Wednesday, July 28, 2021

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर.

वरोरा :- (प्रतिनीधी) राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता अभिजित कुडे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाचआहे , कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्याचे परिपूर्ण ज्ञान असलेले अभिजित कुडे हे प्रशासनाशी ग्रामीण जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झगडताना त्यामुळे त्यांचा आक्रमक शैलीमुळे त्यांचे काम लवकर होतें अश्याच एका प्रश्नाला त्यानी वाचा फोडली असून मागील एक महिन्या पासून प्रलंबित प्रश्नाला त्यानी एका दिवसात सोडविले आहे.
नागरी येथील शेतकऱ्यांनी दिनांक २४ जुलै रोजी अभिजित कुडे याना फोन केला की भाउ आमचा शेतातील डी पी एक महिन्या पासून बंद आहे तर तुम्हीं महावितरण कार्यालयात येता काय . त्यानी लगेच शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली वरोरा येथे मुख्य अभियंता याना कॉल करून विचारणा केली त्या नंतर त्यांना सवलती वर बिल भरायला सांगितले व त्या नंतर तातडीने डी पी लावायला सांगितली .  अधिकारांना फोन करून तात्काळ लावायला सांगितली डीपी लावायला उशीर का अस अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा त्यानी ऑफिसियल  कारणे सांगितले पण, अभिजित कुडे यांनी आक्रमक भूमिका घेउन मला उद्या च्या उद्या डिपी पाहिजे असे ठणकावून सांगितले आणि, काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले व त्यामुळे अभिजित कुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

गुंगीचे औषध बळजबरीने देऊन असह्य महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल.





परळी वैजनाथ: (प्रतिनिधी) असाह्य महिलेवर गुंगीचे औषधं बळजबरीने खाऊ घालून अत्याचार केल्याची घटना रविवार दि 25 रोजी तालुक्यातील धर्मापुरी येथे घडली.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबतीत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते .याच असहायतेचा फायदा घेत गल्लीतील 27 वर्षीय युवक अफसर शेख याने रविवार दि 25 रोजी दुपारी 4 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून जबरी अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376,452,323 भां द वी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोउपनि पवार हे करीत आहेत.

परळीत सर्व काही मॅनेज करणाऱ्या गुटखा माफियाना परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले रंगेहात !

* तब्बल 11 लाख 20 हजारांचा मुद्देमलासह 3 लाख 20 हजार चा गुटखा केला जप्त!

* 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल,1 आरोपी ताब्यात!

 परभणी/ बीड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक याच्या विशेष पथकाने काल पहाटे मदिना पाटी परिसरात कारवाई करत एका चारचाकी वाहनातून तसस्करी होत असलेला अवैध गुटखा पकडला आहे.  यामध्ये 3लाख 20 हजार 280 रुपयांच्या गुटक्यासह 11 लाख  20 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये एकूण 9 आरोपीविरोधात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस कर्मचारी  संतोष सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये आरोपी आदिल खान जाफर खान (पठाण), सय्यद तय्याब, वसीम खान, गफार मकदुम काकर, मुस्तक खान शब्बीर खान (तांबोळी) अल्ताब पठाण सरदार पठाण, फेरोज वहाब पठाण, वहिद खान (शेख), रिजवान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदिल पठाण यास ताब्यात घेण्यात आले आहे.
एक इनोव्हा  गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे दिसतच पोलिसांनी या गाडीचा संशय आल्याबरोबर या गाडीचा पाठलाग करत एम एच 04 सी जी 9908 हे वाहन थांबवण्यात आले असता यामध्ये राजनिवस, जफराणी जर्दा, आदी सह अवैध गुटखा जप्त करत ही कार्यवाही केली.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी लटपटे, सय्यद जाकेर, घोडके,दीपक मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, तुपसुंदरे, दिलावर खान, किशोर चव्हाण , शेख अजहर, हरी तुपसे, सय्यद मोबीन, संतोष सानप, निळे तसेच नवा मोंढा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही धडाकेबाज कार्यवाही केली.
बीड जिल्ह्यातील परळी येथील वरील 9 ओरोपी  असून या आरोपींची जिल्ह्यात सर्व यंत्रणा मॅनेज करत अवैध गुटख्याच्या बाजार मांडला होता मात्र यांच्यावर अध्यप एकही मोठी कार्यवाही करण्यात आली नव्हती.मात्र परभणी पोलिसांनी हिम्मत दाखवीत ही धडाकेबाज कार्यवाही केल्याने परळीत परभणी पोलिसांची  अभिनंदन करण्यात येत आहे.

आर्थिक विवंचनेतुन दिव्यांग शाळा कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.



 

माजलगाव  : (प्रतिनीधी) माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील अभिमान दगडु पवार वय ३२ वर्षे दिव्यांग शाळा कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरात पत्राच्या आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.२६ जुलै रोजी पहाटे घडली आहे.

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे दिव्यांग शाळा असून तिथे अभिमान पवार हा सफाईगार या पदावर कार्यरत होता. सदरील दिव्यांग शाळा ही दिव्यांग कल्याण आयुक्तालय कडुन मे 2020 पासुन बंद असल्याने मागील 14 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने हातास काम मिळत नसल्याने तसेच पगारपत्रकावर काढलेले बँकेचे हप्ते कसे फेडायचे ? या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत अभिमान पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.

अभिमान पवार यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, आई, वडील भाउ बहिण असा परिवार आहे. अभिमान हा घरातील करता पुरूष होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. पवार कुटूंबीयावर मोठे दुख कोसळले आहे.

शेतकऱ्यासाठी मोठी बातमी ! महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर.


whatsapp sharing button
facebook sharing button
messenger sharing button
sharethis sharing button

दिल्ली ; (कांतीकारी साथी न्युज)      कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान,विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु करण्यात आलं.

सभापतींना मध्यस्थी करण्यास भाग पाडले म्हणून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. “कृपया आपल्या जागांवर परत या आणि कामकाजात भाग घ्या. आपण सरकारला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. कृपया सहकार्य करा,” अशी बिर्ला वारंवार विनंत्या करत होते.

गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. “आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, ” असे तोमर म्हणाले.

Tuesday, July 27, 2021

डॉ.आर.बी.पवार यांचे कोरोना काळातील काम जनता विसरणार नाही.- पवार जनतेतला अधिकारी - अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) साडे तीन वर्ष बीड जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर काम करणारे डॉ. राधाकिशन पवार हे जनतेतले अधिकारी आहेत. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर घेतलेली मेहनत जनता विसरणार नाही. सातारा येथे त्यांची बदली याच पदावर झाली आहे. ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी आज त्यांचा सत्कार करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

              जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा परिषदे अंतर्गतच्या संपूर्ण यंत्रणेचा कारभार पाहून कोरोना काळात स्वतःदेखील कोविड सेंटरला भेटी देऊन त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांना धीर देण्याचे काम केले. जनतेत जाऊन काम करणारा एक अधिकारी म्हणून जिल्हाने त्यांच्याकडे पाहिलं. आता बीड पेक्षा मोठा असलेला सातारा जिल्हा तिथली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी त्यांना देण्यात आला आहे.

               कुसळंब तालुका पाटोदा येथील रहिवासी असलेले डॉक्टर पवार यांनी कुसळंब येथे पाच कोटी रुपयांची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जवळपास पूर्णत्वाला आणली आहे. या त्यांच्या गावी कोरोना केअर सेंटरचे पहिले उद्घाटन करून त्यांनी कोरोणा केअर सेंटरच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी अनेकांना उपलब्ध करून दिली. आज देखील कुसळंब येथे आडूसष्ट कोरणा बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी काढलेली कोरोना केअर सेंटर आता बंद झाली असली तरी डॉक्टर पवार यांच्या गावचे कोरोना केअर सेंटर मात्र रुग्णांना अजूनही आधार देत आहे.

            अधिकारी स्वतः जेव्हा झोकून देऊन काम करतो, तेव्हा त्यांच्या आधिपत्याखाली काम करणारी यंत्रणा निश्चितच सक्रिय राहते. याचा अनुभव जन आंदोलनाने सर्व ठिकाणच्या तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफ बरोबर काम करताना पाहिले आहे. डॉक्टर पवार यांचे काम पाहून तळापर्यंत काम करणारी अंगणवाडी सेविका देखील कोरोना काळात सक्रिय राहिलेली आपण पाहिलेली आहे.

             त्यामुळे डॉ. आर. बी. पवार यांचा जन आंदोलनात तर्फे सत्कार करून त्यांना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक देखील भेट देण्यात आले आहे. डॉक्टर पवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन साताऱ्यात देखील त्यांच्याकडून अशीच सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी सातपुते सर हे देखील उपस्थित होते.

परळी नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीवर उर्दू भाषेत नाव लावण्यासाठी एम आय एम च्या वतीने आंदोलनाचा इशारा. न.प.मुख्यधिकारी यांना दिले निवेदन .

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) परळी शहराच्या वैभवात भर घालणारी परळी नगर परिषदेची इमारत असुन या इमारतीच्या कार्यालयावर उर्दू भाषेत नाव लावण्याची मागणी परळी एम आय एम च्या वतीने करण्यात आली असून सदर इमारतीवर 13 ऑगस्ट पर्यंत उर्दू भाषेमध्ये नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अन्यथा 14 ऑगस्ट 2021 रोजी एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी, मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला व जिल्हाध्यक्ष एडवोकेट सेपिक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एम. आय. एम. चे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक शेख शरीफ शेख रोशन यांनी मुख्याधिकारी नगर परिषद परळी वैजनाथ यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून होत असलेल्या आर्थिक फसवणुकी बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन.




कांतीकारी साथी न्युज ;- शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांनाची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात, सोशल मीडिया वर जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे आमिष देतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तसेच त्यांचे सी डी सी व पासपोर्ट सुद्धा ठेवून घेतात जेणे करून ते कुठे ही दुसरी कडे नोकरीचे प्रयत्न करू शकणार नाही. ह्या बनावट शिपिंग कंपन्या सर्रास मोठ मोठ्या शिपिंग कंपन्यांच्या लेटरहेड वर नियुक्तीपत्र, बनावट व्हिसा, फ्लाइट तिकीट व इतर कागदपत्र देतात त्यामुळे, सिफेरर्स त्यांना पैसे देतात. बरेच वेळेस हे कायद्याच्या कचाट्यात अडकून देखील यांच्यावर चाप बसत नाही, मग ते पुन्हा उजळ माथ्याने फसवणुकीचे धंदे निर्भीड पणे करतात. सदरबाबी मध्ये आम्ही आंदोलने व कायदेशीर पद्धतीने सदर घटनांना घालून त्या विरोधात लढा देवून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेकदा प्रशासनाकडून मिळणारी अपुरी मदत व सर्रास कंपन्या चालवणारे मास्टर माइंड हे परराज्यात बसून अश्या तऱ्हेची फसवी यंत्रणा चालवत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासन देखील याबाबतीत सहकार्य करण्यात अपुरे पडत आहे.
ऑल इंडिया सिफेरर्स युनियन च्या शिष्टमंडळाने काल दिनांक २६ जुलै २०२१ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोशीयारी जी यांची भेट घेतली , त्या वेळी सिफेरर्स बांधवाच्या इतर समस्या , त्यांची होणारी फसवणूक , लसीकरण मध्ये येणाऱ्या समस्या , गोवा च्या सिफेरर्स चे काही प्रश्न  या बाबतीत अनेक विषयांचावर चर्चा झाली व त्यांनी त्या बद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला , संघटनेचे कडून मा राज्यपाल यांना शिवरायांची मूर्ती भेट देण्यात आली आणि त्यानी देखील मोठ्या आनंदाने त्याचा स्वीकार केला , आणि युनियन च्या आज पर्यंत केलेल्या करायची तोंडभरून स्तुती देखील केली आणि मा. राज्यपालांनी प्रस्तुत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे यूनियनला आश्वासन दिले. 
यावेळी ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन चे अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे, खजिनदार शितल मोरे आणि प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) अफजल देवळेकर उपस्थित होते.

80 हाजार रूपयांची लाच घेताना लाचखोर पीएसआय ताब्यात !


आष्टी ( प्रतिनीधी) अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली.

लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे .

त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 80 हजार रूपये देण्याचं ठरलं. त्यांनतर सोमवारी औरंगाबाद एसीबीने कारवाई करत लोखंडे यांना पकडलं. याबाबत अभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळीच्या आठवडी बाजारातील घटना महिलेची फसवणूक. सोन्याचे दागिने केले लंपास; आरोपी फरार





 परळी वैजनाथ- (प्रतिनिधी) सोमवार आठवडी बाजारातून काल दिनांक 26 रोजी बाजार करून आपल्या घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यात पडलेले दोन सोन्याचे बिस्किट दिसले. त्यापैकी एक तिने उचलून घेतले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्किटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या असे म्हणल्यावर या महिलेने आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले असल्याचा  प्रकार घडला आहे. आपल्याला भुरळ पाडून हे दागिने लंपास केल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिता नवनाथ गित्ते वय 50 वर्षे राहणार वडसावित्री नगर ही महिला बाजारातून घराकडे जात असताना रस्त्यात दोन सोन्याची बिस्किटे तिला दिसून आली. यापैकी एक बिस्किट तीने उचलून घेतले. तिच्या पाठीमागून एक इसम आला व त्याने दुसरे बिस्किट उचलून घेतले. आयसी आयसीआय बँकेच्या रस्त्यावर असताना या इसमाने महिलेचा पाठलाग करत तिला गाठले व माझे सोन्याचे बिस्किट परत द्या अशी मागणी करू लागला. या महिलेला बोलत असताना सिगरेट ओढत त्याचा धूर या महिलेच्या तोंडावर त्याने सोडला त्यामुळे आपल्याला भुरळ पडली व अंगावरील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून दिल्याचे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चव्हाण हे करीत आहेत.

Sunday, July 25, 2021

भाजप पक्षावर कार्यकर्ते नाराज पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब.

 

 बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे. 

* पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांना धीर 

* पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी

पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.

* एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही 

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.

Saturday, July 24, 2021

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत ?


अहमदनगर - (प्रतिनीधी)  मुलाच्या जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यामागे लागलेले शुक्ल काष्ठ काही कमी होताना दिसत नाहीत. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालायाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, या निकालाविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीपाठोपाठ सरकारी पक्षानेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देताना, त्यांच्याविरुध्दचा खटला रद्द केला होता.

मात्र, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र अंनिसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षानेही संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिले आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी (ता.२२) याचिका दाखल केली.

नेमकं काय आहे प्रकरण 
एका कीर्तनात बोलताना इंदोरीकर महाराजांनी “स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला, तर मुलगी होते..” असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. लिंग भेदभाव करणारे हे वक्तव्य असल्याचा आक्षेप घेत, जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.

इंदोरीकर महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य कुठे, कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचे कारण देत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा केला. या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून 2020 रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले होते. मात्र, नंतर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती.

Monday, July 19, 2021

परळी न.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी.


* होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट.

परळी वैजनाथ - (प्रतिनीधी)   कोरोना संकटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाच परळी नगरपालिका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांच्या जाहिरातीवर पैशांची उधळपट्टी करत असल्याचं चित्र पाहावयास मिळालं. होर्डिंग, बॅनर व वाढदिवसाचा जल्लोष यामध्ये नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. शेवटी आपल्याच मस्तीत जल्लोष साजरा करणाऱ्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी व आपली समस्या मांडण्यासाठी सर्वेश्वर नगर मधील नागरिकांनी फक्त मतं मागायला येता….ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट अशा आशयाच बॅनर लावत चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. निदान आतातरी नगरपालिका जागी होऊन सामाजिक न्याय देईल काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.


एकीकडे कोरोना संकटामुळे धन्वंतरी असलेल्या वैद्यनाथाचे मंदिर बंद असल्यामुळे नागरिकांच होत्याचं नव्हतं केलं रोजगाराची समस्या उभी राहिली. खायला महाग झाली. लादलेल्या निर्बंधांमुळे जनता पिळवटून निघाली. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं चित्र या संकट काळात पाहायला मिळालं. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास दीड — दोन वर्षाच्या कारकिर्दीत कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी झाला नाही. कोरोना संकटात आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र पहावयास मिळालं अशा स्थितीत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अशा एक ना अनेक समस्यांनी परळी सह जिल्ह्यातील जनतेची पुरती वाट लागली.जनतेला सावरण्याची ही वेळ असताना स्वतःला लोकनेते व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणवून घेणारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. यामध्ये परळीची नगरपालिका देखील सहभागी झाली.शहरात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण शहरात मोठ मोठे बॅनर, होर्डिंग्जची दाटीवाटीने लावण्यात आले आहेत. यामध्ये नगरपालिका नागरी सुविधांकडे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरी समस्यांबाबत विरोधकांनी आवाज उठवणे गरजेचे असले तरी विरोधक असलेला पंकजा ताईंचा भाजप कोमात आहे. परिणामी सामाजिक न्यायाला परळी शहरात मुठमाती मिळाल्यामुळे
आता जनतेला रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

* सुर्वेश्वरनगरच्या जनतेची बॅनर गिरी...

सुर्वेश्वरनगरच्या प्रवेशद्वारावर जनतेने सध्या एक बॅनर झळकवत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये ” जाहीर निवेदन ” अशा मथळ्याखाली संदेश आहे.तसेच या भागातील खराब व खोदुन ठेवलेल्या रस्त्यांची छायाचित्रे आहेत. “कुणी रस्ता देता का रस्ता….? सुर्वेश्वरनगरचा रस्ता झालाच पाहिजे ! सुर्वेश्वरनगर प्रभागातील चेम्बरचे काम अर्धवट केले आहे.सुर्वेश्वर मंदिरच्या सभोवतालचा सर्व रस्ता उकरुन ठेवला आहे.नगरसेवक कधीच आले नाहीत.यामुळे वार्ड क्रमांक १४ ला कोणीही वाली आहे की नाही असा प्रश्न सुर्वेश्वरनगर वासियांना भेडसावत आहे.रस्त्याच्या कामाकडे आता तरी लक्ष द्या.या भागातील रस्ते आता तरी नीट करा. फक्त मतं मागायला येता.…ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट ” असा लक्षवेधी मजकूर टाकत अनोखी शक्कल लढवत नागरी समस्या मांडली आहे मांडली आहे.
 ही आहे समस्या
110 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्प कामामुळे रस्त्यांची चाळणी करण्यात आली आहे. यातच सुर्वेश्वर नगर भागातील रस्ता तब्बल एक वर्षापासून उखडून ठेवला आहे. त्यामुळे अनेक वेळा जनतेला अपघातांना सामोरे जावे लागले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुन्हा कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे जनतेत आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु स्वतःच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करत नगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणारे लोकनेते जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील का? ज्या विभागाचे ते मंत्री आहेत त्याचे ” सामाजिक न्याय “असलेले नाव सार्थकी ठरवतील काय ? येणाऱ्या काळात तरी सत्ताधारी व विरोधकांच्या आडकीत्यात सापडलेल्या परळीकरांची सुटका होईल काय ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे

Saturday, July 17, 2021

परळीकरांच्या सेवेत स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण !




 🕳️  *ट्रस्टचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद- विजयप्रकाश तोतला*


 🕳️  *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारींच्या जनसेवेचाच हा वारसा - श्रीकांत मांडे*


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       परळीचे एक दानशूर व्यक्तिमत्व तत्कालीन काँग्रेसचे नेते व परळीचे माजी नगराध्यक्ष माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ना.धनंजयजी मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली "आरोग्य सेवासप्ताह" च्या निमित्ताने स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने "मोक्षवाहिनी स्वर्गरथ" चे लोकार्पण माजी नगराध्यक्ष विजयप्रकाशजी तोतला व माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, जेष्ठ नेते श्रीकांत मांडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.ट्रस्टचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विजयप्रकाश तोतला यांनी केले. तर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हा ट्रस्ट अग्रेसर आहे. स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारींच्या जनसेवेचाच हा वारसा असल्याचे श्रीकांत मांडे यांनी सांगितले.
          परळीचे वाढते शहरीकरण बघता अजून एक "स्वर्गरथ" ची आवश्यकता भासत होती. तेंव्हा ही गरज ओळखून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे वाहन नगर परिषद परळी वैजनाथ यांना देण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक श्रावन घाटे यांना प्रतिकात्मक चावी भेट देवून वाहन सुपूर्द करण्यात आले.स्वर्गरथ सेवा ही पूर्णपणे मोफत असणार आहे.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला,जाबेर खान पठाण,सुरेश टाक,अय्युब भाई पठाण,डॉ.संतोष मुंडे,अझीज कच्छी,वैजनाथ बागवाले,वैजनाथ सोळले,अनंत इंगळे,अनिल आष्टेकर,नितीनमामा कुलकर्णी, गोविंद कुकर,डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, श्रीकांत मांडे,शंकर कापसे,डॉ. आनंद टिंबे,रमेश चौंडे,सचिन स्वामी,के.डी. उपाडे,रवी मुळे,लालाखान पठाण, प्रा. शामसुंदर दासूद, सुभाष वाघमारे,शेख मुख्तार, सयद अली,अमर रोडे,शशीकांत बिराजदार,अनिल घेवारे,जितेंद्र नव्हाडे,बळीराम नागरगोजे,पवन फुटके,रमेश मस्के,विष्णू साखरे,भागवत गित्ते,शरद कावरे,प्रदीप जाधवर,राज जगतकर,प्रताप धर्माधिकारी, रत्नाकर कुलकर्णी, अभिजित धाकपाडे,नरसिंग गायकवाड, राजाभाऊ स्वामी,आदी मान्यवर  उपस्थित होते.

आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य;विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन.




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.सरकारच्या या जुलमी निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषदने परळीत आज दि.१६ जुलै रोजी निषेध आंदोलन केले. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. 
    
शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.अगदी निजाम राजवटीतही वारी सुरुच होती.वारीला कोणतीही आडकाठी नव्हती.सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत.हा निर्णय चुकीचा आहे.सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती.वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी.गरज असेल तर केंद्रीय पोलिस बल मागवावे.दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी.मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करत वारीला  परवानगी मागितली होती.पण सरकार तयार झाले नाही.
     
सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने  निवेदन देताना  प्रखंड अध्यक्ष सौ.वर्षा ताई अनिल जोशी,जिल्हा पालक मंत्री श्रीपाद कुलकर्णी, प्रखंड उपाध्यक्ष अरुणा ताई परळीकर, जगदीश पाठक, प्रखंड मंत्री शैलेश पांडे,अनंता महाराज जोशी वडगाव, लोखंडे वडगाव, कल्पनाताई चाटूरीकर देशपांडे आदींसह पदाधिकारी उपस्थिती होती. 

बीड चौफेरच्या प्रथम अंकाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन.






परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातून प्रकाशित होणारे  बीड चौफेर या वृत्तपत्राचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र निवासस्थानी आज बुधवार दि.15 जुलै रोजी परळी शहरातून प्रकाशित होणार्‍या बीड चौफेर या वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचे व ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन आज श्री.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी बीड चौफेरचे संपादक बालाजी ढगे व कार्यकारी संपादक शेख मुकर्रम यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या स्वागत केले. यावेळी दै. न्याय टाइम्स चे संपादक श्री बालकिशन सोनी व दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बाळासाहेब फड उपस्थित होते

Sunday, July 11, 2021

स्वकुळ साळी समाजाच्या वतिने पवनराजे अर्बन निधी बॕकेच्या अध्यक्ष व संचालकांचा सत्कार संपन्न.



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) समाजाला योग्य सन्मान देऊन बँकेमध्ये सन्मानाचे पद दिल्याबद्दल स्वकुळ साळी समाजाच्या वतीने बँकेतील पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न. स्वकुळ साळी समाजाला पवनराजे निधी बँकेचे प्रतिनिधित्व दिल्या बदल आज पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी लि.बँक शाखा परळी वैजनाथ येथे स्वकुळ साळी समाजाच्या आणि जिव्हेश्वर पुरुष बचत गटाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री प्रल्हाद रंगनाथ सावंत, उपाध्यक्ष श्री बालासाहेब तुकाराम हंगरगे,सचिव गोविंद दिलीप भरबडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संचालक म्हणून श्री बालासाहेब जोतिबा पोरे यांचा ही बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष श्री बालासाहेब पोरे सचिव नारायण शिवगण,श्री अशोक लिखे,श्री माणिक लंटिगे,श्री रामचंद्र लिखे,श्री गणेश पोरे,श्री पदमाकर भंडारे,श्री बालु लिखे जेष्ठ पत्रकार श्री सचिन भांडे ,प्रभाकर गित्ते आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर खर्च केले तब्बल 155 कोटी.


 

मुंबई ( प्रतिनीधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे. या खर्चात जवळपास 5.99 कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले आहे. प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार 9.6 कोटी खर्च करत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अनिल गलगली यांस 11 डिसेंबर 2019 पासून 12 मार्च 2021 या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करुन दिली. यात 2019 मध्ये 20.31 कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक 19.92 कोटींचा खर्च आहे.

वर्ष 2020 मध्ये एकूण 26 विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण 104.55 कोटी खर्च करण्यात आले. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर 5.96 कोटी खर्च करण्यात आले आहे. पदम विभाग 9.99 कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानावर 19.92 कोटी, विशेष प्रसिद्धी मोहिमेवर 4 टप्प्यात 22.65 कोटी खर्च करण्यात आले आहे. यात 1.15 कोटींचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर 3 टप्प्यात 6.49 कोटी खर्च करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर 9.42 कोटी खर्च केले असून यात 2.25 कोटींचा सोशल मीडियावर दर्शविला आहे. राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 18.63 कोटी खर्च केले आहे. शिवभोजनाच्या प्रसिद्धी मोहिमेवर 20.65 लाख खर्च केला असून 5 लाखांचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला आहे. 

वर्ष 2021 मध्ये 12 विभागाने 29.79 कोटींचा खर्च 12 मार्च 2021 पर्यंत केला आहे. यात परत एकदा राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 15.94 कोटी खर्च केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रसिद्धी मोहिमेवर 1.88 कोटी खर्च केले असून 45 लाखांचा सोशल मीडियावर खपविला आहे. महिला व बाल विकास विभागाने 2.45 कोटींच्या खर्चात 20 लाख सोशल मीडियाचा खर्च दाखविला आहे. अल्पसंख्याक विभागाने तर कहर करत 50 लाखांपैकी 48 लाख सोशल मीडियावर खर्च करुन टाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 3.15 कोटींच्या खर्चात 75 लाख सोशल मीडियावर खर्च केले आहे.,

अनिल गलगली यांच्या मते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे 100 टक्के माहिती उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी अधिक होऊ शकते. सोशल मीडियाच्या नावाखाली केलेला खर्च संशयास्पद आहे. त्याचशिवाय क्रिएटिव्हच्या नावाखाली दाखविलेल्या खर्चाचा हिशोब वेगवेगळया शंकांना वाव देत आहे. विभाग स्तरावर केलेला खर्च, खर्चाचे स्वरुप आणि लाभार्थीचे नाव संकेतस्थळावर शासनाने अपलोड करावे, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.

भाजपमध्ये खळबळा पंकजाताई समर्थकांचे राज्यभरात राजीनामास्त्र.


बीड ;- भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत वाढलेले प्रस्थ त्याना मंत्री करून भाजपने एक तर वंजारी समाजसकट ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न साधला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे सकट इतर तीन जणांची वर्णी लागली.राणे यांची तळकोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी वर्णी लावण्यात आल्याची शक्यता आहे तसेच कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात आगरी समाज हा पालघर, ठाणे,मुंबई या पट्यात विभागला असून शिवसेनेला मुंबई महापालिकेत शह देण्यासाठी हा हुकमी एक्का पुढी करण्यात आल्याचा निर्वाळा होतो.भरती पवार ह्या नाशिक मध्ये भाजपाची पेठ बसवण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांची एन्ट्री झाली असे समजते.

यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसत आहे. पदाधिकारी एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. आतापर्यंत 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय मान्य आहे. मी नाराज नाही असे म्हटले होते, परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे. याचा परीणाम म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपवण्यात आला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यांच्यासह अजून 14 जणांनीही राजीनामा दिल्याची माहिती आहे.पंकजा ताई पत्रकार परिषद घेऊन मानल्या होत्या मी पक्षावर नाराज नाही पण कार्यकर्तांना मला समजून घयावे लागेल.त्या म्हणाल्या पक्षाला वाटले असेल नवीन चेहऱ्याला संधी देऊन फायदा हो असेल ,तर पक्ष हा सर्वोच्च असतो व्यक्तिगत निर्णय होत नसतात असे त्या व्यक्त झाल्या.

साडेसात लाखांची लाच घेताना दोन पोलीस अधिकाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले!


सोलापूर –(प्रतिनीधी) सोलापुरात सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तब्बल 7.5 लाखाची लाच घेताना लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले असून पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे असे दोघा लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकरवी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले.

त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

Saturday, July 10, 2021

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात; टेम्पोने दिली जोरदार धडक थोडक्यात बचावल्या.


कांतीकारी साथी न्युज ;-राज्याच्या शिक्षणमंत्री आणि हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. घटना अशी की, हिंगोली जिल्ह्यातील पिपल्स बँकेजवळ मोंढ्यातून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने पालकमंत्र्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड शनिवारपासून हिंगोली जिल्ह्यात आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली तसेच कोविड आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली.
आज सकाळी आकरा वाजता शासकिय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. त्यांचे वाहन पिपल्स बँकेजवळून जात असतांना मोंढ्यातून भरधाव वेगाने पिकअप गाडी मुख्य रस्तावर येत होते. यावेळी प्रा. गायकवाड यांच्या ताफ्यातील स्कॉटींग व्हॅन पुढे गेल्यानंतर पिकअप चालकाने वाहन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. त्यामुळे वाहन पुढे गेले. मात्र पिकअपचा या वाहनाला पाठीमागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागला. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासल्या गेला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप व्हॅन चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी करून नंतर शासकिय विश्रामगृह येथे आल्या. त्यानंतर दुपारी प्रा. गायकवाड याच वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

लेख...समान नागरी कायदा हा देशात होत असेल तर स्वागतार्ह अस पाऊल म्हणावे लागेल!




  महिला व पुरुष यांना विवाह करण्यासाठी येणार्या कायदेशीर अडचणी याद्वारे कमी होतील. भारत हा आधुनिक होत आहे, मुलं मुली आपली निर्णय क्षमता प्रगल्भ करुन आपला साथीदार निवडतात परंतु विविध धर्म विविध कायदे असल्याने, विवाह संबंधित तसेच संपत्तीचे हक्क यामध्ये वेगवेगळे नियम आहेत.या विविधतेने काही कायद्यात असलेल्या त्रुटिचा गैरफायदा ही घेतात. हे सर्व एक आधुनिक भारतीय समाज बनवून सुसुत्रता आणण्यासाठी अडथळा ठरत आहेत. 
  तसे, पाहावयाचे झालेच तर हिंदू कोड बिल हे इथल्या सिख, बोद्ध व ख्रिस्ती धर्माना लागू आहे. तसा हा एक प्रकारचा समान नागरी कायदा आहे, परंतु हा कायदा IPC सारखा सर्व भारतीयांवर नाही तसेच यामधल्या त्रुटी दुर करुन, असा समान कायदा, एक समान समाज बनवण्यासाठी आवश्यक आहे. अनेक मा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल याचं महत्त्व नेहमी अधोरेखित करत असतात. जगाबरोबर बदललेल्या परिस्थिती मध्ये अनेक बदल झालेले त्याच्याशी जुळवून घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे यात महिला अधिक पिडित होतात, पुरुषांना ही यांची गरज आहे .म्हणून त्यांना समान न्यायाची गरज आहे, आणि त्यासाठी हवा समान नागरिक कायदा! 
    म्हणुनच समान नागरिक कायदा बनला पाहिजे व त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे. महिलांना अधिकार देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम अशा कायद्याची गरज वारंवार अधोरेखित केलेल होती. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की, हिंदू कोड बिल साठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलेला होता! आणि सर्वांन साठी असा कायदा बनवून भारतीय एकसंघ समाज बनवण्यासाठी ही एक महत्वपूर्ण घटना ठरेल हे निश्चित.
 आज दि. ९ जुलै २०२१ मा. दिल्ली उच्च न्यायालयाने सुचना करने, हे त्यांच परिवर्तनशील गरजेचे महत्त्व अधोरेखित करत. याप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालय या संदर्भात वारंवार मार्गदर्शन केंद्र सरकारला करत असते. देशातील सर्व जाती व धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नितांत गरजेचे आहे. कारण  विवाह पद्धती, परंपरा व संपत्ती चे विभाजन हे प्रत्येक धर्माचे कायदे वेगवेगळे असल्याने, या कायद्याची व्याख्या करताना नेहमी अडचणी येतात म्हणून हा प्रश्न समान नागरी कायदा बनवला तर सुटेल तसेच वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यासाठी मा। सर्वोच्च न्यायालयास ही अधिकार या कायद्याची निर्मिती झाल्यावर सोपे होईल हे ही रुढी वादी मानसिकता तोडण्यासाठी पोषक असेल. 

 * पंकज कांबळे-बीड*

मी नाराज नाही समर्थक नाराज. – पंकजाताई मुंडेंचे स्पष्टीकरण.


whatsapp sharing button
facebook sharing button
messenger sharing button
sharethis sharing button
  • मुंबई : (प्रतिनिधी)  मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असं मला वाटत नाही. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, तर कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे मुंडे म्हणाल्या. दरम्यान प्रसारमाध्यमांन चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असं म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप केला. विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठिशी मी उभा राहणार आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. पायाला फोड आलेले असतांनाही पट्टया बांधून प्रचार केला हे विसरून चालणार नाही असे सांगतांना मुंडे साहेबांच्या आठवणीने त्या गहिवरून गेल्या. नेता महाराष्ट्राचा असतो, तो कोणत्या जातीचा नसतो त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलणं योग्य नाही असंही त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना सांगितलं.

गेवराईत चोरट्यांचा धुडगूस सुरुच. डिसीसी बँकेत तोडफोड. तर शेजारील चार दुकानातील लाखोचा ऐवज लुटून चोरटे पसार.


whatsapp sharing button
facebook sharing button
messenger sharing button
sharethis sharing button

गेवराई : (प्रतिनिधी) गेवराई शहरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच असून शुक्रवारी रात्री येथील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. तसेच शेजारील किराणा, कपडे दुकानाचे गोडाऊनसह इतर दोन दुकाने फोडली. यामध्ये लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज चोरी गेला असल्याचे सांगितले जाते.
गेवराई शहराला मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी लक्ष केल्याचे वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सिध्द होत आहे. गोरगरीबांचे पशुधनसह दुचाकी, चार चाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच ताकडगाव रोडवरील पाच दुकाने व एका जणाचे घर चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना व पाठीमागील घटनेचा शोध पोलिसांना लागलेला नसताना पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोल्हेर रोडवर धुडगूस घातला. या रोडवरील असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी शटरचे लाँक तोडून आत प्रवेश केला. मात्र आतमध्ये कँश न मिळाल्याने चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेशेजारील किराणा दुकान, कपडे दुकानाचे गोडाऊन व इतर दोकानाकडे वळवून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत रोख रक्कमसह इतर साहित्य असा मिळून लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सकाळी नागरिक उठल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान गेवराई शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना होत असताना पोलिस नेमके करतात काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Friday, July 9, 2021

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या कप्पा व्हेरियंट बद्दल इशारा.


कांतीकारी साथी न्युज : कोरोनाची दुसऱ्या लाटेत डेल्टा नावाच्या व्हेरियंट ने मोठी हानी केली त्यात अनेकांचे जीव ऑक्सिजन गमवावे लागले.कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्बडा व्हेरियंट नंतर कप्पा नावाचा व्हेरियंट उत्तरप्रदेशात सापडला आहे.देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या कप्पा विषाणू चे चे रुग्ण सापडू लागले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचे उपाय योजले जात आहेत. मात्र, हा फक्त करोनाचा एक प्रकार असून त्यावर उपचार शक्य आहेत, त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असं उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.उत्तरप्रदेशात कप्पा विषाणूचे दोन रुग्ण सापडले मुळे भीतीचे वातावरण तयार झाले असून प्रश्नाकडून हा विषाणू धोकादायक नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे ‘समान नागरी कायदा’ करण्याचे निर्देश


कांतीकारी साथी न्युज  :- भारतामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. तसेच, या संदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं देखील मत न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
भारतात हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा असे अनेक कायदे आहेत. याशिवाय, मुस्लीम समाजामधल्या या चालीरितींसाठीचे बहुतांश नियम घटनात्मक कायदे स्वरूपात नसून ते त्यांच्या धर्मग्रंथांमध्येच नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायदान प्रक्रिया क्लिष्ट ठरते. विशेषत: वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती जेव्हा विवाह किंवा घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या असतात, तेव्हा त्यांना कोणत्या कायद्याप्रमाणे न्यायदान करावं, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर समान नागरी कायदा आल्यास या सर्व गोष्टींसाठीचे समान नियम सर्व धर्मीयांना लागू करता येऊ शकतील, अशी भूमिका आजवर अनेकदा मांडण्यात आली आहे.

जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांना स्थगित !


जिल्हा परिषद निवडणूक स्थगित !

मुंबई :कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी एस मदान यांनी केली .

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

Sunday, July 4, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.


 कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. घरच्यांना वेळ द्याल. खर्च वाढेल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्याप वाढवणे टाळा. शुभ रंग - लाल
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  आजचा दिवस चांगला जाईल. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. 'जिभेची गोडी आनंद आणी' हे लक्षात ठेवा. शुभ रंग - निळा
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. शुभ रंग - हिरवा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. नवी जबाबदारी घेणे टाळा. शुभ रंग - चंदेरी
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग - नारिंगी
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. करार विचारपूर्वक करा. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग - पोपटी
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: आजचा दिवस छान जाईल. कृती महत्त्वाची आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. शुभ रंग - निळा
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. शुभ रंग - लाल
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा. व्यावहारिक राहा. तब्येत सांभाळा. शुभ रंग - निळा
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. शुभ रंग - राखाडी
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. शुभ रंग - काळा
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. शुभ रंग - सोनेरी

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारातील नावांना दोन दिवसात अंतिम स्वरूप ! महाराष्ट्रातील नारायण राणे यांच्या नावाची चर्चा.



नवी दिल्ली :  (कांतीकारी साथी न्युज)   गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील १-२ दिवसांत ही यादी अंतिम करण्यात येणार आहे. २ वर्षानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये होणारा विस्तार मोठा मानला जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा विस्तार असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात. सध्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये २१ मंत्री आहेत. त्यासोबत ९ स्वतंत्र प्रभार आणि २३ राज्यमंत्री आहेत. या मंत्रिमंडळाची संख्या वाढण्याचे संकेत आहेत असं दिल्लीतील सूत्रांनी सांगितले आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात सध्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
ज्योतिरादित्य शिंदे, दिनेश त्रिवेदी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, वरूण गांधी, जामयांग शेरिंग नामग्यालसारख्या चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तर २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अन्य राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्यामुळे या राज्यांच्या समीकरणावर विशेष लक्ष दिलं जाईल असं विश्लेषक म्हणतात. उत्तर प्रदेशमधून आलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना मोठं मंत्रालय देण्यात येऊ शकतं. जेणेकरून मंत्री थेट जनतेशी नाळ जोडतील.

सध्याच्या स्थितीत असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्याकडे एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे. ज्यात प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, डॉ. हर्षवर्धन, हरदीप सिंह पुरी यांच्या नावाचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात यांच्याकडील खात्यांचा भार काढून घेतला जाऊ शकतो

सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, महाराष्ट्रातील नारायण राणे, भूपेंद्र यादव आणि आणखी एक ज्येष्ठ नेता ज्यांच्याकडे बिहारसोबत गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. त्यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकतं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी, अनिल जैन, जफर इस्लाम, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

२०१९ मध्ये मोदी सरकारच्या स्थापनेनंतर जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर भाजपानं दिली होती. परंतु त्यावेळी केवळ एक मंत्रिपद जदयूला दिलं जात होतं. त्यामुळे जदयूने भाजपाची ऑफर नाकारली. आता जदयू २ वर्षानंतर भाजपा कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. मात्र जदयूमध्ये मंत्रिपदासाठी अधिक दावेदार आहेत. पण सरकारमध्ये १ किंवा २ पेक्षा अधिक मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.


Saturday, July 3, 2021

रुग्णसंख्या कमी मात्र ठीक ठीकाणी गर्दी व विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या चिंताजनक.


facebook sharing button
twitter sharing button
whatsapp sharing button


बीड  :- कोरोनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असून रुग्णसंख्येत दिलासादायक घट पडत आहे. रुग्णसंख्येत घट पडत असली तरी मास्क विना फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे तर अनेक ठिकाणी गर्दी देखील वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांची वाढती गर्दी कोरोनाचा कहर वाढवण्यास आमंत्रण देत आहे. प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.