ञ त्यांच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून असल्यामुळे ताईंना हे काम करणे सोपे गेले.एका आय.ए.एस.च्या पत्नीने भौतिक सुविधांच्या मागे न लागता समाजातील उपेक्षितांच्या शिक्षणासाठी धडपड करणे हे लाखो लोकांतील एक असामान्य असे उदाहरण आहे.परळी या शहराची ओळख राजकीय दृष्टीने अधिक आहे. त्यानंतर तीर्थक्षेत्र, औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वे स्थानक म्हणून व  भागात असलेले कीर्तनकार यामुळे ही परळी चर्चेत असते.शैक्षणिक ओळख परळीला म्हणावी तशी लाभलेली नाही. ही शैक्षणिक ओळख या कार्यातून देण्याचे काम ताईसाहेब करताना दिसतात. आपले पती किती अडचणीतून शिकून अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण अभ्यास करून जीवनात यशस्वी झाले हे त्यांनी याची देही याची डोळा पाहिले आहे. शिक्षणामुळे एखादं पद प्राप्त केल्यावर माणसाला कशी सर्वार्थाने प्रतिष्ठा मिळते याचा अनुभवही त्यांनी घेतला असल्यामुळे बहुजनांच्या मुलांच्या जीवनात  बदल घडवायचा असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे गरजेचे हे लक्षात घेऊन त्यांनी परळीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. अलीकडच्या काळात 'मी आणि माझे' अशी प्रवृत्ती बळावत असताना तसेच  आपल्यापेक्षा मोठा कोणी होऊ नये जर कोणी झाला तर अस्वस्थ वाटणाच्या या काळात समाजातील अनेक मुले उच्च पदावर जावेत व ती आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ही भावना ज्या स्त्रीच्या ठिकाणी आहे तिला  दुरदृष्टी लाभलेली स्त्रीच म्हणावे लागेल.या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचा फायदा घेवुन अनेक जण  एम.पी.एस.सी. च्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहेत. त्यांनी स्वतः या स्पर्धा परीक्षा देऊन त्याचा अनुभव घेतला आहे.त्यांनी ठरवले असते तर त्या एखाद्या अधिकारी  पदावर जाऊ शकल्या असत्या पण पतीच्या कार्याला खंबीर साथ देणे, अनेक विद्यार्थी घडवणे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या कार्य करताना दिसताहेत. त्यांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची स्थापना करून एक शैक्षणिक क्रांती घडविली आहे.आज इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अवघ्या काही वर्षातच या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याला कुशल नेतृत्व देण्याचे काम ताईसाहेब करताहेत.  या शाळेचे उद्घाटनच मुळात त्यांनी  शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डी.वाय.पाटील यांच्या हस्ते करून एका अर्थाने यशाकडे जाण्याचे पहिले पाऊल उचलले गेले होते. या शाळेतील नियोजन,अभ्यासू शिक्षक, त्यापेक्षा त्यांच्याकडे असलेली नम्रता, विविध नीतीमुल्य रुजवण्यासाठी शाळेत घेण्यात येणारे अनेक उपक्रम. हे वाखणण्याजोगे आहे.
      कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या यशात एका स्त्रीचे महत्त्वाचे योगदान असते.मग ती स्त्री पत्नी,आई अथवा बहीण या अन्य कोणत्याही नात्याची असो.खरे तर माणसाच्या जीवनाला आकार देण्यात आई इतकेच महत्त्वाचे स्थान पत्नीचे असते. किरण गित्ते साहेब त्रिपुरा राज्याचे   सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, उद्योग पर्यटन विभाग सचिव म्हणून आज काम करताहेत या पुर्वी ही त्यांनी   वेळोवेळी अन्य    जिल्हाधिकारी अमरावती, पुणे महानगर आयुक्त पदावर उत्कृष्टपणे कार्य केले आहे. त्यात ताईंचा सिंहाचा वाटा आहे. अशा शिक्षणावरती अफाट प्रेम करणाऱ्या, आपल्या पतीला यशस्वीतेकडे   घेऊन जाणाऱ्या, आपल्या पित्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या,परळीत  शैक्षणिक क्रांती करू पाहणाऱ्या आधुनिक सावित्री म्हणजे उषाताई  यांचा आज  वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांचे आयू आरोग्य अबाधित राखो व त्यांच्या कडून भविष्यात ही  असेच कार्य घडत राहो.असी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझा शब्द प्रपंच थांबवतो.

          प्रा.डॉ. रामकृष्ण बदने ग्रामीण                      महाविद्यालय,वसंतनगर,
                  ता.मुखेड जि.नांदेड
               भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

Wednesday, December 25, 2024

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्य साठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर बीडमध्ये हातभट्टीवर धाड.

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून आज पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने आज पहाटे पात्रुड गल्ली भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी टाकल्या. यामध्ये रसायनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी शेकडो लिटर रसायन उध्वस्त केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहर ठाण्यातील डीबी पथकातील सपोनि राठोड, सहाय्यक फौजदार सिरसाट, पोहे तांबारे, पोशि सय्यद, मनोज परजणे हे आज सकाळी अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी जात असतांना पात्रुड गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोनि बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 बाजण्याच्या सुमारास पात्रुड गल्ली भागात दोन ठिकाणी छापे टाकून सहा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या डूम मधील शंभर लिटरचे रसायन व दोन पत्र्याच्या डब्यामधील 18 लिटरचे रसायन उध्वस्त केले तर दुसर्‍या कारबाईत पाच लिटरचे दोन ड्रम व इतर साहित्य उध्दवस्त करण्यात आले. या दोन्ही कारवाईत हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्न करण्यात आला असुन या प्रकरणी पो.ह. आजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आले.ना.पंकजा मुंडे यांचे भाष्य होते. सांगत सुरेश धस यांचा धनंजय मुडें वर निशाणा.


आष्टी (प्रतिनिधी) : मागील पालकमंत्री आणि मंत्रीपद भाड्याने देण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. मंत्रीपद भाड्याने दिल्याचे मी नव्हे, तर पंकजा मुंडे यांनीच तेव्हा भगवान भक्ती गडावरून असे भाष्य केले होते. मी तर आता म्हणलो आहे, असे म्हणत पंकजा यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली.

केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचे पडसाद अधिवेशनात उमटले. भाजपचे आ. सुरेश धस यांनी अंगावर शहारे आणणारा सर्व घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी दोन चौकशांचे आदेश दिले होते. अधिवेशन संपल्यानंतर धस आष्टीत आले. त्यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

विष्णू चाटे हा छोटा आका होता; परंतु मोठा आका याचादेखील हत्या प्रकरणात सहभाग आहे. तोच मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्यालादेखील आत लवकर आत टाकले पाहिजे. २०० पेक्षा जास्त कुटुंबे, व्यापारी हे गाव सोडून गेले आहेत. गायछाप, तंबाखू, चुन्याची एजन्सीही बळकावली. आता कोणाकडेही एजन्सी राहिली नाही, असे म्हणत परळीची अवस्था बिकट झाल्याचे आ. धस म्हणाले. परळीतील दुबे अपहरण प्रकरणातही आका असून, ते किती लाख रुपयांत मिटले हे मला माहिती आहे. ते लोक आपल्याला भेटायला येणार असल्याचेही आ. धस यांनी सांगितले.

‘काय होतास तू अन् काय झालास तू’

धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. तुमच्या भरपूर चर्चा कानावर येत आहेत. ती माय माउली बीडमध्येच राहत असून रोज ओरडत आहे, असे म्हणत करुणा शर्मा यांचे नाव न घेता आ. धस यांनी आपल्याला सर्व माहिती असल्याचा इशारा दिला.

धसांनी कॉलर उडवली.

मस्साजोग हे मराठा समाजाचे गाव आहे; परंतु लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे तेथून जात असताना याच संतोष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभेत तो भाजपचा बुथ प्रमुख होता. तो माझ्या पक्षाचा आहे म्हणून मी यात पडलो, असे म्हणत आ. धस यांनी कॉलर उडवत आपण कोणाला घाबरत नसल्याचेही सांगितले. धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून केलेल्या ‘असे प्रकार काय बीडमध्येच घडतात का’, या वक्तव्यावर धस यांनी आक्षेप नोंदविला. तुम्ही अप्रत्यक्ष याचे समर्थनच करत असल्याचे म्हणत मुंडेंवर निशाणा साधला.

सरपंच कै संतोष देशमुख हत्या प्रकरण. बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे.


बीड (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीडपोलिसांचा रोल संपला आहे. दरम्यान, त्या आधीच जिल्हाभरातील सर्वांनी एकत्रित येऊन २८ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चीत केले होते. परंतू आता बीड पोलिसांच्या हाती काहीच राहिले नाही. मोर्चा तर निघणारच आहे, परंतू तो पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाणार की जिल्हाधिकारी कार्यालयावर, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 

मोर्चा जर पोलिस अधीक्षक कार्यालयावर नेला तर पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आता आमच्याकडे तपास राहिला नाही, असे उत्तर देतील. परंतू हाच मोर्चा जर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला तर जिल्हाधिकारी हे आपल्या अधिकारात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय आदींना बोलून यावर मार्ग काढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मोर्चाचे ठिकाण बदलणार की तेच राहणार? २८ डिसेंबरलाच समजणार आहे. 

दरम्यान, या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या मोर्चाचे नियोजन बीडमध्ये करण्यात आले होते.

Tuesday, December 24, 2024

तालुक्यातील ऊसतोड कामगाराचा कर्नाटकातील बेळगावात दगडाने ठेवून खून मुकादम अटकेत.


घटप्रभा (प्रतिनिधी) ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेल्या परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथील एका कामगाराचा मुकादमानेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना 22 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव जिल्यातील घटप्रभा येथील एका दवाखान्यासमोर घडली आहे. याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या टोळीचा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे ( रा. अस्वलआंबा तालुका परळी)  याच्या विरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकादमास  पोलीसांनी अटक केली आहे.

नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वल अंबा, ता. परळी, जि. बीड) हा दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोडीसाठी मुकादम  श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याच्या टोळीत गेला होता. 22 डिसेंबर रोजी मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकासने उपचारासाठी बेळगावजवळ घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरी दरम्यान असणाऱ्या एका दवाखान्यात आणले. रात्री ढाकणे यास रुग्णालयात दाखल करून विकास रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या निवारा गृहात झोपला. काही वेळाने ढाकणे अचानक रुग्णालयाच्या बाहेर आला. काही कळायच्या आत त्याने विकासच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. हे पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले. तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. ढाकणेला सुरक्षा रक्षकाने घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्वलआंबा या गावी  24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मृत विकासच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास जोगदंडच्या वडील, चुलते, भाऊ व इतर नातेवाईकांना ही घटना कळताच त्यांनी घटप्रभा येथे जावून 23 डिसेंबर रोजी मृतदेह ताब्यात घेतला. 24 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या अस्वलआंबा या गावी पोहोचले. आठ वाजता विकास जोगदंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विकास जोगदंड यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

बीड शहरातील बार्शी नाका परिसरात आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर. पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत,दोघे मोकाट.


बी (प्रतिनिधी) : शहरातील बार्शी नाका परिसरात एकाचवेळी तब्बल १६ गाेळ्या फायर करणाऱ्या आठवले गँगमधील तिघांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही कुख्यात सनी आठवले माेकाटच आहे. तर तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. असे असले तरी ज्या गावठी कट्ट्यातून गोळ्या फायर करण्यात आल्या, तो कट्टा कुठे आहे? याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेला लागलेला नाही. तसेच फरार आरोपी शोधण्यातही अपयश आले आहे.

१३ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात आठवले गँगने गोळीबार केला होता. यात विश्वास दादाराव डोंगरे हे जखमी झाले होते. याप्रकरणी आठवले गँगमधील अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले या तिघा भावांसह मनीष क्षीरसागर, ओमकार पवार आणि प्रसार धिवार यांच्याविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यात अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई अशा तिघांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला. अटक आरोपींची पहिली पोलिस कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर पुन्हा हजर केले असता आणखी तीन दिवसांची वाढीव कोठडी मिळाली आहे.

आठवले बंधू कधी शोधणार?

याच प्रकरणातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे दोघे भाऊ मोकाटच आहेत. सनी हा कुख्यात आहे. अनेकदा पहिले एक-दोन आरोपी पकडले की इतर आरोपींना पकडण्यासाठी थोडे दुर्लक्ष केले जाते. परंतु या प्रकरणातही असेच झाले तर हे कुख्यात आराेपी पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या गँगवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भांडणातील हत्यार, शस्त्रे कुठेत?

या भांडणात गावठी कट्ट्यासह इतर हत्यार वापरल्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपी पकडले. त्यांना पोलिस कोठडीतही ठेवले, परंतु त्यांच्याकडून तपासात काय हाती लागले? याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिली नाही. तपासात काही गती मिळाली का किंवा काही शस्त्रे जप्त केली का? असे विचारताच तो तपासाचा भाग आहे, असे म्हणून जप्तीबाबत माहिती देणे टाळले.

अटक असलेल्या तीन आरोपींना आणखी तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. जप्त केल्याची माहिती देता येत नाही, तो तपासाचा भाग आहे.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड

Monday, December 23, 2024

बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा.सरकार ची डोकेदुखी वाढणार.


बीड (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १५ दिवस उलटत आले असले तरी अद्याप तीन आरोपी फरार असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक व्हावी, ही या मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.

"संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले. हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे," अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातील चार अटक असून सुदर्शन घुलेसह तिघे अजूनही फरार आहेत. हाच मुद्दा यावेळी हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदलीही करण्यात आला. आता हत्या होऊन १५ दिवस उलटत आले तरी यातील तीन आरोपी मोकाटच आहेत. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंडही मोकाट असल्याचा आरोप होत आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मीक कराड यांचे नाव घेतले होते. असे असतानाही पोलिसांकडून आरोपी अटक होत नसल्याने बीडमध्ये मोर्चा काढण्याचे नियोजित केले होते. त्यासाठीच सोमवारी बैठक घेण्यात आली. यात सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सर्व नेत्यांचा समावेश होता. सुरूवातीला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या मांडण्यात आले. त्यासाठीच २८ डिसेंबर रोजी सकाळी मोर्चा काढण्याचे ठरले. हा मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.

मुलीला आश्रू अनावरया बैठकीत संतोष देशमुख यांची १२ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी वैभवी देखील उपस्थित होती. आपल्या वडिलांची हत्या झाली. मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी, अशी मागणी तिने केली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. न्याय द्या, सहकार्य करा, अशी विनवणी तिने केली.

नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री मंत्रालयात कुणाला कुठली दालनं.अशी आहे विभागणी!


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल

कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी?

२) राधाकृष्ण विखे पाटील – दालन क्रमांक ५०४, ५०६, ५०८ पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

३) हसन मुश्रीफ – दालन क्रमांक २०५ ते २०७, दुसरा मजला मंत्रालय विस्तार इमारत

४) चंद्रकांत पाटील, दालन क्रमांक ३०२ ते ३०७, तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

५) गिरीश महाजन, दालन क्रमांक ६०५, ६०७, ६०९, सहावा मजला मंत्रालय विस्तार इमारत

६) गणेश नाईक – दालन क्रमांक ५३६, ५३८, ५४० चौथा मजला मंत्रालय मुख्य इमारत

 

७) संजय राठोड, दालन क्रमांक १०२, पहिला मजला

 

८) दादा भुसे, दालन क्रमांक ७००, ७०१, मंत्रालय विस्तार इमारत

 

९) संजय राठोड, दालन क्रमांक १०२ मध्य बाजू, पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत

१०) धनंजय मुंडे, दालन क्रमांक २०१, २०२, २०४, २१२ दुसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

११) मंगलप्रभात लोढा, दालन क्रमांक २०२, मध्य बाजू, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१२) उदय सामंत, दालन क्रमांक १०१, दक्षिण बाजू, पहिला मजला मंत्रालय मुख्य इमारत

 

१३) जयकुमार रावल, दालन ४०७, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१४) पंकजा मुंडे, दालन ४०३, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१५) अतुल सावे, दालन ५०१ दक्षिण बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१६) अशोक उईके, दालन ५०२, मध्य बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१७) शंभूराज देसाई, दालन ३०२, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१८) आशिष शेलार, दालन ४०१, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

१९) दत्तात्रय भरणे, दालन ३०१, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

२०) आदिती तटकरे, दलान १०३, पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

२१) शिवेंद्रराजे भोसले, दलान ६०१, ६०२, ६०४ सहावा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

 

२२) माणिकराव कोकाटे, दालन २०३, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

२३) जयकुमार गोरे, पोटमाळा, मंत्रालय, मुख्य इमारत

 

२४) नरहरी झिरवाळ, दालन २०१, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत

 

२५) संजय सावकारे, दालन ३०३ तिसरा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत

 

२६) संजय शिरसाट, दालन ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० सातवा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत

 

२७) प्रताप सरनाईक, दलान ३१४, ३१६, ३१८ तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

२८) भरत गोगावले, दालन ३१४, ३१६, ३१८

 

२९) मकरंद जाधव, दालन, ३३६, ३३८ तिसरा मजला

 

३०) नितेश राणे, पोटमाळा, मंत्रालय दुसरा मजला मुख्य इमारत

 

३१) आकाश फुंडकर, दालन ११५, ११७, पहिला मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

३२) बाबासाहेब पाटील, दालन ५०१, ५०२, पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत

 

३३) प्रकाश आबिटकर, दालन क्रमांक २२७, दुसरा मजला, मंत्रालय विस्तारीत इमारत

 

 

राज्यमंत्र्यांपैकी कुणाला कुठली दालनं?

१) आशिष जयस्वाल, दालन ६२६ ते ६२८, सहावा मजला

 

२) माधुरी मिसाळ, दालन १३८ व १४० पहिला मंत्रालय विस्तार, इमारत

 

३) पंकज भोयर, दालन २३७ आणि २४१

 

४) मेघना बोर्डीकर, विधान भवन दालन १२५ व १३०, ए व सी येथी तात्पुरती व्यवस्था

 

५) इंद्रनील नाईक, विधान भवन दालन १२३ १२४, तात्पुरती व्यवस्था

 

६) योगेश कदम, विधान भवन, दालन ११७ आणि १२२ तात्पुरती व्यवस्था

सरपंच कै.संतोष देशमुख यांना न्याय देण्या साठी सर्व पक्ष, समाज आणि संघटना एकत्र येणार.


बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानवीय पध्दतीने निघृण हत्त्या केल्याच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्व पक्ष, समाज व संघटना आणि एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि.२३) रोजी बीड शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे सामूहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अतिशय निघृणपणे स्व.देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल १४ दिवस उलटूनही स्व.देशमुख यांचे मारेकरी आणि या प्रकरणाचा सुत्रधार अद्याप मोकाट आहेत. इतके गंभीर प्रकरण असताना प्रशासनाकडून आरोपींच्या अटकेत चालढकल केली जाते आहे. आरोपी हे सत्तेच्या राजाश्रयात असल्याने त्यांना अटक केली जात नाही.‌ सत्तेचा इतका दुरूपयोग जनसामान्यांना घातक ठरत चालला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि सर्व विचारांचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक आंदोलन उभे करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या सामूहिक बैठकीला सर्व पक्ष, संघटना आणि सर्वच विचारांच्या लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कायद्याची घडी बसवणार.जनते च्या सुरक्षेसाठी 24 तास तयार - एस.पी नवनीत कॉंवत


बीड (प्रतिनिधी)आयपीएस नवनीत कॉंवत यांनी शनिवारी रात्री पावणे आकरा वाजता पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला सुरूवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेवून जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना अनेक सुचनाही केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका प्रसार माध्यमां समोर मांडली. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले आहे. त्याअनुषंगाने ते उद्या जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांनाही पुढील कामासंदर्भात अनेक सुचना देणार आहेत.

नवनीत कॉंवत यांनी यापुर्वी लोणावळा येथे डीवायएसपी, धाराशिव येथे अप्पर पोलिस अधीक्षक तर छ.संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच पोस्टींग आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. तसेच कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे सर्वांनी नियमाचे, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, विशेष म्हणजे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपींना कडक शिक्षा होईल त्याअनुषंगाने पुरावे गोळा केले जातील, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. याअनुषंगानेच त्यांनी रविवारी सकाळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बीड जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना सुचना केल्या आहेत. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्‍वाभंर गोल्डे, उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज, श्री. गात, डीएसबीचे कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. तर उद्या एसपी बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना चोख कर्तव्य बजावण्याच्या सुचना करणार आहेतबीड जिल्ह्यात अनेक जण खोटे गुन्हे दाखल करून गोरगरिबांना त्रास देण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांची करडी नजर राहणार आहे.

भरधाव एसटी बसनची दुचाकीला जोराची धडक अपघातात दुचाकीवरील जि.प. शिक्षकाचा जागीच मृत्यू.

गेवराई (प्रतिनिधी) भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जि.प. शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलीफय्याज खान वय 45 रा.महारटाकळी ता.गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फय्याज खान हे तालुक्यातीलच अर्धपिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फय्याज खान हे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव-पुणे या बस क्र. एम.एच.13 सी.यू.7836 ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, अपघातानंतर बसने दुचाकीसह फय्याज खान यांना जवळपास दोनशे फुट फरफटत नेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात फय्याज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करुन फय्याज खान यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

बीड सह राज्यात 11 जिल्ह्यात पालक मंत्री पदासाठी रस्सीखेच.


बीड (प्रतिनिधी) राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बीड सह 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.

या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच

1. पुणे  अजित पवार, चंद्रकांत पाटील

2. ठाणे  एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक

3. सातारा  शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील

4. छ. संभाजीनगर  अतुल सावे संजय शिरसाट
5. यवतमाळ  संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
6.
नाशिक  माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ

7. जळगाव  गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे


8. बीड  धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

9. रायगड  भरत गोगावले, अदिती तटकरे

10. कोल्हापूर  हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर

11. रत्नागिरी उदय सामंत, योगेश कदम

Sunday, December 22, 2024

नवा गडी नवा राज! राज्यातील २३ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या.

1.संजय ज्ञानदेव पवार (एससीएस पदोन्नती) उपायुक्त (सामान्य) अमरावती विभाग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

2.नंदू चैत्राम बेडसे (एससीएस पदोन्नती) संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

3. सुनील बालाजीराव महिंद्राकर (SCS पदोन्नत) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, लातूर यांची व्यवस्थापकीय संचालक, M.S. फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. रवींद्र जिवाजी खेबुडकर (एससीएस पदोन्नती) उपसभापतींचे खाजगी सचिव, विधान परिषद मुंबई यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. निलेश गोरख सागर (एससीएस पदोन्नती) अनिवार्य प्रतीक्षावर.मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, नवी मुंबई.

6. लक्ष्मण भिका राऊत (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, वाशिम यांची बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7.बाबासाहेब जालिंदर बेलदार (एससीएस पदोन्नती) अतिरिक्त आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8.जगदीश गोपीकिशन मिनियार (SCS पदोन्नती) उपायुक्त (सामान्य) छत्रपती संभाजीनगर, विभाग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

9. माधवी समीर सरदेशमुख (SCS पदोन्नत) महाव्यवस्थापक (जमीन) मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

10. डॉ. ज्योत्स्ना गुरुराज पडियार (SCS पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, रायगड यांची आयुक्त, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. अण्णासाहेब दादू चव्हाण (SCS पदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

12. गोपीचंद मुरलीधर कदम (SCS बढती) यांची व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. बापू गोपीनाथराव पवार (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, धाराशिव, यांची पाणी पुरवठा व स्वच्छता सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विभाग, मुंबई

14. महेश विश्वास आव्हाड (SCS पदोन्नत) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, भंडारा यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकाईन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. वैदेही मनोज रानडे (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, ठाणे यांची सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. विवेक बन्सी गायकवाड (एससीएस पदोन्नती) उपायुक्त (महसूल) कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

17. नंदिनी मिलिंद आवाडे (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, सांगली यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. वर्षा मुकुंद लड्डा (SCS पदोन्नती) उपायुक्त (सामान्य) पुणे विभाग, पुणे यांची MAVIM, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

19. मंगेश हिरामण जोशी (SCS पदोन्नत) सहयोगी प्राध्यापक, यशदा, पुणे यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

20. अनिता निखिल मेश्राम (एससीएस पदोन्नती) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, मुंबई शहर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

21. गीतांजली श्रीराम बाविस्कर (SCS पदोन्नत) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, नाशिक यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे (SCS पदोन्नती) सह संचालक, शिक्षण पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, कल्याण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

23.अर्जुन किसनराव चिखले (SCS पदोन्नत) अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती, नंदुरबार यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.