Monday, February 28, 2022

छत्रपतीं संभाजी राजे समोर सरकार नतमस्तक.सर्व मागण्या मान्य !



मुंबई  :-  मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याने, तसेच सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, आज सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आपण उपोषण मागे घेत आहोत. असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिता राजे या देखील उपोषणाला सोबत होत्या. त्यांनी देखील आपण उपोषण मागे घेत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.

राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे हे  माहित आहे. पण, जेथे-जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली आहे.

कांतीकारी साथी न्युज जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी..


मेष – नोकरीत बदलाची चाहूल लागेल. जे काही बदल होतील ते तुमच्या फायद्याचे ठरतील. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. लोकांच्या भेटीगाठीमुळे मन मोकळे होईल. जीवनसाथीची चांगी साथ राहील. क्रोधाला आवर घाला. मुलांना रागावू नका.

वृषभ – भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. नावलौकिक वाढवण्याच्या घटना घडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

मिथुन – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहा.

कर्क – जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. त्यासाठी पैसे खर्च कराल. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूंची देवाण घेवाण होईल. व्यवसायात भरभराट होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील.

सिंह – महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. काही अचानक किरकोळ अडचणी समोर उभ्या राहतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाछी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरीही तुमची नाराजी राहील. खर्चाला आवर घाला.

कन्या – मालमत्तेच्या कामात यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. प्रसिद्धी नावलौकिकात भर पडण्याच्या घटना घडतील मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रवास कार्य साधक ठरेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. 

तूळ – घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आनंद होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आवडीचे पदार्थ ताटात दिसतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन संधी मिळेल.

वृश्चिक – व्यवसायात भरभराट होईल. विक्री चांगली होईल. फायद्याचे सौदे ठरतील. नवीन कल्पना अस्तित्वात येतील. व्यवसायात अभिनव उपक्रम हाती घेतले जातील. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

धनू – धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. अचानक धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकिट काढून पाहण्यास हरकत नाही. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. आत्मविश्वासाने कामे कराल. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. प्रेमात असाल तर घरी सांगण्यास हकत नाही. गृह सौख्य चांगले राहील.

कुंभ – खर्चाचे प्रमाण वाढते राहील. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. प्रवासात दगदग होईल. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र अनेकांचे कळत नकळत सहकार्य मिळेल. त्यामुळे ताण जाणवणार नाही.

मीन – अचानक धनलाभ होईल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. सुहृदांचे सहकार्य मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.


Sunday, February 27, 2022

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामस्थांसाठी. की राजकीय नेत्यांचा निवडणूक खर्च निधी. या विषयी ग्रामस्थांमध्ये जागरूकता हवी.


बीड (प्रतिनिधी)  बीड जिल्ह्य़ातील ग्रामिण भागातील दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अर्थ सहाय्यीत प्रकल्प महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राबविण्यात येतात मात्र स्थानिक राजकारणी आणि आधिकारी यांनी संगनमतानेच योजना चुरून खाल्याचे दिसुन येत आहे. 

आमदारांच्या हस्ते भुमिपुजन ;  काम पुर्णत्वानंतर महिन्याभरानंतर कामाचे भुमिपुजन 
_______
 बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्नातुन आणलेल्या  बालाघाटावरील २३ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे पुजन करताना सुरूवात मौजे. खंडाळा ता.जि.बीड येथुन दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली, यावेळी रा.मा. ५६ ते खंडाळा-ढालेवस्ती रस्ता सुधारणा करणे कामाचे भुमिपुजन करून गेले, रस्त्याची एकुण लांबी ३:२० किलोमीटर असून रस्त्याची अंदाजित किंमत १ कोटो १७ लाख ५६ हजार रूपये आहे ठेकेदाराचे नाव एम.टी. मस्के असुन देखभाल दुरूस्तीची हमी ५ वर्षाची आहे, विशेष म्हणजे काम सुरू केल्याचा दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ असुन काम पुर्णत्वाचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ असा बोर्ड लावलेला आहे. 

ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांना अच्छे दिन की राजकीय नेते आणि आधिका-यांना???
____
बीड जिल्ह्य़ातील ग्रामिण भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येत नसुन अत्यंत निकृष्ट दर्जाची तसेच काम सुरू करण्या अगोदरच काम पुर्ण झाल्याचे फलक लावल्याचे दिसुन येतात, टक्केवारीतुन स्थानिक कार्यकर्ते यांना आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत खर्चाचा निधी म्हणून ही कामे उरकण्यात येत आहेत. 

ग्रामस्थांची ऊदासीनता निकृष्ट रस्त्यास कारणीभूत;जाब विचारायला हवा 
____
ग्रामसडक योजनेंतर्गत होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असताना स्थानिक ग्रामस्थांची उदासिनता दर्जाहीन रस्त्यास कारणीभूत असुन आपल्याला काय करायचे ? आपण कशाला डोळ्यावर या या भुमिकेतुन ग्रामस्थ दुर्लक्ष करतात आणि रस्ता खराब झाल्यानंतर तक्रारी करतात त्यामुळेच नागरीकांमध्ये जागरूकता आवश्यक 



"भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ" - नगरसेवक गोपाळ आंधळे

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे माता पार्वतीसह वास्तव्य असलेले स्वयंभू  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग इतर कुठल्याही ज्योतिर्लिंग ति यज्ञर्थक्षेत्रा पेक्षा अधिक धार्मिक महत्त्व परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आहे. त्यामुळेच या पवित्र  पावन भूमीस पृथ्वीवरील कैलास म्हणून पुराणात उल्लेख केला आहे. मंगळवार दि. १ मार्च २०२२ रोजी प्रभू वैद्यनाथांचा  महाशिवराञ महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र महिमा वाचकांना लाभावा यासाठी चा हा प्रासंगिक लेख. 

     भारत भूमी ही देव भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगापैकी तब्बल पाच ज्योतिर्लिंग आहेत. परंतु परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधार आहे. देवगीरीचे यादव राजे रामचंद्र यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी बाराव्या  शतकात हे मंदिर बांधले आहे. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ गावा नजीक असलेल्या ञिशुला देवीच्या डोंगराचे खोदकाम करून तेथील काळ्या पाषाणाच्या शिला उपलब्ध करून हे सुंदर मंदिर उभे केले आहे. तर होळकर घराण्याच्या सुन आणि बीड जिल्ह्याच्या कन्या पुण्यश्लोक अहिल्या देवी यांनी शके १६९९ मध्ये जीर्णोध्दाराचे काम सुरू केले. आणि शके १७०६मध्ये हे काम पुर्ण झाले.  मंदिर परिसरातील पुर्व घाट,   उत्तर घाट, आणी तीर्थांचा जीर्णोध्दार केला आहे. त्या घटनेची आठवण म्हणून मंदिर परिसरात दिपमालेच्या समोर पुर्वाभिमुख पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा शिल्पकार
एस.बी.परदेशी यांनी आपले कौशल्य पणाला लावून  ब्रान्जचा अर्धाकृती पुतळा दि.७ मार्च १९८६रोजी  बसवण्यात आला आहे.मंदिरातील  पुर्व महाद्वार १९३८ साली जयवंतराव देशपांडे यांनी बांधले.  लाकडी सभामंडप परळीतील कै.रामराव शिवाजीराव ऊर्फ नानासाहेब देशपांडे यांच्या पुढाकारातून लोक सहभागातुन निर्माण केला आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवल कमिटीची स्थापना इ.स.१८९० साली करण्यात आलेली आहे. त्या कमिटीचे पहिले सेक्रेटरी इटालियन व्यापारी गुस्टाओ ऊल्सी हे होते. गुस्टाओ ऊल्सी आणि कॅजिओ यांनी परळी शहरात पहिल्यांदा ५२ जिन्यांची कापसाची मिल सुरू केली. त्यांनीच परळी व्यापार पेठेतून जागल म्हणजे वैद्यनाथ फंड जमा
 करण्याचा कायदा सुरू केला होता. तर छञपती शिवाजी महाराज यांचे सैन्य परळी मार्गे कर्नाटक स्वारीवर जात असे. त्या सैन्याकडून परळीतील लोकांना काही ञास होऊनये या साठी मंदिराच्या विश्वस्थांकडे महाराजांनी अभयपञ दिले होते.  प्रभू वैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा नाथ. परळी वैद्यनाथ मंदिरातील शिवलिंगात साक्षात धन्वंतरि विराजमान आहेत. त्यामुळेच या शिवलिंगास स्पर्श करून दर्शन घेण्याची अनादी काळापासूनची परंपरा आहे. तसेच समुद्र मंथन झाल्यानंतर देव आणि दानवात अमृत मिळवण्यासाठी मोठा वाद झाला होता. तेव्हा नारायणाने मोहिनी रूप धारण करून तो अमृत कुंभ प्रभू वैद्यनाथांच्या शिवलिंगात लपवला होता. त्यामुळे येथे स्पर्श करून दर्शन घेणार्या भाविकास प्रभू वैद्यनाथ अमृताचा वर्षाव करतात अशी दृढ धारणा भाविकांची आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री मंदिर परिसरात बाराही ज्योतिर्लिंगाची मंदिरे असल्यामुळे एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंग दर्शन भाविकास घडते. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री एकशे आठ तीर्थ आहेत. परंतु काळाच्या ओघात त्यापैकी बहुतांश तिर्थ लुप्त झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या तिर्थापैकी मंदिराच्या दक्षिणेस हरिहर तीर्थ आहे. या  या तीर्थात प्रभू वैद्यनाथ रोज स्नान करून मंदिरात विराजमान होतात. तसा उल्लेख जुन्या पिढीच्या महिला जात्यावरील गात असलेल्या ओव्यातून प्रगट होत असे. 
हरि हर तिर्थ काठं /ओला कशानं ग झाला/देव बैजूबा गं माझा जटा निथळीत गेला ॥ 

याच हरिहर तीर्थावर संत जगमिञनागा महाराज यांना हरि आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी सगून रूपात दर्शन दिले. म्हणून या तीर्थास हरिहर तीर्थ म्हणून संबोधले जाते. यासह नारायण तीर्थ, मार्कंडेय तीर्थ, अमृत कूपी तीर्थ, चक्र तीर्थ, गदा तीर्थ, मातृ तीर्थ, पितृ तिर्थ, सुर्य तीर्थ, गंगा तीर्थ अशी तीर्थे अस्तित्वात आहेत. 
* पाच राम मंदिर असलेले नाशीक नंतर केवळ परळी वैद्यनाथ 
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री प्रभू वैद्यनाथांच्या वास्तव्या सोबतच प्रभू रामाच्या पद्स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी ज्याचा उल्लेख आनंदरामायणातील तीर्थ याञा खंडांत आलेला आहे. त्यामुळे च नाशीक क्षेञा प्रमाणेच परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री प्रभू रामाची काळा राम ,गोरा राम, सावळा राम, ढवळा राम, पवळा राम अशी पाच मंदिरे आहेत. 
* पौराणीक तीन नद्या आणि तिन गणपती 
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री पुर्वेस  वेणूमती म्हणजे गणसिध्दी तिचाच अपभ्रंश घणशी नदी, वैद्यनाथ मंदिर आणि जुनी परळी या मधुन वाहणारी सरस्वती नदी म्हणजे आज जिला लेंडी असे संबोधले जाते तर परळी च्या पश्चिम दिशेला कन्हेरवाडी येथून जलालपुर लगत जाणारी ब्रम्हगंगा अशा तिन पौराणीक नद्या आहेत. याच बरोबर मंदिर परिसरात असलेले दक्षिण मुखी गणपती, संत जगमिञनागा महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी बोंबल्या गणपती आहे. तर जुन्या परळी भागातील गणेशपार भागात  श्री गणेश मंदिर आहे. 
* संत नामदेव महाराजा प्रमाणे दासोपंतांसाठी प्रभू वैद्यनाथ पुराण ऐकण्यासाठी मंदिरा बाहेर आले.
दत्तं सांप्रदायिक दासोपंत बिदर येथून संसार त्याग करून काही काळासाठी परळी वैद्यनाथ येथे वास्तव्यास होते .त्या दरम्यान ते प्रभू वैद्यनाथ मंदीरात पुराण कथा सांगत ते ऐकण्यासाठी भावीक मोठी गर्दी करत असत. पण एक दिवस मंदिरातील पुजार्याने दासोपंतांना मंदिरात पुराण सांगण्यास मज्जाव केला. तुझी भाकडकथा बाहेर जाऊन सांगत बस असे म्हणून बाहेर काढले त्यावर न रागावता शांतपणे दासोपंत मंदिराच्या पुर्व दिशेच्या महाद्वाराच्या समोर कथा निरूपणास बसले. त्याच दरम्यान मंदिरातदर्शनाला आलेल्या भाविकांना मंदिरात प्रभू वैद्यनाथांची पिंड दिसेना सर्वञ हलकल्लोळ माजला. मंदिरात पिंड नाही. पुजारी घाबरले इकडे तिकडे शोध घेतला. तर ज्या ठिकाणी दासोपंत निरूपण करत होते तेथे त्यांना पिंड दिसली. सर्वांना दासोपंताचा अधिकार कळला. सर्व पुजारी दासोपंतांना शरण आले. व विनंती केली की हि पिंड दासोपंतानी प्रभू वैद्यनाथांची पिंड मुळ जागेवर ठेवावी अशी विनंती केली. तेव्हा दासोपंतांनी आपल्या अंगावरील उपरणे पिंडवर झाकले व प्रभू वैद्यनाथांना प्रार्थना करून मुळ जागी विराजमान होण्याची विनवणी केली. क्षणार्धात पिंड मुळ जागेवर जाऊन विराजमान झाली. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे दासोपंताची समाधी आहे. मुळ समाधी अंबाजोगाईला आहे. अशाच प्रकारे संत नामदेव महाराज यांचे किर्तन ऐकण्यासाठी औढ्याचे मंदिर फिरले होते. 
*ब्रह्म देवाने स्थापन केलेली तीन शिवलिंगे परळी वैद्यनाथ मध्ये 
ब्रम्हदेवाने परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्रात विविध काळात आणि विविध कारणासाठी तिन शिवलिंगाची स्थापना केली आहे. त्यापैकी सार्वजनिक स्मशानभूमीत मार्कंडेय तीर्थ जवळ एक दुसरे वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण घाटावर ब्रम्हेश्वर शिवलिंग आणि तिसरे मेरू पर्वताकडे जाताना भक्त निवासा शेजारी सिध्देश्वर लिंग असे तीन शिवलिंग ब्रम्हदेवाने स्थापन केलेले आहे. 

*मंदिरात तीन नंदी असलेले एकमेव ज्योतिर्लिंग 
इतर कुठल्याही ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आपल्याला केवळ भगवान शंकराचा एकच नंदी दिसतो. परंतु परळी
 वैद्यनाथ मंदिरात तीन नंदी आहेत. त्याचे कारण असे की दिवसाचे तिन प्रहर असतात. त्या तीन प्रहर सेवा बजावण्याचे काम या तीन नंदी चे आहे. सकाळी वृषभ, दुपारी चंड, आणि संध्याकाळी चैव असे या तीन नंदी चे नाव आहेत. 
याच बरोबर डोंगर तुकाई मंदिर येथे नाणगापुर निवासी दत्तं महाराजांचे दुसरे अवतार प.पु.नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गुप्त रूपाने एक वर्ष अनुष्ठान केले. मोहिनी रूप धारण करून भस्मासूराचा वध केला असे भगवान विष्णू गोपीनाथ रूपाने वास्तव्यास असलेले झुरळे गोपीनाथ मंदिर, काळराञी देवीचे मंदिर, संत जगमिञनागा महाराज समाधी मंदिर, धनमना देवी मंदिर अशी अनेक मंदिरे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आहेत. 
राजा रूक्मांगदाची नगरी म्हणजे आजची परळी,   सत्यवान साविञीची कथा येथेच घडली.चिल्लीया बाळाची कथा इथंच होऊन गेली आहे. संत गुरूलिंग स्वामी, संत वक्रेश्वर बुवा ,संत तुळशीराम महाराज, साध्वी बकुळा बाई, संत सोपान काका आदी संताची ही कर्मभूमी .
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र महिमा सांगणे एका लेखात शक्य नाही. काशी नका जाऊ कोणी/मीच आहे विश्वेश्वर/आश्वासन देतो आम्हा परळी चा/वैद्यनाथ ॥
महाशिवराञ पर्वकाळाच्या निमित्त केवळ स्थळ महात्म्ये कळावे यासाठी  प्रभू वैद्यनाथांच्या कृपेने केलेला हा लेख प्रपंच.
तरी न्यून ते पुरते |अधिक ते सरते | 

करूनि घ्यावे हे तुमते | विनविले मिया || 

*आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती. कृपया हा लेख आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित  लेखन कर्त्याच्या नावासहित करावा. ही कळकळीची विनंती. 
                *आपला*
        गोपाळ रावसाहेब आंधळे
              परळी वैजनाथ 
              ९८२३३३५४३९

बीडचा गजानन सहकारी साखर कारखाना देखील होणार लवकरच सुरू !

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बीड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना मागच्या आठ वर्षापासून बंद आहे .
काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात या साखर कारखान्या बाबतीत बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा अशी मागणी केली होती
सन 2014 पासून राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना कारखाना बंदच आहे . यामुळे येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे , परंतु याकडे संबंधित नेत्यांनी म्हणावे तसे लक्ष आज पर्यंत दिलेले नव्हते .
कर्जाचा आकडा वाढतच असल्यामुळे या कारखान्यावर नियंत्रण असलेल्या बँकेनेच आता हा कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते . यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाचा प्रश्न सुटणार आहे.

बीड येथे मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग.लाखोच्या मोटारसायकली जळुन खाक.


बीड (प्रतिनिधी) :- बीड शहरातील हिरो या मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. आग एवढी भीषण असून गोदामा सह शोरूम मध्ये देखील पसरली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून झोपेत असताना तलवारीने सपासप वार केले आणि झाले फरार.



गेवराई (प्रतिनिधी) :- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये जुन्या भांडणाची कुरापत काडून शनिवारी रात्री १ च्या सुमारास झोपेत असताना तलवारीने सपासप वार केल्याने एक गंभीर तर एकाची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी औरंगाबाद या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की श्रीदेवी येथील दोन कुटुंबात गेल्या काही वर्षापासून जमिनीचा वाद सुरू असून या वादामुळे मागील वर्षी गुन्हा घडला होता त्याचाच राग मनात धरणी पुना शनिवार रात्री झोपेत असताना हल्ला शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले व त्यांनी समीर यांच्यावर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार करून फरार झाले आहेत .

या घटनेमध्ये समीर च्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुढग्यावर वार झाले आहेत ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेंडकी या ठिकाणी घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीर यांच्याकडे धावत जाऊन समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने शेख समीर याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी तलवाडा पोलीस जखमीच्या चौकशीसाठी औरंगाबाद या ठिकाणी गेलेले असून बीट अमलदार तोंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की डॉक्टर ने काही वेळानंतर चौकशी करा तोपर्यंत सदर जखमी शी कसल्याही प्रकारे विचारपूस करू नका असे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणी तलवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत 

धनगर समाजाने स्वता:चे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी संघटीतपणे लढा देण्याची गरज - व्यंकटेश चामनर

 .
बीड (प्रतिनिधी) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा पंधरावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री.व्यंकटेश चामनर साहेब पंचायत समिती सदस्य अंबाजोगाई,व रखमाजी सावंत साहेब पंचायत समिती सदस्य अंबाजोगाई,यांच्या शुभहस्ते करण्यात आले व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन मा श्री. सोडगिर साहेब, व मा श्री.वसंत शिंपले सरपंच यांच्या शुभहस्ते करण्यात आले*
 आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास संबोधित करताना मा.व्यंकटेश चामनर साहेब म्हणाले धनगर समाजाने स्वतः चे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी संघटीतपणे लढा देण्याची गरज आहे,हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल अभिनंदन आपन आपल्या दैवताचा आदर केला पाहिजे या उपक्रमातुन समाज एकत्र येतो यातुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे आपन सर्वांनी दर रविवार उपस्थित राहुन अभिवादन केले पाहिजे* 
अभिवादन सभा प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सुरू केली त्याचा लाभ समाजाने घेतला पाहिजे दर रविवारी आपले दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपन सर्वांनी अभिवादन केलेच पाहिजे असे मा.सोडगिर साहेब यांनी सांगितले.
यावेळी महादेव गावडे , हजारे ग्रामसेवक साहेब,सुर्यकांत कोकाटे, पत्रकार महानोर साहेब,तांबे सर,काळे रोहीत साहेब,  महादेव राहींज सर,पवन गावडे ता अध्यक्ष, महानोर साहेब, सोमनाथ लंबाटे, ढवळे बाळासाहेब, सतिश लंबाटे साहेब, ढवण सर, विठ्ठल कोकाटे सर, चादर सर,सूधाकर वैध साहेब,प्रविण उघडे, महादेव राहींज राजुरी ,काकासाहेब कानाडे, भोसले सर, माऊली मारकड , ढवण भैय्या, अमोल गावडे, दिपक मदने,ढवळे भैय्या,आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक  व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पूजन अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे

वस्तीगृहातील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग.माजी जि.प.अध्यक्षावर गुन्हा दाखल.



भंडारा (प्रतिनिधी) :
 वसतीगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेचे
माजी अध्यक्ष सुमेध शामकुंवर यांच्याविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पास्काे) कायदा व विनयभंगाचा गुन्हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. सुमेध
शामकुंवर हा राष्ट्रवादीचा नेता असून गुन्हा दाखल झाला तेव्हापासून पसार आहे. विशेष म्हणजे शामकुवरच त्या
वसतीगृहाचा संचालक आहे. भंडारा येथील राजीव गांधी चौकात समाज कल्याण अंतर्गत ग्रामीण विकास संस्थेव्दारा संचालीत वसतीगृह आहे.
त्या वसतीगृहात मोहाडी तालुक्यातील एका गावात विद्यार्थीनी राहते. ती काही दिवसापूर्वी आपल्या गावी गेली
होती. शुक्रवारी शामकुवर यांनी विद्यार्थीनीच्या वडिलांना फोन केला. मुलीला घ्यायला आल्याचे सांगितले.
वडिलांनी मोठ्या विश्वासाने शामकुवर यांच्या चारचाकी वाहनात बसवून दिले. भंडाराकडे येत असताना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव ते विहीरगाव मार्गवर एका ठिकाणी चारचाकी गाडी थांबवून तिचा विनयभंग केला.
त्यानंतर ते दोघेही वसतीगृहात पोहचले. हा प्रकार तिने आपल्या मैत्रीणींना सांगितला. मैत्रीणीने त्या विद्यार्थीनीच्या
वडिलांना माहिती दिली. त्यावरून रात्री वडिलांनी आंधळगाव ठाणे गाठून तक्रार दाखल केली.रात्री उशिरा
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.शामकुवर पसार असून त्याला शोधण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना
झाल्याची माहिती आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी दिली. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि आता
राष्ट्रवादीत आलेल्या शामकुवर यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली
आहे.

नॅक’च्या अध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड.

पुणे- राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी Dr. Bhushan Patwardhan डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली. दीर्घकाळानंतर नॅकच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. प्रा.जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नॅकचे अध्यक्षपद रिक्त होते.ते त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डॉ. पटवर्धन यांची नॅकच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 1994 मध्ये नॅकची स्थापना करण्यात आली. डॉ. अरुण निगवेकर नॅकचे पहिले अध्यक्ष होते.ते देशभरातील महाविद्यालयांचे गुणवत्तेसाठी मूल्यांकन करण्याचे काम नॅककडून करण्यात येते.ते Dr. Bhushan Patwardhan डॉ. पटवर्धनर्ध सध्या आयुष मंत्रालयात राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून
कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी यूजीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. बोगस संशोधन पत्रिकांना चाप लावण्यासाठी यूजीसी केअर यादी,महाविद्यालयांतील संशोधन क्षमता वृद्धीसाठी स्ट्राईड योजना, मानव्यता आणि समाजशास्त्रात संशोधनाला प्रोत्साहनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य .


 व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: धोका पत्करू नका, आज मोठी समस्या सुटेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग - पिवळा
  2.  
  3. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस, अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. दिवस प्रसन्न जाईल. आजचा शुभ रंग - केशरी
  4.  
  5. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - नारंगी  
  6.  
  7. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  व्यवहार करताना घाई करू नका. घरात प्रसन्न वातावरण राहील.रोजगाराची नवी संधी मिळेल. आजचा शुभ रंग - मोरपिशी
  8.  
  9. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.  जोडीदाराचे प्रेम लाभेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. आजचा शुभ रंग - चंदेरी
  10.  
  11. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today:  धार्मिक कार्यात मन लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. आजचा शुभ रंग - निळा
  12.  
  13. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today:   नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. आजचा शुभ रंग - आकाशी
  14.  
  15. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  घरात पाहुणे येतील. विनाकारण खर्च वाढतील.कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग -  सोनेरी
  16.  
  17. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today:   शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. मनावर ताण राहील. घाई करू नका.  आजचा शुभ रंग - हिरवा
  18.  
  19. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today:  काही कारणास्त प्रवास करावा लागेल. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग - लाल
  20.  
  21. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today:   गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मित्रांची साथ लाभेल. बेरोजगारी दूर होईल. आजचा शुभ रंग - सफेद
  22.  
  23. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today:  दुरून चांगली बातमी मिळेल. थोडी धावपळ होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - केशरी

Saturday, February 26, 2022

परळीत आर्थिक व्यवहारातुन चाकूचे वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी      शहराजवळच आयेशा नगर येथे एका ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली तर या हल्ल्यात त्या महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.२६) दुपारी समोर आली. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याचे समजते. भर दिवसा झालेल्या या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाली असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर तरुण माजलगाव तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. 
=====================

*महाशिवरात्री विशेष* "शिवतत्वाची आंतरिक साधना करा"

    

* श्री आशुतोष महाराज, (संस्थापक व संचालक, दिव्य ज्योति जग्रति संस्थान).

महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीची रात्र! या महिन्यात पुन्हा ही महारात्री येणार आहे. ऋषी सांगतात की ही रात्र सामान्य नाही, विशेष आहे. यामुळेच दरवर्षी या वेळेवर  भारतीय जनमानसात भक्तीभावनेला उधाण येते. पूजा अर्चनेचे स्वर गुंजतात. उदबत्त्या आणि नैवेद्याने शिवालय सुगंधित होतो. शिवाची पूजा करण्याच्या या पद्धतीला 'कौलाचार' म्हणतात. ही बहिर्पुजा आहे. यामध्ये महादेवाच्या बाह्य मूर्तीची किंवा लिंगाची बाह्य पूजा बाह्य मार्गाने केली जाते. महापुरुषांच्या मते केवळ ही पूजा करणे पुरेसे नाही. ही उपासनेची पहिली पायरी आहे. भगवान शिवाची प्रत्यक्ष उपासना अंतरंगात केली जाते, ज्याला शैव ग्रंथांमध्ये वृत्त म्हणतात. या 'आत्मा' (काळ) 'आचार' म्हणजेच उपासना करतो. ही उपासना कमळाच्या फुलात विराजमान असलेल्या सदाशिवाच्या  दिव्य आध्यात्मिक साधनेने केली जाते.

खरे तर महाशिवरात्री हा सण दरवर्षी आपल्याला या 'आंतरिक पूजेची' प्रेरणा देण्यासाठी येतो. महाशिवरात्री म्हणजे आपल्या अंतरंगाची हाक! अमावस्येच्या आधी एक रात्र ठरणे हा साधा योगायोग नाही. अमावास्या भंग - 'अमावस्या' म्हणजे एकत्र राहणे. या काळोख्या रात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सूर्य आणि चंद्र एकमेकांमध्ये राहतात वास्तव्य करतात. हे शिव आणि आत्मा यांच्या मिलनाचे प्रतीक आहे. म्हणूनच शिवरात्री सूचित करते की,आपणही आपल्या आंतरिक शिवतत्त्वात वास केला पाहिजे, आपले आत्मे त्याच्याशी एकरूप होऊ दे. तुमच्यातील शिवतत्व कसे साकारायचे हा प्रश्न आहे. त्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे ब्रह्मज्ञान! ब्रह्मज्ञान देणे हे केवळ एका परिपूर्ण गुरूच्या सामर्थ्यात असते. जेव्हा तत्वदर्शी सद्गुरु ब्रह्मज्ञान देतात, तेव्हा आपल्याला आपल्या आंतरिक जगामध्ये भगवान शिवाच्या तेजस्वी रूपाचे प्रत्यक्ष दर्शन होते. किंबहुना, ब्रह्मज्ञानातून शिवाचे प्रकाश-तत्त्वच प्रकट होत नाही, तर त्याच्या दर्शनासाठी साधकाचे 'ज्ञाननेत्र'ही जागृत होते. तुम्ही 'ज्ञाननेत्र'ला 'शिवनेत्र', 'तिसरा डोळा', 'तिसरा डोळा', 'दिव्य दृष्टी' इत्यादी कोणत्याही नावाने संबोधू शकता. भगवान शिवाच्या मस्तकावरील तिसऱ्या डोळ्याप्रमाणे हे ज्ञान-नेत्र प्रत्येक साधकाच्या कपाळावर असते, परंतु सूक्ष्म स्वरूपात असते. ब्रह्मज्ञानाने हा डोळा उघडताच भगवान शिवाचे प्रत्यक्ष दर्शन घडते. महादेवाची 'लालताक्षः', 'भालनेत्र:', 'त्र्यंबकह' इत्यादी नावेही ब्रह्मज्ञानाद्वारे ज्ञानाची ही नेत्र प्राप्त करण्याचा संदेश देतात.

 दिव्य ज्योती जागृति संस्थेच्या  वतीने सर्व वाचकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही 'शतत्व' नाही, 'शिवत्वाकडे प्रवास' करावा हीच आमची इच्छा आहे.

महावितरणचं सुलतानी धोरण अनं शेतक-यांच मरण.ज्वारी काढणीची लगबग .

ग्रामिण भागात सध्या ज्वारी काढणीची लगबग असुन मध्यंतरी सरसकट विज कनेक्शन तोडुन ठराविक रक्कम भरल्याशिवाय जोडणी नाही या सुलतानी हट्टापायी डिसेंबर-जानेवारीत विहीरींना पाणी असूनही भिजणं झालं नाही त्यामुळेच कणसं भरली नाहीत, त्याचबरोबर महावितरण आधिकारी-कर्मचा-यांकडुन सर्वांनी १०० टक्के विजबिल वसुलीनंतरच जोडणी करण्यात येईल यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या काही शेतक-यांकडुन विजबिल तात्काळ न भरण्याचा फटका बसला त्यामुळेच उत्पन्न कमी निघाल्याची खंत मौज. मुळुक ता.जि.बीड येथील शेतकरी पांडुरंग ढास यांनी बोलाऊन दाखवली, सध्या मजुर मिळत नाहीत, प्रत्येकजण आफापल्या शेतातच गुंतलाय त्यामुळे भंडारवाडी येथील महिला मजुर आणल्या आहेत प्रति मजुरी महिला ३०० रूपये आणि जाण्यायेण्याचे भाडे १५०० रूपये वेगळेच. 

महावितरणकडुन वसुली जोरात मात्र सुविधा नाहीत अन रात्रीचं भिजवणं जीवाला घोर
___
महावितरणकडुन ज्या प्रमाणे सक्तीची विजबिल वसुली केली जाते मात्र जळालेला ट्रान्सफाॅर्मर बदलुन आणण्यापासुन फ्युज टाकण्यापर्यंत सगळी कामं आणि त्यासाठी लागणारा खर्च शेतक-यांनाच करावा लागतो. कर्मचारी तालुक्यावरून येजा करतात मुक्कामी रहात नाहीत, भिजण्यासाठी  रात्री दारे धरावे लागतात रात्री ११ ते पहाटे ३ अशी लाईट सुरू असते या कालावधीत विंचु काट्यापासुन सर्पदंशाच्या घटना घडल्याची उदाहरण आढळुन येतात मात्र शेतक-याच्या जीवाला जरी घोर असला तरी महावितरण आधिकारी-कर्मचा-यांना त्याचं काहीही घेणं देणं नसतं. 



महावितरणच्या विरोधात 28 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे "जबाब दो" आंदोलन.

*सामान्यग्राहकांप्रति वीज कंपनीची अन्यायकारक दुटप्पी भूमिका खपऊन घेतली जाणार नाही - लुगडे महाराज

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार "सर्वसामान्यांना त्रास आणि धनदांडग्यांना अभय" अशा पद्धतीचा असून परळीच्या भागाचा विचार केला तर काही ठराविक कंपन्या आणि धनदांडग्या लोकांकडे लाखो रुपयांचे बिल असताना त्यांच्या लाईट कट न करता सर्वसामान्य लोकांच्या दोन - तीन हजार रुपये वीज बिल बाकी साठी कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता,नोटीस न पाठवता कडक कारवाई करून लाईट  कट करण्याचे प्रकार सर्रास परळीत घडत आहेत.
वीजबिल वसुलीला आमचा विरोध नाही. सर्वसामान्य नागरिकांना  जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून धनदांडग्यांना पूर्णपणे अभय असल्याचा स्पष्ट आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. अशा या दुटप्पी भूमिकेच्या  विरोधात सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने "जवाब दो" आंदोलन करण्यात येत असून सर्वसामान्य लोकांनी आपल्या लाईट बिलासंबंधी तक्रारी असतील तर संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात कळवाव्यात. ग्रामीण भागाचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून वीज जोडणीसाठी कोटेशन भरून सुद्धा त्यांना वेळेवर कनेक्शन मिळत नाही, डीपी दिली जात नाही. डीपी दिल्यानंतर अनेक गावातील लोकांच्या डीपी जळाल्यानंतर तात्काळ दुसरी डीपी देत नाहीत. दिल्यानंतर वरून दोन तीन हजार रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जातात. शेतकऱ्यावर आणि सर्वसामान्यावर सातत्याने महावितरण अन्याय करत असून याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरत असून तक्रारदार नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे तसेच अनेक वायरमन हे फिल्डवर काम करत नसून प्रत्येकाच्या हाताखाली खाजगी एक एक दोन दोन माणसं कामाला असून पूर्ण कारभार तेच लोक बघत आहेत. अशा परिस्थितीत काही मोठा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण ? शहराचा विचार केला तर सर्रास लाईट कट करण्याचे प्रकार चालू असून मीटर कट करून पुन्हा जोडणी च्या कामाला हजार पाचशे रुपये घेतल्याशिवाय मीटर जोडणी होत नाही. यामुळे सर्वसामान्यांची लूट होत आहे. ग्रामीण असो की शहर लाईटचा लपंडाव सर्रास चालू असतो ग्रामीण भागात लाईटचे पोल बऱ्याच ठिकाणी खाली वाकलेले दिसून येतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून परळी शहरात उघड्या असलेल्या डिफेन्स चे प्रमाण खूप मोठे आहे. याकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष असून. या निगरगट्ट गेंड्याच्या कातडीच्या महावितरण प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे "जवाब दो" आंदोलन होत असून या आंदोलनात सर्वांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या जबाब दो आंदोलनाला समविचारी विविध संघटना पक्षांचा पाठिंबा असून या आंदोलनामध्ये ते सहभागी होणार आहेत. लाईटच्या संदर्भात ज्यांच्या काही तक्रारी आहेत अशा नागरिकांनी  संपर्क करावा. असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज 
मो. 97 67 33 51 67 शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव 8688773877 यांनी केले आहे

प्रा.डाॅ.अमर आलदे यांना पिएचडी मिळाल्या बद्दल ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते सत्कार .


परळी वैजनाथ (वार्ताहर) आज दि .26 फेब्रुवारी  परळी येथील नवगण महाविद्यालयाचे हिंन्दी विषयाचे  प्रा.डाॅ.अमर आनंद आलदे यांना डॉ.  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पी एच डी  मिळाल्या बद्दल आलदे यांच्या निवासस्थानी  त्यांचा सहपरिवाराचा सत्कार करतांना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून त्याचा सन्मान करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन शुभेच्छा दिल्या

धारूर तालुक्यातील डाॅक्टर मुलगी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन रूजु.


 तेलगाव (प्रतिनिधी) ज्या बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे अशा जिल्ह्यातील असलेल्या  धारूर तालुक्यातील आम्ला येथील डाॅ. रजनी जनकराव कदम औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन नुकत्याच रूजु झाल्या. याबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. 
         धारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यात असलेल्या आम्ला येथील माजी सरपंच तथा सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जनकराव कदम यांची डाॅ. रजनी जनकराव कदम हिने ग्रामीण भागात आम्ला येथे आपले प्राथमिक शिक्षण घेऊन, पुढील शिक्षण लातुर व इतरञ घेतले.ग्रामीण भागातील मुली गावात असलेल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण सहसा घेत नाहीत.मात्र रजनी हिने प्रथम पासुनच उच्च शिक्षण घेऊन,डाॅक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचे ठरवले होते.तीन महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून वैद्यकीय शिक्षण पुर्ण करत डाॅक्टर झाली.स्ञीरोग डाॅक्टर झाल्यानंतर याच विषयात तिने एम.डी.करावी असे आ.प्रकाश दादा सोळंके यांनी सांगत तिचा एम.डी.साठीचा होणारा सर्व खर्च आ.सोळंके यांनी केला. ग्रामीण भागातील महिलांत पोटाच्या आजारासह इतर आजार असतात.त्यामुळे तीने स्ञीरोग डाॅक्टर होण्याचे ठरवत. यामध्ये एम.डी. केली.बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. यावर नुकतीच मोठी चर्चा झाली.माञ रजनी हीने मुलगी काय करू शकते.हे यातुन दाखवत देत एम डी डाॅक्टर होऊन, तीने स्वतः सह आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण तर केलेच शिवाय आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव लौकीक केले.डाॅ. रजनी हीची नुकतीच औरंगाबाद येथील घाटी शासकीय रूग्णालयात स्ञीरोग तज्ञ म्हणुन नियुक्तती झाली.याबद्दल डाॅ. रजनी जनकराव कदम हिचे तिचे आ.प्रकाश दादा सोळंके, मा. धैर्यशील काका सोळंके, सभापती जयसिंह भैया सोळंके,  वडील जनकराव कदम, आई, भाऊ यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा परभणी येथे नागरी सत्कार आणि दै. सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.


परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)भारतीय संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्यायाची देणं देत व्यक्तीहिता सह  राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्याने सक्षम माणूस घडविणारा संस्कार दिला आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत हा समता प्रस्थापित करणारा अधिकार भारतीयांना दिला.आज आत्मनिर्भर समाज निर्माण हे आपणा सर्वांचे ध्येय असले पाहिजे.शिक्षणाला संस्कारासह, संस्कृतीची जोड दिली गेल्याने क्षमता पूर्ण कौशल्याधिष्ठीत पिढी घडत आहे.स्वावलंबन आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना आत्मशोधा बरोबरच आत्मोन्नतीचा मार्ग धुंडाळताना प्रामाणिक परिश्रमातून अभूतपूर्व यश संपादन करा.सदगुण आणि सदाचार ही व्यक्ती सह राष्ट्र उभारणी साठीची गुरुकिल्ली आहे.या सुवर्ण संधीचा फायदा घेत कौशल्य पूर्ण जगाचे नायक बना असा मूलमंञ नागरी सत्काराला उत्तर देताना स्वानुभवातून गांधीवादी विचारवंत पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिला.   
           दै.सोमेश्वर साथीच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दै.सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार- २०२२ चे वितरण आणि एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा नागरी सत्कार प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक अरुण मराठे, प्रमुख अतिथी मनपा उपमहापौर भगवानराव वाघमारे,स्थायी समीती सभापती गुलमीर खान, एपीआय कोतवाली चे फेरोज खान पठाण,स्वागताध्यक्ष एकताचे संस्थापक अजमत खान, प्रमुख अतिथी अभिनेता अदनान खान,एकताचे विदर्भ अध्यक्ष,अनिल नरेडी,आयुर्वेदाचार्य डॉ.एस.एन.राव,समाजसेविका, कवयञि संगीता ताई जामगे, तुषार मराठे आदींची उपस्थिती होती.
       जगात जर्मनी भारतात परभणी या म्हणी प्रमाण अशक्य ते शक्य करुन दाखवणारी  परभणीची माणसं.येथील माणसं आणि कणसं कसदार असल्याने परभणीत कोणतंही कार्य लोकसहभागातून सहज पुर्ण होते.खड्डे मुक्त संकल्प घेवून मनपा कार्य करित असून विकासकामी परभणीकरांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.उपमहापौर पदावर आल्या पासून मी परभणी करांचे प्रश्न सोडवत आहे,याचं समाधान व्यक्त करित मनपाच्या वतीने पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचे स्वागत करीत त्यांना नागरी सत्कार आणि वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा मनपा उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी दिल्या.
           परभणी मनपा, परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असून स्थायी समिती सभापती या नात्याने काम करताना परभणी करांनी दाखविलेला विश्वास, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडताना सेवेचे समाधान लाभत असल्याचे मत मनपा स्थायी समिती सभापती गुलमीर खान यांनी व्यक्त करीत अग्निहोत्री आणि पुरस्काराचे मानकरी यांना शुभेच्छा दिल्या.
      मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय दै. सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार- २०२२ चे वितरण जिल्हा युवक काॅग्रेसचे उपाध्यक्ष पवन निकम, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ .विठ्ठल घुले, प्राचार्य कविता कराड,प्रा.डाॅ.रामकृष्ण बदणे,आदर्श सरपंच नवनाथ मुंढे, मुख्याध्यापक कृष्णकुमार दडके ,सुरेंद्र लोखंडे , कोतवाली चे एपीआय फिरोज खान पठाण, सहा.पोलीस निरीक्षक शहर वाहतूक सचिन इंगेवाड, सुप्रसिद्ध कवयञी संगीताताई जामगे, हरिश्चंद्र घुले, सुरेश हिवराळे, प्रा.डॉ.अशोक उबाळे ,प्रा डॉ राजीव यशवंते, प्रा.डाॅ. नसीम बेगम,प्रा.डॉ.अरुणा ईटकापल्ले,सौ. प्रमिला लोखंडे, शहानूर पठाण, विजयकुमार तिवारी, रामेश्वर पुरी,प्रा.रामराव कटारे,  श्रीनिवास करखेलीकर ,माधव नालमवाड, शेख अफसर शेख सालार, अभिनेता गुल्लू दादा, अभिनेता रुपेश डहाळे, प्रा.अरुण पडघन असे एकुण ३१ मानकरी यांना पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
     पुरस्काराने जबाबदारीत वाढ होते. अधिक आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.हा पुरस्कार आत्मिक बळ देणारा असल्याचे मत अध्यक्षिय समारोपात अरुण मराठे यांनी व्यक्त केले.
            संविधान एक रास्ता या चिञपटाचा शुभमुहूर्त पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजमत खान यांनी केले.
पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक बालासाहेब फड यांभनी आभार व्यक्त केले.प्रा.अरुण पडघन यांनी संचलन केले.राष्ट्गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गेवराईत पालख्या डोंगरावर सापडला धडा वेगळा झालेला हाडांचा सापळा.तर मुंडके झाडाला टांगलेले.

     प्रतिकात्मक फोटो

बीड – (प्रतिनिधी) गेवराईच्या पालख्या डोगरावर एक मानवी हाडांचा सापळा सापडला आहे. या मानवी सापळ्याचे मुंडके झाडाला टागलेले आहे आणि धडाचा सापळा खाली पडलेला आहे.यामुळे गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गेवराई शहराच्या दक्षीण दिक्षेला पालखा डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे अशी माहिती दि 24 रोजी रात्री पोलीसांना मीळाली होती म्हणून पोलीस घटना स्थळावर पोहचले तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. त्याचे मुंडके झाडाला टांगलेले होते शरीराचा पुर्ण सांगाडा झालेल्या आवस्थेत होता पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. या घटने मुळे खळबळ उडाली आहे. हा सापळा नेमका कोणाचा. हि हत्या कि आत्महत्या याचा पोलीस कसुन शोध घेत आहेत.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२२; नोकरीत प्रगती होईल, नवीन जबाबदारी अंगावर पडेल.

मेष – भाग्याची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. कामाचा ताण कमी होईल. नावलौकिक वाढेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भविष्याच्या योजना आखाल

वृषभ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात सावधानता बाळगा. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवणार नाही. याची दक्षता घ्या. कामात अडचणी येतील. संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगती होईल.

मिथुन – आरोग्यात सुधारणा होईल. मनात उत्साह राहील. मनासारखी घटना घडेल. जीवनसाथीशी सूर जुळेल. तरुण वर्गाला प्रेमात योग्य प्रतिसाद मिळेल. भाग्याची चांगली साथ राहील. एखादा अकल्पित लाभ होईल. अडचणींचे आपोआप निराकारण होईल.

कर्क – मनाविरुद्ध घटना घडेल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढालू देऊ नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील. ईश्वरी उपासनेमुळे मन:शांती मिळेल.

सिंह – मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. त्यांचे कौतुक होईल. फायदा होईल. नवीन संधी मिळेल. नोकरीत एक पाऊल पुढे पडेल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. जवळपासचा प्रवास होईल. प्रवासकार्य साधक ठरेल.

कन्या – नोकरीत प्रगती होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात आपल्याला फायदा होईल. बदलीला सामोरं जावं लागेल. घरात उत्साही वातावरण राहील. लोकांची ये-जा सुरू राहील. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी होतील.

तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचा लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होईल. जवळचा प्रवास होईल. व्यवसायात भरभराट होईल. मालमत्तेच्या कामात फायदा होईल. नोकरीत अनुकूल घटना घडेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

वृश्चिक – ग्रहमानाची अनुकूलता राहील. अचानक फायदा होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहींना पदोन्नती मिळू शकते. विविध प्रकारचा लाभ होईल.

धनू – मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. घरात एखाद्या सदस्याशी काही कारणाने थोडा वाद होण्याची शक्यता आहे.

मकर – मनावरील ताण हळूहळू कमी होईल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त कराल. मनावर थोडा संयम ठेवून खर्चाचे नियोजन करा. दूरच्या प्रवासाचा योग येईल. मुलांशी संवाद साधा. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल.

कुंभ – धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध प्रकारचा लाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महागड्या, चैनीच्या वस्तू खरेदी कराल. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या व्यक्तींना भेटण्याचा योग येईल.

मीन – नोकरीत बढती मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. न्यायालयीन काम मार्गी लागेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. घरी पाहुणे येतील

पारदर्शक कारभरासाठी श्री संत तुकाराम विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या - सचिन भांडे

*उमेदवारांचा डोर टू डोर प्रचारावर भर .

परळी वैजनाथ : श्री संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पूर्वीप्रमाणेच पारदर्शक कारभरासाठी यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकित श्री संत तुकाराम विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन भांडे यांनी केले आहे. 
परळी शहराजवळ असलेला व मोठ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या  वडसावित्री परिसरातील, श्री संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित परळी या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीसाठी (ता.27) रोजी मतदान होणार आहे. 
येणाऱ्या पुढील पाच वर्षात संस्थेचा कारभार पूर्वीप्रमाणेच पारदर्शक व विकसित व्हावा यासाठी सर्व सभासदांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता प्रा.गंगाधर शेळके सर प्रणित व त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत असलेल्या सर्व उमेदवारांच्या पतंग या निशाणीवर फुलीचा ठसा मारून बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन भांडे यांनी केले आहे.

Friday, February 25, 2022

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय.


 

* कालबद्ध रितीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे - मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

मुंबई  : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच आदी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजासंदर्भातील निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व समाजाच्या, समन्वयकांच्या मागण्यांची माहिती दिली. या विषयांवर विचारविनिमय होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.

व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदे भरणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असून, त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले .

सारथीची पद भरती प्रक्रिया महिन्याभरात

‘सारथी’ संस्थेसाठी आवश्यक असलेल्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली जाईल. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १८ नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

इतर वसतिगृहेही सुरू करण्यासाठी प्रयत्न

डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेअंतर्गत ठाणे, पुणे, सातारा (कराड), सांगली (मिरज), कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर येथील सात वसतिगृहे वापरासाठी सज्जे असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.

मराठा आंदोलनातील जे गुन्हे मागे घ्यायचे राहिले आहेत त्यांच्याबाबतीत महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह तसेच विधी व न्याय विभागाकडून न्यायालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षण रद्दबातल केल्यानंतर विविध नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे.

कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली.जे.जे.रूग्णालयात केले दाखल.


मुंबई :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आणि 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय मलिक यांना पोटदुखीमुळे रात्रभर झोप लागली नाही, त्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना दाखल करण्यात आले.

सध्या, ईडी किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून होत आहे.

कुर्ला जमीन व्यवहारात नवाब मलिक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे, त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. अटकेपासून ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांच्या कुटुंबावरही ईडीने आपली पकड घट्ट करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आज नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराज मलिकांचाही या व्यवहारात सहभाग होता.

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती जिल्हात सर्वत्र जोरदार स्वागत.


* प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व ना. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र.

मुंबई (प्रतिनिधी) : - बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अंबाजोगाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका, माजी आमदार अमरसिंह पंडित, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आबा डक, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, युवती आघाडीच्या अध्यक्ष कु. सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती. 

राजेश्वर आबा चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासूनचे सदस्य असून खा. पवार साहेबांचे निष्ठावंत मानले जातात. याआधी म्हाडाचे सदस्य, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषवली आहेत. श्री. राजेश्वर आबा चव्हाण यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. 

दरम्यान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करत, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चे विचार सध्या आचरणात आणण्याची गरज-डॉ.संतोष मुंडे


*संगम येथे शिवजयंतीनिमीत्त रक्तदान शिबीर,कानाची मशिनद्वारे तपासणी.
 
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी लोककल्याणकारी राज्यकारभार करत सर्वधर्मसमभाव जोपासला शिवरांचे विचार आपल्या आचरणातुन सत्यात आणले समाजातील अनेक प्रश्न सहज सुटतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्रचे अध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले.
      संगम ता.परळी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, अध्यक्ष परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी(पिन्टु)मुंडे प्रमुख पाहुणे पो.उप.नि.(ग्रामीण)डॉ.विशाल शहाणे,नाथ प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रा.शंकर कापसे,जेष्ठ नेते राधाकृष्ण साबळे पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय ता.अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, लोणी सरपंच विश्वनाथ देवकते, शिव व्याख्यात्या कु.श्रुतीताई जाधव प्रमुख उपस्थिती सरपंच गंगाधर नागरगोजे, तंटामुक्ती अध्यक्ष बापुदादा नागरगोजे,मंडळ कर्षी अधिकारी गादेकर मँडम, नेत्र तज्ञ डॉ. मोहन मुळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुमीत काळे, जि.प.शाळा मुख्याध्यापक नावंदे सर,मा.उपसरपंच हनुमंत कामाळे, युवक नेते हरीश नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, अनिल कामाळे, टोकवाडी ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंडे, रावसाहेब नागरगोजे, बबनराव गिराम,माणीक गिराम, जेष्ठ नेते व्यंकटराव हरणावळ,दत्ता गिराम, संदिपान कोकाटेमा.उपसरपंच हरिभाऊ गिराम, पो.पा.पांडुरंग रोडे,प्रभाकर गिराम,बाळु गिराम,शिवाजी राजे कोकाटे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.वेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की,छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.आजची सुशिक्षीत पिढी शिवचरित्र वाचुन प्रगल्भ होत आहे.संगम येथे आयोजित शिवजयंती ही खर्या अर्थाने शिवरायांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश गिराम, उपाध्यक्ष गोविंद गिराम, सचिव अभिषेक गिराम, सहसचिव गणेश चव्हाण, बबन काळे, गोविंद चव्हाण, अच्युत चव्हाण, मनोज गिराम,संतोष कोकाटे, सचिन गिराम, माऊली सुरनर, प्रमोद कोकाटे,प्रताप मोगरे, भारत गायकवाड, सोमेश्वर दराडे, मोना नागरगोजे, किशोर गिराम,बाबा रोडे, बंडु गिराम, रुक्षी जाधव, लहुदास चव्हाण, ईश्वर चव्हाण,प्रताप कोकाटे, नंदु गिराम, महेश कामाळे, श्रीकांत नागरगोजे, निलेश काळे, सुरेश वाघमारे,श्रीकांत गिराम, वैभव गिराम आदींनी परिश्रम घेतले.
सार्वजनिक शिवजन्मोत्सवसमिती ,ना.धनंजय मुंडे आरोग्य मीत्र योजना व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व कानाची काँम्नयुटराईजड मशीन तपासणी (अँडोमेट्री)शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे उदघाटन डॉ. संतोष मुंडे, सभापती बालाजी(पिन्टु)मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रहमंत्र्यांना भेटणार.- प्रा.जोगेंद्र कवाडे.


बीड (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी वाळू माफियांच्या अवैध उत्खननामुळे पडलेल्या खड्ड्यात जीव गेलेल्या चार निष्पाप बालकांच्या कुटुंबियांना चकला शहाजानपुर येथे भेट देत धीर दिला या प्रसंगी कवडे यांनी जिल्ह्यात वाढलेला माफिया राज यांच्यावर टिका करत प्रशासनाने तात्काळ पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची सहानुभूती निधी देण्याची मागणी केली, तसेच जिल्ह्यात वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे ही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे.
चकला शहाजानपुर येथील सिंदफणा नदी खोऱ्यात बेसुमार अवैध वाळू उत्खनन मुळे पडलेल्या खड्ड्यात परिसरात राहणाऱ्या चार निष्पाप बालकांचा जीव गेला याप्रकरणी वाळू माफिया वर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पीडित कुटुंबीयांना प्रशासनाच्या वतीने अद्यापही सहानभूती आर्थिक निधी मिळालेला नाही, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माफिया राज सुरू असून हप्ते कोरी वृत्तीमुळे अवैध धंदे चालकांचे मनोबल उंचावले आहे छोट्याशा गावातील चार निष्पाप बालकांचा जीव अवैध वाळू उत्खनन मुळे झाला याला जबाबदार कोण? पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी कुटुंबीयांची भेट का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करत इतर अपघात झालेल्या ठिकाणी पालकमंत्री तात्काळ मदत करतात मात्र महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना घडूनही पालकमंत्री घटनास्थळी भेट देण्यास टाळाटाळ करतात सामाजिक मंत्र्याचे सामाजिक वागणे बरोबर नव्हे यासंदर्भात धनंजय मुंडे यांची भेट घेणार असून पीडित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे असेही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले, पीडित कुटुंबीयांना धीर देत लवकरच गरम मंत्री अर्थमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व प्रकरणाची सत्य माहिती समोर आणून तात्काळ पीडित कुटुंबीयांना दहा लाख रुपयाची प्रत्येकी सहानभूती निधी मिळून देणार असल्याचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले यावेळी त्यांच्यासोबत मराठवाडा सचिव अनिल तुरुकमारे , उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष शेख फिरोज, आरुष वाघमारे, ज्येष्ठ नेते सवई, शिंदे, यांच्यासह चकला शहजादपुर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान.शिवजयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई काळे पाटील यांचा उपक्रम.


बीड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त महिला मराठा क्रांती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. बीड येथील स्काऊट गाईड भवन येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई श्यामसुंदर काळे पाटील यांनी केले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. छाया सोंडगे खोसे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नमालाताई धांडे, सरस्वती जनार्दन तुपे, पीएसआय मीनाताई तुपे यांची उपस्थिती होती.
पुरस्कार सन्मानित महिला सौ . सुवर्णाताई निंबाळकर राजे, सातारा शिवमती सुंदरताई चौरे, बीड, शिवमती जयश्रीताई सावंत, शिवमती शोभाताई जाधव, प्रा .शांताताई पवार, शिवमती मंगलताई उबाळे, शिवमती आशाताई चव्हाण, शिवमती अरुणाताई आवटे, शिवमती विद्या तीबोले, शिवमती कमल निंबाळकर, जिजाऊरत्न पुरस्कार सन्मान मिळालेल्या सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रेखा ताई ढेरे घोलप, व राजश्री काळे पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित बहुसंख्येने महिला होत्या जिजाऊ रत्न पुरस्कार समिती प्रा. संध्या पाटील प्रा. संगीता इंगोले, अनिताताई शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अनिता भोसले, मीरा डावकर, शिवसेनेच्या चंद्रकला बांगर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ताई माने, सुजाता माने, सुजाता सौ एडवोकेट प्रेरणा डोईफोडे , आशाताई जगताप सौ मीनाताई चौरे सौ  , सावित्री शिंदे सपकाळ, सुषमा गायकवाड, स्वप्नाली उबाळे, सौ शितल गायकवाड, सौ . उशा गोरे, सौ. सुजाता चव्हाण, सौ. दुर्गा जाधव उपस्थित होत्या.
संभाजी ब्रिगेडचे शरद चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव, देवीसिंग शिंदे, व्याख्याते ज्ञानदेव काशिद, विनोद आप्पा इंगोले, बाळकृष्ण झोडगे, शहादेव हिंदोळे, दादासाहेब सादोळकर, वैभव स्वामी, डोंगरे सर, परजणे सर ,तसेच बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छोट्या ऋषिकेश हावळे या बालकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा गायीला. दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी अध्यक्ष कार्यक्रमाचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नमाला ताई धांडे यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ समिती यांनी नियोजन आयोजन करून पुढाकार घेतला. आभार प्रदर्शन शेवटी प्रा . वैशाली ताई तळसकर यांनी केले. कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला.
प्रमुख पाहुणे प्रा. छायाताई सोडगे म्हणाल्या की, महिलांना प्रेरित करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा असून जास्तीत जास्त महिलांनी मुख्य प्रवाहात येवून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कुंदाताई  काळे म्हणाल्या की, आज आम्ही कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आहोत. जिजाऊंचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकत्रित येवून कार्य करणे काळाची गरज आहे. आज पुरस्कार देताना खूप आनंद होत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पी एस आय मीना तुपे मॅडम म्हणाल्या की, महिलांनी संकटाना संधी समजून त्यातून मार्ग काढला पाहिजे. जिजाऊंचा आदर्श समोर ठेवला तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही.  यावेळी कमल निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. शांता पवार, चौरे मॅडम, सावंतआई यांनी आपले मनोगत पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यक्त केले. रत्नमालाताई धांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मोंढा भागात मोटर सायकलची चोरी अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी मोंढा मार्केट हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस उभी असलेली मोटार सायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिस ठाणे कडून प्राप्त माहिती अशी की दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी फिर्यादी निळोबा मुकुंद मुंडे रा. वानटाकळी यांची मोटारसायकल क्रमांक एमएच 44 पी 6027 होन्डा कंपनीची, रंग काळा, अंदाजे 25,000 रुपये किमतीची मोटर सायकल मोढा मार्केट येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे उभी केली होती. सदरील वर्णाची मोटरसायकल अज्ञात इसमाने चोरी केली असून निळोबा मुकुंद मुंडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुरन 38/2022, कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. शिंदे हे करीत आहेत

महिलेशी असभ्य वर्तन कर्मचाऱ्या डाॅ.अशोक बांगर यांना निलंबित करण्यासाठी जिल्हारूग्णालया समोर धरणे आंदोलन :-अॕड.संगीता धसे


बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नेकनुर कुटीर रूग्णालयातील महिलेशी असभ्य वर्तण करणा-या आयुष विभागातील डाॅ.अशोक बांगर यांच्यामुळे रूग्ण आणि कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पवित्र वैद्यकीय व्यावसायाची बदनामी करणा-या डाॅ.अशोक बांगर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अड.संगिता धसे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात संजीवनी राऊत, अश्विनी झनझने, किस्किंदा पांचाळ, वर्षा कुलकर्णी, विद्या सेलुकर, शुभांगी कुलकर्णी, डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, स्वप्निल गलधर, युनुस शेख, मोहम्मद मोईज्जोदीन ,शेख मुबीन, परमेश्वर लोंढे,डाॅ.संजय तांदळे, श्रीकांत गदळे आदि सहभागी आहेत. 

जिल्हाप्रशासनाला घटनेचे गांभीर्य नाही;२० दिवस उलटुनही कारवाई नाही, चौकशी समितीचा फार्स:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
_____
नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय आधिकारी यांनी महिलांशी असभ्य वर्तण करण्याची ही पहिलीच वेळ डाॅ.अशोक बांगर यांच्याविषयी यापुर्वीही तक्रारी आलेल्या असून कर्तव्यावर मद्यपान करण्यासहीत असभ्य वर्तणाची तक्रार २० दिवसापुर्वी प्राप्त होऊन सुद्धा राजकीय वरदहस्त असल्याने तसेच पिडीत महिला व वैद्यकीय आधिका-यांवर दडपण आणुन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न असून जिल्हाप्रशासनाला या विषयांचे गांभीर्य नसुन दि.२१ फेब्रुवारी रोजी त्रिसदस्यीय समिती गठीत करून ४ दिवसात अहवाल सादर केल्यानंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी देऊन सुद्धा ठोस कारवाई न केल्यामुळे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली, तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी. 

खळबळजनक !! बीडच्या जमिनीच्या वादातुन रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार ; दोघे जखमी.

बीड - शहरात नगर रोड भागात असलेल्या मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आज शुक्रवार (दि.२५) सकाळी ११ वाजता झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सतीश बबन क्षीरसागर (वय ३०, रा. लक्ष्मणनगर, बीड) व फारूक सिद्दीकी (वय २८, रा. जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे तरुण सकाळी रजिस्ट्री कार्यालयातआले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोलीअराच्या घटनेची माहिती कळताच पोलिस उपाधीक्षक संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता एन. राव, शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गद्दारांच्या नाही तर, विश्वासू मित्रांच्या जीवावर काम केल्याने तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार - बदामराव पंडित


* गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे.

बीड (प्रतिनिधी) गेल्या तीस वर्षापासून मी गेवराई तालुक्याच्या सामाजिक चळवळीत काम करत आहे. गट-तट आणि जात-पात याचा कधीच विचार केला नाही. जो येईल त्याचे काम केले. आजही करत आहे. आपण आज पर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले ते, "गद्दारांच्या" जीवावर नाही तर "विश्वासू मित्रांच्या" जिवावर केले.(Shiv Sena public meeting)

      

त्यामुळे कोण कोठे गेला ? याचा मी कधीच विचार करत नाही. पण जो माझ्या सोबत आला त्याला मात्र आयुष्यभर विसरणार नाही. यावेळीही तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकणार असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.

       शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेवकी या जिल्हा परिषद गटात आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीत ते बोलत होते.
     

 याप्रसंगी जि प माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, जय भवानी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय येवले, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, मधुकर मस्के, कानिफनाथ नागरे, कैलास कोकणे, भास्कर हातागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खंडणी व हत्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या कोठडीतून फरार.

आमगाव (प्रतिनिधी) दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी,मध्यप्रदेश)हा पोलीस कोठडीत होता.आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनआवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका देत भिंत कुदून फरार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.याप्रकारामुळे मृतकाच्या कुटुंबातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी आमगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असून पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी गोळा झालेली आहे.पोलीस कोठडीतून आरोपी फरार झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे यापुर्वी याच पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मारहाणीदरम्यान पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले होते.त्यावेळी सुध्दा पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेले होते.आत्ता या प्रकरणामुळे पुन्हा आमगाव पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.जेव्हा आमगाव पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय एकमेकाला लागूनच असताना अशा प्रकार घडलाच कसा नागरिकांनी सवाल केला आहे.यांसदर्भात पोलीस निरिक्षक विलास नळे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीच्या शोधात असल्याने बोलणे होऊ शकले नाही.

शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रात पीक विम्याचा बीड पॅटर्न राबवा -; वसंत मुंडे.

             
 मुंबई  ( प्रतिनिधी )  प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये २०२० चा खरीप विमा न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पिक विमा कंपन्या वर व केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी असल्याची माहिती काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष कोर कमिटी सदस्य नांदेड जिल्ह्याचे प्रभारी वसंत मुंडे यांनी महाराष्ट्राचे कृषी खात्याचे प्रधान सचिव  एकनाथ डवले सहसचिव गणेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली . दोन वर्षापासून देशात व महाराष्ट्रात करोना रोग, व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे पिकाचे नुकसान झाले असून शासनाने व विमा कंपन्यांनी ७२ तासाच्या पंचांनामे संदर्भात अटी ऑनलाइन ऑफलाइन घालून शेतकऱ्यांना त्रास दिला व विमा कंपन्यांना संरक्षण दिले असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . विमा कंपन्या शासनाच्या  एनडीआरएफ अथवा एसडीआरएफ निकाशाचे पालन 
 पंचमान यासंदर्भात तयार नाहीत . संपूर्ण हप्ते नियमानुसार पीक विम्याची भरलेले असून राज्य सरकारने एक हप्ता वर्ग केलेला आहे आणि त्यामधून २५ ते ३५ टक्के पिक विमा कंपनीला या योजनेमध्ये कमिशन मिळते. परंतु शेतकऱ्याला एकही रुपया २०२० चा खरीप हंगामाचा विमा कंपन्यांनी आजतागायत वाटप  केलं नाही अनेक कंपनीच्या  व शासनाच्या विरोधात शेतकरी न्यायालय मध्ये गेले आहेत., शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो का नाही हा प्रश्न २०२० च्या संदर्भात उभा राहिलेला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार पीक विमा बाबत कंपन्यांना संरक्षण देतात आणि शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणे त्याऐवजी कंपन्यांनी संपूर्ण शेतकऱ्याचे व राज्य सरकार केंद्र सरकारने एक हप्ता भरलेले पैसे स्वतःकडे ठेवून भरगच्च पैसा विमा कंपनी लुटीत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला .  पिक विम्याच्या सर्व खाजगी कंपनी असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या नियमाला बगल देत असून न्यायालय मध्ये जा अशा धमक्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या देत आहेत. विमा शेतकऱ्यांना देण्यात विलंब लावून पैशाचा उपयोग पूर्णपणे स्वतःसाठी पिक विमा कंपन्या करीत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.त्यामुळे शासनाची पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी तारक होण्याऐवजी मारक होत आहे असा आरोप वसंत मुंडे नी शासनाकडे निवेदनाद्वारे केला. शासनाची एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने बीड जिल्ह्यामध्ये पिक विमा बाबत २५ टक्के नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरवले असून कमिशनही २० टक्केच आत केंद्र व राज्य सरकारच्या पिक विमा कंपन्या बीड पॅटर्न मध्ये मिळणार आहे. त्यामुळे बीड पॅटर्न राज्यांमध्ये राबविणे काळाची गरज आहे.  २५% शेतकऱ्याला पिक विमा मिळेल अशी गॅरंटी बीड पॅटर्न मध्ये आहे .करिता महाराष्ट्रात ज्या कंपन्या बीड पॅटर्न राबवत नाहीत त्यांना काळ यादी टाका आणि एक हप्त्याचे पैसे, शासनाने दिलेले तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्याचे " खास बाब" म्हणून आदेश देण्यात यावेत. पीक विमा कंपन्या नियमाचे पालन करीत नसल्यामुळे त्यांचे टेंडर रद्द करण्याची मागणी   महाराष्ट्राचे कृषी विभागाचे प्रधान सचिव  एकनाथ ढवले, सहसचिव गणेश पाटील आणि अवर सचिव नीता शिंदे यांच्याकडे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष  वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.